प्रत्येक कपलची हीच तक्रार असते की, लग्नानंतर त्यांच्यातील रोमान्स गायब होऊन जातो. जास्तकरून जेव्हा दोघंही जण बिझी असतात आणि त्यांच्यावर भरपूर जबाबदाऱ्या असतात. तेव्हा नात्यातला रोमान्स कमी होऊ लागतो म्हणजे प्रेम कमी होणं आणि हळूहळू बाँडिग कमी होणं. जेव्हा आपल्या आसपास खूप नकारात्मक गोष्टी असतात तेव्हा नात्याची नावंही डगमगू लागणं साहजिक आहे. मग काय करता येईल रोमान्स कायम राहण्यासाठी. प्रेम ही अशी गोष्ट आहे, ज्यामध्ये कधी कधी थोडे कष्टही घ्यावे लागतात. कपलमधील कोणी एकाने जरी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर नात्यातला रस कमी व्हायला वेळ लागत नाही. जास्तकरून वर्किंग कपल्समध्ये ही गोष्ट जास्त प्रकर्षाने दिसून येते. पण चिंता करू नका. तुमच्या पार्टनर आणि तुमच्यामधील लव्ह फ्लेम कायम राहण्यासाठी #POPxoMarathi घेऊन आलं आहे खास टिप्स. टिप्स जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.
येताना काही आणायचंय का
किती छोटासा प्रश्न आहे हा पण खरंच या प्रश्नात खूप काही दडलेलं आहे. तुम्ही ऑफिसमधून निघताना तिला जरा हा प्रश्न विचारलात किंवा त्याला जर हे विचारलंत तर तुम्हाला असलेली काळजी आणि मदत करण्याची इच्छा यातून दिसते. उदाहरणार्थ एखादी वस्तू जी घरात संपली आहे आणि तिला नेणं जमलं नाही किंवा त्याला आवडणारा एखादी वस्तू तुम्ही आठवणीने त्याला विचारून नेणं. हे फक्त त्या सामानाच्याबाबतीतच नाही तर तुमची एकमेकांना असलेली काळजीही दाखवतं. गजरा आणण्याचा रोमँटिक प्रकार हल्ली जास्त लागू होत नाही पण छोटंसं चॉकलेट तुम्ही नक्कीच नेऊ शकता.
छोटासं किस
वाचताना थोडं विचित्र वाटतंय ना. पण छोट्याश्या किसमुळेही तुमचा रोमान्स कायम राहू शकतो. आणि हो किस फक्त ओठांपुरताच मर्यादित नाहीतर कपाळावर किंवा गालावरचाही असू शकतो. या छोट्याश्या किसला म्हटलं जातं पेक ऑफ लव्ह पार्टनर. जो तुमच्या पार्टनरला एका क्षणात तुमचं प्रेम पोचवतो. यामुळे तुमच्यात एकमेंकासाठी असणारं आकर्षणही कायम राहण्यास मदत होते. जर रोमान्स आणि आकर्षण कायम राहिलं तर प्रेम कसं कमी होईल.
स्वयंपाकात मदत करा
म्हणतात मन जिंकायचा मार्ग पोटातून जातो. मग हे म्हणणं तर दोघांनाही लागू होतं. कारण तुम्ही जर एकत्र जेवण बनवलं तर तिला मदतही होईल आणि तुम्हाला एकत्र वेळ घालवण्याची संधीही मिळेल. मुख्य म्हणजे दोघांनी मिळून जेवण केलं तर जेवणही लवकर होईल आणि जेवणानंतर एकमेकांसाठी जास्तीचा वेळही मिळेल.
#MyStory: जेव्हा माझ्या एक्स-बॉयफ्रेंडची आणि माझी अचानक भेट झाली
एकमेकांचं हितगुज
हो..एकमेकांशी तुम्ही कोणत्याही विषयावर बोला पण संवाद आवश्यक आहे. दिवस कसा गेला, याबद्दल एकमेकांशी चर्चा करा. भावनिक आधार द्या. यामुळे तुमचा तणाव कमी होईल आणि पार्टनरची परिस्थितीही तुम्हाला समजून घेता येईल. अशा परिस्थितीत येणाऱ्या काळात जर पार्टनरसोबत वेळ घालवणं जमलं नाहीतर तुम्हाला परिस्थितीची आधीच कल्पना असेल. ज्यामुळे नात्यातली पारदर्शकताही वाढेल.
कडलिंग
कडलिंगमध्ये जितकं प्रेम आहे तितकं कशातच नाही. कडल करत एकमेकांशी बोलणं आणि कडल करता करता झोपून जाणं. हे पार्टनर्सना एकमेकांबाबत क्युट पद्धतीने फिजीकली अटॅच्ड असल्याचं दर्शवतं. कारण असं म्हणतात की, सेक्सपेक्षा ही कडलमध्ये जास्त रोमान्स आहे. कारण कडलिंग हे पूर्णतः आकर्षणमुक्त आहे. त्यामुळे कडलिंगमुळेही रोमान्स कायम राहतो.
सेक्सची इच्छा नसेल तर ‘या’ 11 गोष्टी करून खूष करा पार्टनरला
मग जर तुम्हाला वाटत असेल की, नात्यातलं प्रेम कमी झालं आहे तर पुन्हा एकदा एकमेकांना वेळ द्या. समजून घ्या आणि वरील उपायांनी नातं दृढ करा.
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.