42 वर्षांपूर्वी हंता व्हायरसचा लागलाय शोध, जाणून घ्या नक्की कसा करायचा सामना

42 वर्षांपूर्वी हंता व्हायरसचा लागलाय शोध, जाणून घ्या नक्की कसा करायचा सामना

सध्या संपूर्ण जग हे कोरोना व्हायरसचा सामना करतंय आणि आता नव्या एका व्हायरसने चीनमध्ये डोकं वर काढलं आहे. या व्हायरसचं नाव आहे हंता व्हायरस (Hantavirus). हंता व्हायरसमुळे चीनमध्ये 23 मार्चला एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. आता या व्हायरसच्या बातमीमुळे पुन्हा एकदा नव्याने लोकांमध्ये नव्या व्हायरसची भीती निर्माण झाली आहे. संयुक्त राज्य रोग नियंत्रण आणि रोकथाम केंद्राच्या संकेतस्थळानुसार हा हंता व्हायरस मुख्यत्वे उंदरांमुळे होतो. हा व्हायरस जगभरात वेगवेगळे रोग निर्माण करण्याची क्षमता असलेला व्हायरस आहे. त्यामुळे आता हा नवा व्हायरसदेखील कोरोनाप्रमाणे महामारी नको होऊ दे हेच सगळ्यांचं देवाकडे मागणं आहे. पण हंता व्हायरस म्हणजे नक्की काय आणि याची लक्षणं काय आहेत, हा नक्की कसा होतो? हे आपण जाणून घेऊया. 

CoronaVirus: चित्रीकरण बंद असूनही कर्मचाऱ्यांना देण्यात येणार वेतन

हंता व्हायरस कसा पसरतो?

चीनच्या सेंटर ऑफ डिसीझ कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन CDC नुसार हा व्हायरस उंदरामुळे जास्त पसरतो. एका संक्रमित व्यक्तीमुळे दुसऱ्या व्यक्तीमध्ये हा व्हायरस येतो. यामुळे Hantavrus Pulmonary Syndrome होऊ शकतात. या व्हायरसचा अजून एक प्रकार ‘ओल्ड वर्ल्ड’ हा अधिकतम युरोप अथवा आशियामध्ये आढळतो. हवेतील कणांमुळे हा व्हायरस पसरत नाही. हा त्याच व्यक्तींना होतो ज्या व्यक्तींचा संपर्क उंदरांच्या मलमूत्र, लाळ आणि अन्य गोष्टींशी येतो आणि त्यानंतर या व्यक्ती आपल्या चेहऱ्यापर्यंत या गोष्टी घेऊन जातात.

CoronaVirus : किचनमध्ये असावी या वस्तूंची तरतूद

याची लक्षणे नक्की काय आहेत?

या व्हायरसची सुरुवातीची लक्षणे आहेत ती म्हणजे थकवा, ताप, अंगामध्ये दुखणं, डोकं  दुखणं, चक्कर येणं, सर्दी होणं आणि पोटात दुखणं. सुरुवातीच्या लक्षणानंतर जर संक्रमित व्यक्तीचे उपचार वेळीच झाले नाहीत तर त्या व्यक्तीला रक्तदाब, आघात, किडनी फेल होण्याचा त्रासही होऊ शकतो. चीनच्या म्हणण्यानुसार हा व्हायरस ग्रामीण भागात जास्त पसरण्याची शक्यता आहे. कारण तिथे जास्त प्रमाणात उंदीर असतात. त्याशिवाय हायकर्स आणि कॅम्पर्सनादेखील याचा धोका जास्त आहे. 

कोरोनापेक्षा धोकादायक आहे का हंता?

जगभरात आतापर्यंत हजारो लोकांचा प्राण कोरोना व्हायरसमुळे गेला आहे.  तर लाखो लोक या रोगाने संक्रमित आहेत. कोरोना या रोगात मृत्यूचं प्रमाण हे 14% आहे आणि हंता व्हायरसमध्ये 38% त्यामुळे हंता व्हायरस हा कोरोनच्या तुलनेत 24% अधिक धोकादायक आहे. त्यामुळे हा व्हायरस अजून पसरण्यास सुरूवात झाली तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच यावर उपाय करणंही गरजेचं आहे. 

#COVID 2019: या काळात ध्यान साधना करुन मिळवा मन:शांती (Meditation Benefits In Marathi) (SEO)

42 वर्षांपूर्वी लागला होता हंता व्हायरसचा शोध

1978 मध्ये दक्षिण कोरियामध्ये हंतन नदीच्या काठी एका व्यक्तीला या व्हायरसची लागण झाली होती. हंतन नदीजवळ या व्हायरसची लागण झाल्याने याला हंता असं नाव देण्यात आलं. पण त्याचा इतिहास जाणून घेताना हे समोर आलंय की, याचा प्रारंभ हा कोरियाई युद्ध (1951-1953) मध्येच झाला होता. जेव्हा सैनिकांमध्ये 3000 पेक्षाही अधिक सैनिकांना तापाने घेरलं होतं. व्हायरसची ही लागण तेव्हापासूनच झाली असून हा व्हायरस मुळात चीनमधील नाही. पण कोरोना व्हायरसच्या दरम्यान आता या व्हायरसची लागण व्हायला सुरूवात झाली तर परिस्थिती अवघड होण्याची शक्यता आहे. 

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.