ADVERTISEMENT
home / Fitness
घरच्या घरी 45 मिनीटं चालून सुद्धा तुम्ही राहू शकता निरोगी, जाणून घ्या कसं

घरच्या घरी 45 मिनीटं चालून सुद्धा तुम्ही राहू शकता निरोगी, जाणून घ्या कसं

कोरोना व्हायरस या जागतिक संकटामुळे सध्या संपूर्ण देश लॉकडाऊन झालेला आहे. या व्हायरसपासून स्वतःचा आणि कुटुंबाचा बचाव करण्यासाठी घरातच राहणं हा सुरक्षेचा एकमेव पर्याय आहे. मात्र असं घरात अडकून राहिल्याने आणि जीम बंद असल्यामुळे व्यायाम करण्यावर अनेक मर्यादा येत आहेत. शिवाय रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी शारीरिक व्यायाम खूपच गरजेचा आहे. मात्र सध्या फक्त दररोज चमचमीत खाणं आणि घरात बसणं यामुळे अनेकांचे वजन चांगलंच वाढू लागलं आहें. खरंतर यावर एक सोपा उपाय आहे जो सर्व जण घरच्या घरी नक्कीच करू शकतात.

घरच्या घरी व्यायाम करण्यासाठी सोपा उपाय

जीमला जाण्याची ज्यांना सवय आहे ते या काळात घरच्या घरी करण्यासारखे काही सोपे एक्सरसाईज दररोज नक्कीच करू शकतात. शिवाय ज्यांना योगासने, प्राणायाम, ध्यानधारणा करायची सवय आहे ते या माध्यमातून व्यायाम करू शकतात. मात्र समाजात असाही एक वर्ग असतो जो कामाच्या धावपळीत एवढा गुंतलेला असतो की त्याला दररोजचा व्यायाम करण्यासाठी कधी वेळच मिळत नाही. अशा लोकांनी ज्यांनी आयुष्यात कधीच व्यायाम केला नाही. ते आता  वेळ असूनही व्यायाम करू शकत नाहीत. याचं कारण त्यांना आता काय व्यायाम करायचा हेच माहीत नाही. मात्र अशा लोकांनी काळजी करण्याची काहीच गरज नाही. खरंतर चालणं हा सर्वांसाठी एक उत्तम व्यायाम आहे. शिवाय आपण स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकल्यापासून दररोज थोडा तरी चालण्याचा व्यायाम हा केलाच आहे. त्यामुळे अगदी चालण्याचा साधा आणि अगदी सोपा व्यायाम करून तुम्ही या काळात फिटनेस सांभाळू शकता.

Shutterstock

ADVERTISEMENT

चालत राहणं आरोग्यासाठी उत्तम पर्याय

चालण्यामुळे शारीरिक हालचाल उत्तम होते. शिवाय नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी आणि खालेल्या अन्नाचे पचन करण्यासाठी चालणं हा एक उत्तम पर्याय असू शकतो. म्हणूनच आपल्याकडे जेवणानंतर शतपावली करण्याची सवय आहे. निरोगी राहण्यासाठी दिवसभरात कमीत कमी 45 मिनीटे चालणं गरजेचं आहे. आता लॉकडाऊनच्या काळात सर्वजण घरीच अडकल्यामुळे तुम्ही तुमच्या घरातदेखील हा व्यायाम अगदी सहज करू शकता. ज्यामुळे तुमचं वजनदेखील वाढणार नाही आणि रात्रीची झोपदेखील चांगली लागेल

Shutterstock

घरच्या घरीच चालायचं म्हणजे नेमकं काय

घरच्या घरी चालायचं म्हणजे नेमकं काय करायचं तर घरात एकाच पद्धतीने फक्त चालण्याचा सराव करायचा. ज्यांच्या घरी ट्रेडमील असेल ते त्यावर चालण्याचा सराव करू शकतात. ज्यांचे घर मोठे आहे ते घरात, निरनिराळ्या खोल्यांमधून, बाल्कनी, टेरेस, घरातील बागेतून फिरून चालण्याचा व्यायाम करू शकतात. जर तुमच्या घरात निरनिराळे मजले असतील तर जिन्यांवरून वर -खाली चढत उतरत तुम्ही व्यायाम करू शकता. मात्र ज्यांचे घर अगदी लहान आहे त्यांनी फक्त एकाच ठिकाणी उभं राहून चालण्याचा फक्त सराव केला तरी त्यांना नक्कीच फायदा मिळू शकतो. याचाच अर्थ असा की, आपण घराबाहेर अथवा रस्त्यावरून चालत आहोत अशा प्रकारची शारीरिक हालचाल करायची. थोडेसे पुढे गेल्यावर पुन्हा मागे येत चालण्याचा सराव करायचा. चालण्याचा व्यायाम करताना कंटाळा येऊ नये यासाठी घरात एखादं आवडीचं संगीत लावा आणि फक्त घरात चालण्याचा सराव करत राहा. फक्त एवढंच लक्षात ठेवा की हा चालण्याचा सराव तुम्हाला दिवसभरात सलग आणि कमीत कमी 45 मिनीटे करायचा आहे. या सरावासोबत हा संकटाचा काळ नक्कीच निघून जाईल आणि देश कोरोनामुक्त झाल्यावर घराबाहेर तुम्ही पुन्हा मुक्त संचार करून तुमचा चालण्याचा व्यायाम करू शकाल. 

ADVERTISEMENT

Shutterstock

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

हे ही वाचा –

ADVERTISEMENT

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला

अधिक वाचा –

होम क्वारंटाईनमध्ये फिट राहण्यासाठी ‘या’ अभिनेत्री करत आहेत योगा

डिलिव्हरीनंतर वजन कमी करण्यासाठी बाळासोबत हसत खेळत करा ‘हे’ व्यायाम

ADVERTISEMENT

#COVID 2019: या काळात ध्यान साधना करुन मिळवा मन:शांती (Meditation Benefits In Marathi)

31 Mar 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT