होम क्वारंटाईनमध्ये फिट राहण्यासाठी ‘या’ अभिनेत्री करत आहेत योगा

  होम क्वारंटाईनमध्ये फिट राहण्यासाठी ‘या’ अभिनेत्री करत आहेत योगा

कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या जागतिक संकटाचा सामना अख्खं जग करत आहे. या काळात सुरक्षेची खबरदारी घेण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आलेलं आहे. सामाजिक बांधिलकी जपत हा लॉकडाऊन आपण सर्वांनी पाळायलाच हवा. त्याचप्रमाणे जगभरात पसरलेल्या या संकटावर मात करण्यासाठी स्वतःच्या आणि कुटुंबाचं आरोग्यही जपायला हवं. देशभरात झालेल्या या लॉकडाऊनचा फटका मनोरंजन विश्वाला सुद्धा बसला आहे. सध्या या लॉकडाऊनमुळे सर्व मालिकांचे चित्रीकरण बंद आहे. सहाजिकच त्यामुळे नेहमी शूटिंगमध्ये व्यस्त असणारे कलाकार आपल्या घरात कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. प्रत्येकजण या सक्तीच्या सुट्टीला सत्कारणी कसं लावावं यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे.या काळात फिट राहण्यासाठी सध्या काही मराठी अभिनेत्रींनी घरातच योगासनांचा सराव करण्यास सुरूवात केली आहे. यासाठी कोणी दिवसाला 108 सूर्यनमस्कार घालतंय तर कोणी निरनिराळी आसनं करण्याचा प्रयत्न करत आहे. 

सोनाली कुलकर्णी घालतेय सूर्यनमस्कार

अभिनेत्री आणि 'युवा डान्सिंग क्वीन' स्पर्धेची परीक्षक सोनाली कुलकर्णी सध्या होम क्वारंटाईनमध्ये फिटनेससाठी अनेक गोष्टी घरातच करत आहे. ज्यामध्ये स्वतःच्या आवडीचे खाद्यपदार्थ स्वतःच तयार करण्याला तिने प्रथम प्राधान्य दिलेलं आहे. मात्र तिच्या मते असे  चमचमीत पदार्थ खाताना व्यायामाकडेही पुरेसं लक्ष द्यायला हवं. कारण घरातच असल्यामुळे शारीरिक हालचालीवर बऱ्याचशा मर्यादा येत आहेत. अशात नुसतं खाऊन आपलं वजन वाढू शकतं. जीम बंद असल्यामुळे व्यायाम कसा करायचा अशा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. मात्र यावर तिने एक नामी युक्ती शोधून काढली आहे. सोनाली सध्या फिटनेससाठी घरीच सूर्यनमस्कार घालत आहे. नुकताच तिने  सूर्यनमस्कार घालत असतानाचा तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. स्वतःचं आरोग्य उत्तम राहावं यासाठी ती सध्या दिवसाला कमीत कमी 108 सूर्यनमस्कार घालत आहे. 'फिट अँड फाईन' सोनालीने हा व्हिडिओ शेअर करून सर्वांना निरोगी जीवनाचा फिटनेस मंत्रच शेअर केला आहे.

प्राजक्ता माळी करतेय प्राणायम

प्राजक्ता माळी सोशल मीडियावर फारच अॅक्टिव्ह असते. नेहमी ती तिचे दिलखेचक अदा असलेले फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. मात्र आता या होम क्वारंटाईनच्या काळात प्राजक्ता दररोज तिचे योगासने करत असलेले व्हिडिओ शेअर करत आहे. संगीत आणि योगासनं हा मन प्रसन्न करण्याचा एक उत्तम मार्ग आहे असं तिचं म्हणणं आहे. प्राजक्तामुळे तिच्याप्रमाणेच घरी असलेले तिचे चाहतेदेखील नक्कीच व्यायामाची प्रेरणा घेत आहेत

नेहा महाजनचा फिटनेस फंडा -

नेहा महाजनचे सोशल मीडियावर अनेक फॉलोव्हर्स आहेत. नेहा तिच्या दैनंदिन जीवनात नेमकं काय करते हे जाणून घेण्याची सर्वांनाच इच्छा असते. नेहाच्या चाहत्यांना हे ऐकून नक्कीच आनंद होईल की नेहा सध्या तिचा होम क्वारंटाईचा काळ फिटनेसवर लक्ष केद्रिंत करण्यावर घालवत आहे. कोरोनामुळे घराबाहेर पसरलेली नकारात्मकता घालवण्याचा योगा हा एक चांगला मार्ग आहे असं नेहाला वाटत आहे. त्यामुळे ती फिट राहण्यासाठी सध्या योगासने करताना दिसत आहे. 

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

हे ही वाचा -

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या. 

अधिक वाचा -

Lockdown असूनही घराबाहेर पडला कॉमेडियन सुनील ग्रोव्हर आणि ...

रामायण, महाभारतप्रमाणेच आता 'शक्तिमान' येणार प्रेक्षकांच्या भेटीला

सोशल मीडियावर अपडेट राहण्यासाठी सेलिब्रिटींना Throwback चा आधार