ADVERTISEMENT
home / Fitness
डिलिव्हरीनंतर वजन कमी करण्यासाठी बाळासोबत हसत खेळत करा ‘हे’ व्यायाम

डिलिव्हरीनंतर वजन कमी करण्यासाठी बाळासोबत हसत खेळत करा ‘हे’ व्यायाम

गरोदरपण आणि बाळंतपणानंतर स्त्रीचं आयुष्यच बदलून जातं. शिवाय या प्रोसेसमध्ये स्त्रीयांच्या शरीरात अनेक बदल होतात. ज्यामुळे अचानक त्याचं वजन वाढू लागतं. बाळाचं संगोपन, घरातील जबाबदाऱ्या, ऑफिसचं काम या सर्व गोष्टीचा बॅलेंन्स सांभाळता सांभाळता स्वतःच्या वाढणाऱ्या वजनाकडे तिला लक्षच देता येत नाही. शिवाय डिलिव्हरी नॉर्मल असेल तर पूर्ववत होण्यासाठी फार काळजी घ्यावी लागत नाही. मात्र जर सी-सेक्शन झालेलं असेल तर कमीत कमी सहा महिने कोणतेही जड व्यायाम स्त्रीला करता येत नाहीत.  बाळाचे संगोपन ही एक महत्वाची जबाबदारी असल्यामुळे आई झाल्यावर स्त्री क्षणभरही आपल्या तान्हुल्यापासून दूर राहू शकत नाही. यासाठीच आम्ही तुम्हाला व्यायामाचे असे काही सोपे प्रकार सांगत आहोत जे तुम्ही तुमच्या बाळासोबतच करू शकता. ज्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल आणि तुम्हाला बाळापासून दूर जाण्याची मुळीच गरज नाही. बाळासोबत व्यायामाला सुरूवात केल्यामुळे त्यांच्यावर नकळत व्यायामाचे संस्कार घडतात आणि आई आणि मुलाचं बॉन्डिंग चांगल होतं.

Post pregnancy 2

बाळंतपणानंतर व्यायामाला सुरूवात या गोष्टींपासून करा-

  • बाळासोबत घरात, लॉन अथवा घराबाहेरील बागेत सकाळी आणि संध्याकाळी फिरायला जा. ज्यामुळे तुमचा चालण्याचा व्यायाम होऊ शकेल.
  • बाळाला मांडीवर अथवा हातामध्ये घेऊन होल्ड करण्याची प्रॅक्टिस करा. ज्यामुळे कोणताही व्यायाम करताना बाळ तुमच्या हातातून निसटेल का अशी तुमच्या मनात भिती वाटणार नाही.
  • बाळाला मांडीवर घेऊन प्राणायम अथवा श्वासाचे हलके व्यायाम करा.
  • व्यायामाला सुरूवात करण्यापूर्वी तुमच्या गायनेकॉलॉजिस्टचा सल्ला घ्या. कारण बाळंतपणानंतर तुमचे शरीर व्यायाम करण्यासाठी तयार आहात का हे यामुळे समजू शकते.

प्रेगन्सी स्ट्रेच मार्क्सपासून ते चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यापर्यंत उपयुक्त आहे बायो ऑईल

कोणते व्यायाम प्रकार कराल-

केगल व्यायाम-

डिलिव्हरीनंतर महिलांचा योनीमार्ग सैल होतो. ज्यामुळे भविष्यात सेक्स करताना त्रास होऊ शकतो, युरीन थांबवणे कठीण जाते. यासाठी प्रसूतीनंतर हा व्यायाम तुमच्यासाठी अगदी फायदेशीर ठरेल यासाठी आरामदायक मुद्रेमध्ये बसा. तुमचे योनीमार्गाचे स्नायू युरीन थांबवून धरण्यासाठी जितके गरजेचे आहेत तितके ताणा. काही सेंकदांनी पुन्हा स्नायू शिथील करा. असे दहा ते पंधरा वेळा तुम्ही करू शकता. हा व्यायाम तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. त्यामुळे बाळाला स्तनपान दिल्यावर हा व्यायाम करण्याची सवय लावा.

ADVERTISEMENT

सीट अप्स-

तुम्ही तुमच्या बाळाला दोन पायांमध्ये घेऊन सीट अप्स करू शकता. ज्यामुळे तुमच्या पाठ, कंबर आणि पोटाचा चांगला व्यायाम होऊ शकेल. शिवाय तुमचं बाळ हसतखेळत तुमच्यासोबत या व्यायामाचा आनंद लुटू शकेल.

स्क्वार्ट –

हा व्यायामप्रकार तुम्ही तुमच्या बाळासोबत अगदी सहज करू शकाल. कारण यामुळे तुमचे बाळदेखील आनंदी होऊ शकेल. यासाठी बाळाला बॉलप्रमाणे दोन्ही हाताने पकडा. सरळ आणि ताठ उभे राहून तुम्ही तुमच्या बाळाला हात समांतर ठेवत समोर आणि पुन्हा छातीच्या दिशेन आणू शकता. या प्रकारामुळे तुमच्या हातांचे स्नायू मजबूत होतील. मात्र व्यायामाचा वेग फार कमी ठेवा. बाळ तुमच्या हातातून सटकणार नाही याची काळजी घेत आणि त्याला खेळवत खेळवत तुम्ही हा व्यायाम नक्कीच करू शकता. त्यासोबतच जास्त ताण घेऊन कोणताही व्यायाम करू नका.

बेंड ओव्हर रो-

या व्यायामामुळे तुमच्या पाठ आणि कंबरेला चांगला व्यायाम मिळू शकेल. बाळाला दोन्ही हातांनी व्यवस्थित पकडा. एक हात बाळाच्या मानेकडे आणि एक हात पाठ आणि त्याच्या कंबरेकडे ठेवा. ताठ उभे रहा आणि कंबरेतून खाली वाका. बाळाला खालच्या दिशेने खाली न्या आणि पुन्हा वरच्या दिशेन छातीजवळ घ्या. असे करताना तुमचे हात सरळ आणि ताठ ठेवण्याचा प्रयत्न करा. असे आठ ते दहा वेळा करा यामुळे तुमच्या कंबर आणि पाठीवर चांगला ताण येऊ शकेल.

प्रेगन्सीनंतर पुन्हा सुडौल दिसण्यासाठी करा ‘हे’ उपाय (How To Lose Weight After Pregnancy In Marathi)

ADVERTISEMENT

पुशअप्स-

पुशअप्स घालत्यामुळे तुमच्या छातीला आणि पोटाला चांगला व्यायाम मिळू शकेल. यासाठी बाळाला खाली मॅटवर झोपवा. बाळाला समोर ठेवत जमिनीवर पोटावर झोपा. हात शरीराला समांतर ठेवा. तळहात छातीजवळ घेत हात कोपऱ्यापासून दुमडा आणि शरीर गुडघ्यापर्यंत वर उचला. श्वासावर नियंत्रण ठेवत पुशअप घालण्यास सुरूवात करा. शरीर वर उचलताना बाळाला हसून पापा द्या आणि पुन्हा खाली जा. अशा प्रकारे व्यायाम केल्यामुळे तुमचे बाळ आनंदी राहील आणि तुम्हाला व्यायामदेखील मिळेल.

Post pregnancy

काही दिवसांनंतर जेव्हा डॉक्टर तुम्हाला जीम एक्सरसाईज करण्याची परवानगी देतील तेव्हा तुम्ही अशा प्रकारे बाळासोबत जीममध्ये  व्यायाम करू शकता. ज्यामुळे तुमचं वजन कमी होईल आणि डिलिव्हरीनंतरही तुम्ही फीट रहाल.

तुम्हाला कदाचित या गोष्टी आवडतील:

ADVERTISEMENT

डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये जाताना या ‘25’ गोष्टी तुमच्या मॅटर्निटी बॅगमध्ये अवश्य ठेवा

Pregnency Week By Week In Marathi

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

26 May 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT