ADVERTISEMENT
home / आरोग्य
नैसर्गिक पद्धतीने घर निर्जंतूक करण्याच्या सोप्या टिप्स

नैसर्गिक पद्धतीने घर निर्जंतूक करण्याच्या सोप्या टिप्स

संपूर्ण जग कोरोना व्हायरसशी जणू संघर्षच करत आहे. या व्हायरसपासून वाचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणं हा होय. कारण प्रत्येकाने स्वतःची काळजी घेतली तर हा व्हायरस पसरण्यास नक्कीच प्रतिबंध होऊ शकतो. यासाठी सरकारने शाळा,कॉलेज, आणि म़ॉल, सूपर मार्केट सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणारी ठिकाणे काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.  त्यासोबत अनेक कंपन्यांमधून कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा सल्ला देण्यात आला आहे. यामुळे आता लोकांनी स्वतःला जवळजवळ घरात कोंडूनच घेतले आहे. मात्र घरी असलं तरी याबाबत काही गोष्टींची काळजी ही नक्कीच घ्यायला हवी. या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी तुमचं घरही निर्जंतूक असायला हवं. या जागतिक महामारीमुळे सध्या बाजारात सॅनिटाईझर आणि अॅंटि सेप्टिक लिक्विडचा तुटवडा भासत आहे. यासाठीच घरीच अगदी नैसर्गिक पद्धतीने तुम्ही तुमचे घर निर्जंतूक करू शकता. 

कापूर –

वातावरणात झालेल्या या अचानक बदलामुळे हवेतील जंतूसंसर्गाचे प्रमाण वाढू शकते. अशा वातावरणात संसर्गजन्य आजारांची लागण त्वरीत होते. मात्र घरातील हवा शुद्ध करण्याचा सोपा मार्ग म्हणजे घरात कापूर अथवा धूप जाळणे. कापूर जाळल्यामुळे घरातील वातावरण शुद्ध होते. घरात जीवजंतूंचा वाढलेला प्रादुर्भाव कमी करण्यासाठी हा एक उत्तम मार्ग आहे. शिवाय यामुळे तुम्हाला शुद्ध हवादेखील मिळू शकते.  सर्दी, खोकला, ताप, हवेतून पसरणारे साथीचे आजार घरात कापूर जाळण्याने कमी होतात. शक्य असल्यास कापूर जाळताना कडुलिंबाची पावडर त्यावर टाका. शिवाय खोलाच्या प्रत्येक कोपऱ्यात कापराच्या गोळ्या टाकून ठेवा. इनफेक्शन दूर ठेवण्याची ही एक सोपी युक्ती आहे. 

वाचा – कोरोनाच्या तणावातून बाहेर पडण्यासाठी हवी मनः शांती, मग जाणून घ्या ध्यान कसे करावे

ADVERTISEMENT

Shutterstock

कडूलिंब –

आयुर्वदात कडूलिंबाचं नाव हे सर्व प्रकारच्या आजारांवरील औषध म्हणून घेतलं जातं. रोग निवारण औषधी म्हणून कडूलिंबाची ओळख आहे. कडूलिंबाचा पाला खाण्याने अनेक आजार दूर होतात. कडूलिंबाच्या झाडातील प्रत्येक घटकांमध्ये अॅंटिसेप्टिक गुणधर्म असतात. झाडाची पाने, खोड, फळे अशा प्रत्येक गोष्टींचा औषधांसाठी वापर केला जातो. यासाठीच घराचे इनफेक्शनपासून संरक्षण करण्यासाठी घराच्या दारे – खिडक्यांवर कडूलिंबाची पाने लटकवून ठेवा. घरात धूप कापूर जाळताना त्यात कडूलिंबाच्या पावडरचा वापर करा. अंघोळ करताना कडूलिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात टाका. ज्यामुळे तुमचे घर नक्कीच निर्जंतूक होईल. 

Shutterstock

ADVERTISEMENT

मीठ –

कोणत्याही इनफेक्शनपासून संरक्षण करण्याचा अगदी सोपा उपाय म्हणजे मीठाचा वापर करणं. कारण मीठामध्ये निर्जंतुकीकरण करण्याचे गुणधर्म असतात. यासाठी घराच्या खिडकीत एका भांड्यात जाडे अथवा खडे मीठ ठेवा. ज्यामुळे जीवजंतू तुमच्या घरात प्रवेश करणार नाहीत. याचप्रमाणे सॉल्ट बाथ अथवा मीठाच्या पाण्याने अंघोळ केल्यामुळेदेखील तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. आजारपण दूर ठेवण्यासाठी हा नैसर्गिक उपाय करणं मुळीच खर्चिक नाही. 

मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी आयडियाज (Activities For Kids At Home In Marathi)

Shutterstock

ADVERTISEMENT

सुर्यप्रकाश –

घरात जर सतत चांगले आणि उत्साहपूर्ण वातावरण असावं असं तुम्हाला वाटत असेल तर घरात भरपूर उजेड आणि सुर्यप्रकाश येईल याची काळजी घ्या. कारण ज्या घरात अंधार आणि दमट वातावरण असते तिथे जीवजंतूसाठी पोषक वातावरण लवकर निर्माण होते. जर तुमच्या घराची रचना भरपूर सुर्यप्रकाश घरात येईल अशी नसेल तर घराच्या स्वच्छतेची योग्य काळजी घ्या. सुर्यप्रकाशामुळे घरातील जीवजंतू नष्ट होतात. शिवाय सुर्यप्रकाश घरात आल्यामुळे तुम्हाला सतत फ्रेश आणि उत्साही वाटते. 

निलगिरीचे तेल –

निलगिरीच्या पानांपासून काढण्यात आलेल्या तेलाला निलगिरीचे तेल असे म्हणतात. या तेलाला अतिशय उग्र सुगंध असतो. श्वसनाचे विकार आणि संसर्गजन्य विकारांना दूर ठेवण्यासाठी निलगिरी अतिशय उत्तम औषध आहे. बेडशीट, सोफाकव्हर, पडदे अशा कापडी वस्तूंवर निलगिरीच्या तेलाचे काही थेंब लावल्यास घरात जीवजंतूंचा प्रादूर्भाव नक्कीच होणार नाही. घराबाहेर पडताना हातरूमालावर निलगिरीचे तेल लावा ज्यामुळे तुम्हाला इनफेक्शन होण्याचा धोका नक्कीच कमी होईल. 

Shutterstock

ADVERTISEMENT

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

हे ही वाचा –

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

अधिक वाचा –

ADVERTISEMENT

कोरोनापासून बचावासाठी सॅनिटाईजर नाही साबणच उत्तम

कोरोना व्हायरसची झळ बॉलीवूडलाही

राखी सावंतला वाटतेय कोरोना व्हायरसची भीती, म्हणाली…

19 Mar 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT