चेहऱ्यावर चांगला ग्लो हवा असेल तर तुम्ही व्हिटॅमिन C असलेल्या फळांचे सेवन करायला हवे असे तुम्हाला सांगितले जाते. पण प्रत्येकवेळी ही फळं खाणं आणि फळं सगळ्याच वेळी उपलब्ध असणं शक्य होत नाही. अशावेळी तुम्हाला काही इन्स्टंट पर्याय हवा असेल तर व्हिटॅमिन C चे काही इन्स्टंट डोस मिळतात. जे संपूर्ण सुरक्षित आहेत.कोणताही सल्ला न घेता तुम्ही याचे सेवन करु शकता आणि सुंदर त्वचा मिळवू शकता. तर मग आज जाणून घेऊया इन्स्टंट व्हिटॅमिन C विषयी
टॅबलेट स्वरुपात मिळणाऱ्या व्हिटॅमिन C च्या गोळ्या चवीला फारच उत्तम असतात. पाण्यात विरघळणारी ही गोळी साधारण एका ग्लासभर पाण्यात टाकायची असते. ही गोळी विरघळली की, हे पाणी तुम्ही पिऊ शकता. व्हिटॅमिन C चा पुरेपूर डोस असलेल्या या बॉटलमध्ये 20 गोळ्या असतात. जर तुम्ही एका महिना हा कोर्स करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही एक दिवस आड याचे सेवन केले तरी चालू शकते. रात्री झोपताना तुम्ही याचा शक्यतो वापर करावा.महिन्याअखेरीस तुम्हाला तुमची त्वचा हायड्रेट आणि फ्रेश दिसेल. चेहऱ्यावरील पिंपल्सचे डागही कमी होतील. पण याचे सतत सेवन करु नका. थोडीशी विश्रांती घ्या.
जिऱ्याचा चहा वजन कमी करण्यासाठी आहे फायदेशीर, शरीरासाठी आहे डिटॉक्स
शरीरासाठी आवश्यक असलेल्या घटकांचे आपण सेवन करतोच असे नाही. त्याचा परिणाम तुमच्या त्वचेवर होतो. आपल्या त्वचेखाली असलेल्या कोलॅजनला बुस्ट करण्याची गरज असते. त्याला आवश्यक असलेले न्युट्रीशन मिळाले की, तुमची त्वचा स्वच्छ आणि नितळ दिसू लागते. Cureveda Glow Powder तुमच्यासाठी वरदान आहे कारण ती एकाच वेळी तुमच्या त्वचेसंदर्भातील समस्यांचे निराकरण करते. तुमच्या त्वचेची इलास्टिसिटी वाढवते ओमेगा 6 जे तुमच्या केस आणि त्वचा दोघांसाठी फायदेशीर असते. पावडर स्वरुपात मिळणारे औषध. तुम्हाला एक ग्लास पाण्यात घ्यायचे असते. त्यातही पावडर घालून पाणी प्यायचे असते. त्वचेमध्ये झालेला बदल टिपण्यासाठी तुम्हाला किमान 15 दिवस ते सतत घ्यावे लागेल.
वर सांगितलेल्या Enerc प्रमाणेच हे ही एक आहे. पण यात फरक इतकाच आहे की, एक संत्र्याचा अर्क आहे आणि दुसरा लिंबाचा. या दोघांमध्येही व्हिटॅमिन C असते. पण त्याची चव वेगळी लागते. एका ग्लासभर पाण्यात ही गोळी टाकून तुम्हाला हे पाणी प्यायचे असते. रात्री झोपताना किंवा सकाळी नाश्ता करताना तुम्ही हे प्यायलात तरी चालू शकते. तुमच्या शरीराची शुद्धी करण्याचे काम हे करत असते. त्यामुळे तुम्हाला हे रोज घेण्यास काहीच हरकत नाहीत.
आवळ्याचेही त्वचा आणि केसांसाठी भरपूर फायदे आहेत. जर तुम्हाला थोडा वेगळा फ्लेवर हवा असेल तर तुम्ही Fast & Up घेऊ शकता. यासुद्धा विरघळणाऱ्या गोळ्या आहेत. याची चव तुम्हाला आवळ्यासारखी लागेल. तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते. तुमच्या शरीराला आतून बळकटी मिळाली की, मग तुमची त्वचा अधिक चांगली दिसते. आवळ्यामधील अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी तुमच्या केसांना चमक देते. तुमची त्वचा अधिक सुंदर, नितळ आणि फ्रेश दिसते.
आता तुम्ही याचे फायदे तोटे लक्षात घेत याचे सेवन केले तर तुम्हाला हवी असलेली त्वचा तुम्हाला मिळेल.
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.