जाणून घ्या अक्षय्य तृतीयेचा पूजाविधी आणि पौराणिक कथा

जाणून घ्या अक्षय्य तृतीयेचा पूजाविधी आणि पौराणिक कथा

साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त म्हणजे ‘अक्षय्य तृतीया’. मराठी महिन्यानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या तिथीचा दिवस हा अक्षय्य तृतीया म्हणून साजरा केला जातो. यंदा हा दिवस 26 एप्रिल, रविवारी आला आहे. अनेक शुभकार्याची सुरुवात करण्यासाठी हा अत्यंत चांगला दिवस मानला जातो. म्हणूनच या दिवशी मोठ्या प्रमाणात लग्नाचे मुहुर्त असतात. गृहप्रवेश, नव्या कामाची सुरुवात करण्यासाठी हा अत्यंत चांगला असा दिवस आहे. ज्याप्रमाणे दसरा, पाडवा, दिवाळी पाडवा यादिवशी सोन्याची खरेदी केली जाते अगदी त्याच पद्धतीने अक्षय्य तृतीयेच्या दिवशी खरेदी केली जाते. आज आपण अक्षय्य तृतीया साजरी करण्यामागील पौराणिक कथा आणि या दिवशी नेमके काय करायला हवे हे जाणून घेणार आहोत. मग करुया सुरुवात

अक्षय तृतीया शुभेच्छा संदेश

हा दिवस का आहे महत्वाचा

Instagram

हिंदू धर्मानुसार अक्षय्य तृतीया या दिवशी भगवान विष्णूच्या सहाव्या अवताराचा जन्म झाला होता. हा अवतार म्हणजे साक्षात परशुराम अवतार. आता तुम्हाला अजिबातच पुराणाची माहिती नसेल तर परशुराम हे जमद्ग्नि आणि रेणुकादेवी यांचे पुत्र होते. म्हणूनच हा दिवस मोठ्या उत्साहा साजरा केला जातो. या दिवशी परशुराम अवताराचीच नाही तर भगवान विष्णूचीही पूजा केली जाते.

तुमची प्रिय मैत्रीण 'आई'ला पाठवा मातृदिनाच्या शुभेच्छा (Aai Quotes In Marathi)

पौराणिक कथा

Instagram

अक्षय्य तृतीया या दिवसाचे महत्व जितके खास आहे. त्यामागे एक पौराणिक कथा वा आख्यायिका देखील सांगितली जाते. आता तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनच्या या दिवसासंदर्भातील आख्यायिका माहीत असतील. पण एक कथा सर्वसाधारणपणे सांगितली जाते ती अशी, प्राचीन काळी  देवांवर आणि चांगल्या  व्यक्तींवर श्रद्धा असणार धर्मदास नावाचा एक वैश्य होता. त्याचे कुटुंब फार मोठे होते. त्याच्या या मोठ्या कुटुंबामुळे ते कायम व्याकुळच असायचे. कुटुंबाचे अर्थाजन चांगले करु शकणाऱ्या एका व्रताबद्दल त्याने ऐकले होते. त्यानुसार एक तिथी आल्यानंतर त्याने गंगामध्ये स्नान केले.विधीपूर्वक देवीड-देवतांची मनोभावे सेवा केली.  तसेच त्याने अन्नधान्य आणि काही वस्तूंचे दान ब्राम्हणांना केले. त्याच्या घरातून या सगळ्या गोष्टीला विरोध होत होता. पण त्याने अगदी मनोभावे ही पूजा केली. त्यामुळेच तो पुढील जन्मी कुशावती राजा म्हणून जन्माला आला. ज्या दिवशी त्याने हे दान केले तो दिवस होता अक्षय्य तृतीयेचा. म्हणूनच या दिवशी दानही केले जाते. त्याचे पुण्य तुम्हाला मिळते. 

World Laughter Day: मराठीतील मजेशीर जोक्स आणि मीम्स ज्यांनी तुम्हाला खूप हसवले

अशी करा पूजा

Instagram

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि विष्णूची पूजा केली जाते. आता या दिवसात तुम्हाला घराबाहेर जाऊन काही साहित्य आणून पूजा करणे शक्य नसेल पण तुम्ही घरी राहून पूजा करु शकता. लक्ष्मी आणि विष्णूची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवून केशर दूध आणि फळांचा नैवेद्य दिला जातो. आता तुम्ही लॉकडाऊनच्या काळात जे शक्य असेल तो नैवेद्य किंवा प्रसाद देवाला दाखवा. 


तुम्हा सगळ्यांना अक्षय्य तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा!