पिंपल्सवर कमाल काम करतात या काही क्रिम्स, तुम्हीही नक्की ट्राय करा

पिंपल्सवर कमाल काम करतात या काही क्रिम्स, तुम्हीही नक्की ट्राय करा

अधून मधून पिंपल्स येण्याचा त्रास सगळ्यांनाच असतो. साधारण पिरेड्सच्या आधी किंवा खूप प्रवास केल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर अनेकदा पिंपल्स येतात. पिंपल्स आले की, ते घालवण्यासाठी आपण इतक्या गोष्टी करतो की, नेमकं काय करायचं ते कधीकधी  आपल्याला कळत नाही. आता तुम्ही नेमकं काय करायला हवं हे देखील आम्ही तुम्हाला खूप वेळा सांगितले आहे. आज आम्ही तुम्हाला पिंपल्स कमी करणाऱ्या क्रिम्स सांगणार आहोत. आता प्रत्येकाच्या त्वचेच्या प्रकारानुसार त्या क्रिम्सचा परीणाम तुमच्या पिंपल्सवर होतो. आता तुमच्यासाठी या क्रिम्स कोणत्या ते सगळ्यात आधी जाणून घेऊया.

चेहऱ्यावरील पिंपल्स गेले पण डागांचे काय, करा हे घरगुती उपाय (Home Remedies For Acne Scars In Marathi)

मेलाबेस्ट आणि युग्लान (Melabest and yuglan)

shutterstock

तुम्हाला अगदी सहज उपलब्ध होणारी पिंपल्सवरील क्रिम म्हणजे मेलाबेस्ट आणि युग्लान. आता या दोन क्रिमचा वापर तुम्हाला करायला सांगण्यामागील कारण म्हणजे एक क्रिम पिंपल्स कमी करते तर दुसरी क्रिम पिंपल्सचे डाग. यातील युग्लान ही क्रिम पिंपल्ससाठी वापरली जाते. तर मेलाबेस्ट तुमच्या त्वचेचा रंग निखारण्यासाठी चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यासाठी. त्यामुळे तुम्ही अगदी थोड्या प्रमाणात ही क्रिम घेऊन छान मिसळून तुमच्या चेहऱ्याला लावायची असते. आता तुम्ही फक्त तुमच्या पिंपल्सवर आणि डागांवर ही क्रिम लावणार असाल तरी चालेल. संपूर्ण चेहऱ्याला लावलीत तर फारच उत्तम

ही घ्या काळजी: पिंपल्स एका रात्रीत जाणे हे कधीच शक्य नसते. शिवाय क्रिमचा अति प्रयोग करणेही त्वचेसाठी चांगले नसते. त्यामुळे तुम्ही याचा उपयोग पिंपल्स आल्यानंतर एक दिवस आड असा करा. शक्यतो रात्री झोपताना या क्रिम्सचा वापर करा. जर तुम्हाला खाज किंवा पुरळ आल्यासारखे वाटत असतील तर याचा वापर करणे सोडून द्या.

पिंपल्सना करा bye bye या सोप्या उपायांनी (Tips To Avoid Pimples In Marathi)

Skin Care

Melabest Cream 15 gm

INR 133.58 AT Mankind Pharma Ltd

Skin Care

Yuglan Cream

INR 238 AT Yash Pharma Laboratories Pvt Ltd

युक्रोमा Kj (Eukroma)

पिंपल्सवर दुसरी क्रिम जी कमाल काम करते ती म्हणजे युक्रोमा. या क्रिममध्ये Hydroquinone असते. याचा उपयोग तुमच्या त्वचेवरील डार्क पॅचेस कमी करण्यासाठी केला जातो. पण ही क्रिम तुमच्या पिंपल्ससाठीही उपयोगी आहे. अनेकांना चेहऱ्यावर येणारे पिंपल्स हे फार मोठे असतात. त्यांच्यामध्ये पू देखील साचतो. अशांनी या क्रिमचा वापर फक्त पिंपल्सवर करावा. तुमचे पिंपल्स क्रिममुळे सुकण्यास मदत मिळते. आता तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार आणि तुमच्या हिलिंग प्रोसेस नुसार या क्रिम काम करतात. काहींना अगदी एक ते दोन दिवसात याचा फरक जाणवतो. तर काहींना थोडा वेळही लागू शकतो. 

ही घ्या काळजी: कोणत्याही क्रिमचा अति वापर तुमच्या त्वचेसाठी त्रासदायक ठरु शकतो. त्यामुळे युक्रोमा लावतानाही तुम्ही थोडी काळजी घ्यायला हवी. पिंपल्सवर अगदी योग्य प्रमाणात तुम्ही ही क्रिम लावा. या क्रिममध्ये असलेले केमिकल्स तुमच्या त्वचेसाठी जितके चांगले असतात तितकेच त्रासदायकसुद्धा. कारण या क्रिमच्या अति प्रयोगामुळे तुमची त्वचा कोरडी होऊ शकते. त्यामुळे तुम्ही याचा वापर आठवड्यातून तीन वेळा आणि दिवसातून  एकदा करा.

पिंपल्स आल्यानंतर कधीच करु नका या 5 चुका

Skin Care

Yash Eukroma - KJ Cream

INR 312 AT Yash Pharma Laboratories Pvt Ltd

रेटीन A ट्रिटेशन ( Retin A Treatation)

तुम्ही जर गुगल केले तर तुम्हाला ही क्रिम अगदी हमखास मिळू शकेल. पिंपल्सवर काम करणारी ही एक उत्तम क्रिम आहे. तुमच्या चेहऱ्यावरील डेड स्किन काढून त्वचेला नव तजेला देण्याचे काम ही क्रिम करते. तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्सचे डाग, नव्याने येणारे पिंपल्स यांना वेळीच ती कमी करते. सीरम स्वरुपात मिळणारे हे क्रिम लावायला सोपे आहे. हे क्रिम तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने लावले तर फार उत्तम 

ही घ्या काळजी: कोणतेही क्रिम तुम्हाला तुमच्या जखमांवर लावायला सांगितले जात नाही. जर तुमचा पिंपल फुटला असेल तिथे जखम झाली असेल अशावेळी त्यावर तुम्ही क्रिम लावण्याचा अजिबात प्रयत्न करु नका. कारण त्याचा त्रास तुम्हाला जास्त होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही थोडा सल्ला घेऊन ही क्रिम लावा.


आता जर तुम्हाला पिंपल्स आले असतील तर तुम्ही या क्रिम्सचा वापर नक्की करा. तुम्हाला फरक जाणवेल. पण सूचनांचे पालन अगदी योग्य पद्धतीने करा.

Skin Care

A-Ret 0.05% Gel

INR 108 AT Menarini India Pvt Ltd