फक्त केळी आणि चॉकलेटपासून बनवा हेल्दी आईस्क्रिम

फक्त केळी आणि चॉकलेटपासून बनवा हेल्दी आईस्क्रिम

घराबाहेर पडता येत नाही. बाहेर फार काही मिळत नाही.त्यात उन्हाळ्याचे दिवस. घरी थंड पाणी पिऊन तरी कितीवेळ राहायचे. आईस्क्रिम खाण्याची इच्छा तर कधी तरी होतेच.आता आईस्क्रिमची तयारी करायची तरी आता या घडीला सगळे सामान उपलब्ध असेल याची खात्री देता येत नाही. जर तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट आईस्क्रिम तयार करायचे असेल तर आम्ही एक रेसिपी शोधून काढली आहे. ही रेसिपी सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. तुम्हाला ही रेसिपी माहीत नसेल तर मग फक्त केळी आणि चॉकलेटपासून बनणाऱ्या या आईस्क्रिमची हेल्दी रेसिपी तुम्हाला माहीत हवी. चला करुया सुरुवात 

अस्सल हापूस आंबे ओळखण्याची ही योग्य पद्धत

असे तयार करा आईस्क्रिम

Instagram

लॉकडाऊनच्या काळात अनेक वेगवेगळ्या रेसिपी समोर येत आहेत. म्हणजे पाणीपुरी, #dalgonacoffee आणि बऱ्याच वेगळया रेसिपी या निमित्ताने अनेकांनी घरात पाहिल्या असतील. बाहेर मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टी घरात करुन पाहिल्या असतील. आता केळ्यापासून तयार होणारे आईस्क्रिम चांगलेच ट्रेंड होत आहे. जाणून घेऊया कमीत कमी साहित्यात ते कसे तयार करावे. 

साहित्य:

4 ते 5 पिकलेली केळी, घरात उपलब्ध असलेले कोणतेही चॉकलेट बार, कोका पावडर (असल्यास), व्हॅनिला इसेन्स (असल्यास उत्तम), दूध आवश्यकतेनुसार 

कृती:

  • केळ्याचे साल काढून त्याचे तुकडे करुन घ्या. एका एअर टाई़ट डब्यात किंवा पिशवीत केळ्याचे तुकडे भरा आणि फ्रिजरमध्ये सेट करायला ठेवा. 
  • केळी पूर्णपणे फ्रोजन होण्यासाठी किमान 4 ते  5 तास लागतात. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणीच फक्त वेळ लागेल. 
  • फ्रिजमधून केळ्याचे तुकडे काढून एका ब्लेंडरमध्ये घ्या. त्यात तुम्हाला आवडणाऱ्या चॉकलेटचे तुकडे ते नसल्यास कोको पावडर घाला. मिक्सीमधून केळं फिरवून घ्या. बर्फाचे खडे ब्लेंड होताना ते अगदी छान स्मुथ होतात. 
  • केळं गोडं असल्यामुळे तुम्हाला त्यात अतिरिक्त साखर घालायची गरज वाटत नाही. जर तुम्हाला केळ वाटताना त्रास होत असेल तर त्यात तुम्ही थोडे दूध नावाला घाला. जर तुम्हाला दूध पावडर घालायची असेल तरी चालेल.
  • आता तुम्ही हे आईस्क्रिम थेट खाऊ शकता. किंवा थोडे सेट व्हायला ठेवू शकता. तुमचे कमीत कमी साहित्यातील आईस्क्रिम तयार आहे. 

घरच्या घरी बनवा व्हॅनिला केक आणि द्या सरप्राईज

हेल्दी आईस्क्रिम

Instagram

आईस्क्रिम खाण्याची अनेकांना भीती असते कारण त्यामध्ये असलेले दूध शरीरातील फॅट वाढवू शकते किंवा त्यामध्ये असलेली साखर ही आरोग्यासाठी घातक असते. अशी भीती तुम्हाला वाटत असेल तर तुमच्यासाठी हे आईस्क्रिम बेस्ट आहे. कारण यामध्ये केळ्याचा गोडवा आहे. यात कोणतीही अतिरिक्त साखर घातलेली नाही. तुम्हाला जेव्हा खूप थंड केव्हा खूप गोड खावेसे वाटेल तेव्हा तुम्ही हे आईस्क्रिम खा. जर तुम्हाला यामध्ये चॉकलेटही नको असेल तर तुम्ही ते गाळले तरी चालेल. 


अशाप्रकारे मस्त आणि झटपट केळ्यापासून तयार करा आईस्क्रिम

झटपट आणि पौष्टिक सँडविच रेसिपीज (Easy Sandwich Recipe In Marathi)


 घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी.