अस्सल हापूस आंबे ओळखण्याची ही योग्य पद्धत

अस्सल हापूस आंबे ओळखण्याची ही योग्य पद्धत

साधारण एप्रिल महिना आला की बाजारात आंबे दिसू लागतात. आंब्याचा राजा म्हणून हापूस आंबा ओळखला जातो. पण आता बाजारात इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे आंबे मिळतात की, खरा हापूस ओळखणे तसे फारच कठीण जाते. हल्ली कोकणातील अनेक गावांमध्ये हापूस आं बे होतात. पण त्या सगळ्यांच्या चवीमध्ये तसा थोडाफार फरक असतो. हापूस आंबा म्हटला की, तो देवगडचा असं सर्वसाधारणपणे म्हटलं जातं. पण रत्नागिरी, मालवण, सिंधुदूर्ग, देवबाग, खेड या ठिकाणी मिळणारे हापूस आंबेही फारच प्रसिद्ध आहेत. अनेकदा पेटी हापूस आंबे म्हणून जी पेटी आपण घेतो. पण मग हे आंबे चवीला तसे लागत नाहीत. मग आपल्याला कळतं की, हे आंबे झाडी असल्याचे कळते. मग आता तुम्ही म्हणाल नेमका हापूस आंबा ओळखायचा कसा. तर आज जाणून घेऊया हापूस आंबा ओळखण्याची योग्य पद्धत

मी घरी बनवल्या बाजारापेक्षाही चांगल्या पाणीपुरीच्या पुऱ्या, जाणून घ्या कशा

आकार

Instagram

आकारावरुन ओरिजनल हापूस आंबा ओळखण्याचीही एक पद्धत आहे. ती सगळ्यांनाच माहीत असते असे नाही. आकाराच्या बाबतीत सांगायचे झाले. तर देवगड हापूस आंब्याचा आकार हा एखाद्या कोयरीप्रमाणे असतो. त्याचे देठ लहान आणि तोंड निमुळतं असतं. रत्नागिरीचा अस्सल हापूस आंबा असेल तर त्याची साल ही जाड असते त्याचे वजन 200 ते 250 ग्रॅमच्या घरात असते.

नाचणीपासून तयार केलेल्या ‘या’ सोप्या आणि पौष्टिक रेसिपीज

रंग

Instagram

रंगावरुन तुम्हाला हापूसचा आंबा ओळखता येत नाही असे वाटत असेल तर तुम्ही थोडी चूक करत आहात. जर तुम्ही अस्सल आंब्याच्या दर्दींना हा फरक विचारला तर ते तुम्हाला अगदी पटकन सांगू शकता. हापूस आंब्याचा रंग हा जरी पिवळसर केशरी असला तरी रत्नागिरी आणि देवगड या दोन्ही आंब्याच्या रंगामध्ये बराच फरक आहे. देवगड हापूस हा देठाकडून छान केशरी रंगाचा असतो. तो जसा पिकत जातो तसा त्याचा रंग अधिक केशरी होत जातो. तर रत्नागिरीमध्ये होणाऱ्या हापूसचा रंग हा पिवळा धम्म्क असतो. तो जसा जास्त पिकत जातो तसा त्याचा रंग अधिक पिवळा होत जातो.

चव

Instagram

प्रत्येक आंब्याची चव ही वेगळी असते. सगळेच आंबे आंबट- गोड असतात. पण हापूसची चव ही थोडी वेगळी असते. हापूस आंबा हा खाल्ल्यानंतर तो थोडा चुरचुरीत लागतो. हा आंबा खाल्यानंतर तुमची जीभ थोडी चुरचुरते. आंबा हा थोडा अॅसिडीक असतो. त्यामुळे त्याची चव थोडी वेगळी लागते. हापूस आंब्यामध्येही रेषा म्हणजे धागे असतात. हल्ली केशल आंब्यामध्येही असे धागे असतात. पण हापूस आंब्यात रेषा फार मोठ्या नसतात. हापूर आंब्याची कोय ही फार मोठी नसते. यामध्ये गर जास्त असतो. ( अनेकदा मोठी कोय असलेले हापूस आंबेही असतात) रत्नागिरीचा हापूस आंबा तुम्ही घ्यायला जाल  तर त्याची कोय मोठी असते. आणि गर कमी असतो.


मग आता आंबा घेताना या  गोष्टींकडे लक्ष द्या आणि या सीझनमध्ये मस्त हापूस आंब्याचा आनंद घ्या. 

घरच्या घरी बनवा 15 मिनिट्समध्ये झटपट रव्याचे गुलाबजाम