बऱ्याचदा घरी जेवण बनवताना अथवा एखाद्या वेळी पूजा करताना हात भाजणं अथवा त्वचा भाजणं हे कॉमन आहे. काही लहान मुलं धांदरटपणा करताना हात भाजून घेतात. पण हे सगळं खूपच त्रासदायक असतं. कारण त्वचेवर एकदा का भाजण्याचा डाग राहिला किंवा त्याचे फोड झाले तर त्याचा प्रचंड त्रास होतो. त्यामुळे जर त्वचा भाजली तर त्वरीत घरगुती उपचार नक्की काय करायला हवेत हे माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण प्रत्येक वेळी डॉक्टरांकडे धाव घेणं शक्य होत नाही. किमान डॉक्टरांकडे जाईपर्यंत तरी त्यावर तातडीने उपचार व्हायला हवेत. त्यासाठी आपल्याला काही मूलभूत घरगुती उपचार माहिती असणं गरजेचं आहे. भाजणं हे अनवधानाने होत असतं. ते रोखणं आपल्या हातात नक्कीच नाही. पण असं झाल्यानंतर त्वरीत उपचारासाठी काय करायला हवं हे माहीत करून घेणं नक्कीच आपल्या हातात आहे. तज्ज्ञांच्या मते भाजल्यानंतर पहिली 15 मिनिट्स ते अर्धा तास हा काळ अत्यंत महत्त्वाच असतो. या कालावधीत आपण घरगुती उपचार योग्य तऱ्हेने करणे अत्यंत आवश्यक असते. आम्ही या लेखातून तुम्हाला असेच काही महत्त्वाचे घरगुती उपचार सांगणार आहोत ज्यामुळे त्वचा भाजल्यावर तुम्ही त्वरीत ते करून त्याची तीव्रता कमी करू शकता.
त्वचा भाजल्यानंतर सर्वात पहिल्यांदा कोल्ड कंप्रेससारखा पर्याय वापरायला हवा. त्यासाठी थंड पाण्यातून पिळून काढलेला स्वच्छ कपडा भाजलेल्या ठिकाणी ठेवा. तुम्हाला होणारी जळजळ आणि त्रासातून हा उपाय नक्की दिलासादायक ठरतो. साधारण 5 ते 15 मिनिट्सच्या अंतरात तुम्ही याचा वापर करू शकता. प्रयत्न करा की, कंप्रेस जास्त थंड असू नये, कारण यामुळे जळजळ अधिक वाढू शकते.
कोणत्याही भाजलेल्या ठिकाणी त्वचेवर तुम्ही सर्वात पहिले अँटीबायोटिक्स औषध अथवा क्रिम लावायला हवे. हे संक्रमण थांबवण्यास मदत करते. तसंच या ठिकाणी औषध लावल्यानंतर हा भाग तुम्ही एका स्वच्छ कपड्याने कव्हर करून घ्या.
जर तुम्हाला थोडंसं भाजलं असेल तर त्यावर व्हॅनिला हा उत्तम घरगुती उपाय आहे. तुम्ही भाजलेल्या त्वचेवर हळूवारपणे व्हॅनिलामध्ये कापूस ओला करून घ्या आणि तो त्या भागावर लावा. व्हॅनिलाचा अर्क हा त्रास कमी करण्यासाठी आणि जळजळ कमी करण्यासाठी उत्तम ठरतो.
कोरफडमध्ये अँटीइन्फ्लेमेटरी गुण आढळतात जे भाजलेल्या त्वचेवर असणाऱ्या बॅक्टेरियांचा विकास करण्यासाठी नियंत्रण आणते. तुमची त्वचा कधी भाजली तर तुम्ही त्वरीत त्यावर कोरफडचे पान अथवा कोरफडमधील जेल काढून लावा. यामुळे होणारी जळजळ कमी होईल. जर तुम्ही बाजारातून कोरफड आणली असेल तर लक्षात ठेवा की, यामध्ये अधिक कलरिंग अथवा सुगंध नसावा. घरात लावलेली कोरफड असेल तर तुम्ही ती तशीच लाऊ शकता.
त्वचा भाजल्यानंतर ब्लॅक टी हादेखील उत्तम घरगुती उपाय आहे. ज्यामुळे जळजळ कमी होते आणि होणारा त्रासही लवकर कमी होतो. काहीच नसेल तर तुम्ही त्वचा भाजल्यावर ब्लॅक टी चा वापर करू शकता. यासाठी तुम्ही दोन अथवा तीन थंड ब्लॅक टी च्या लहान पिशव्या थंड करून भाजलेल्या ठिकाणी लावा.
आग अथवा गरम पाण्याने तुमची त्वचा भाजली असेल तर तुम्ही त्वरीत त्यावर थंड पाणी लावा. हा सर्वात उत्तम उपाय आहे. कमीत कमी 20 मिनिट्स तुम्ही थंड पाण्याची बाटली अथवा बर्फ भाजलेल्या ठिकाणी लावा. यामुळे जळजळ कमी होऊन तुम्ही पुढे साध्या पाण्याने धुवा. त्यानंतर पुढचा उपचार करा. किती भाजलं आहे त्यावर पुढील उपचार अवलंबून आहे.
घरगुती सौंदर्यप्रसाधन वापरून घ्या त्वचेची काळजी - तज्ज्ञांचा सल्ला
मध केवळ खोकल्यासाठीच उपयोगी आहे असे नाही. तर आपल्या स्वादासह भाजल्यानंतरही याचा उपयोग करून घेता येतो. वास्तविक मधामध्ये अँटीइन्फ्लेमेटरी, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुण असतात, जे भाजलेल्या त्वचेवर होणाऱ्या जळजळीपासून सुटका मिळवून देतात.
तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल पण जर तुम्हाला सणासुदीला फटाक्यांमुळे त्रास झाला आणि भाजले तर तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता. फटाक्यांनी त्वचा भाजली तर त्याची जखम भरून काढण्यासाठी गाजर हा चांगला पर्याय आहे. गाजर किसून तुम्ही या ठिकाणी लावा. तुम्हाला परिणाम दिसून येईल.
भाजलेल्या ठिकाणी बऱ्याचदा डाग तसेच राहतात. ते नको असतील तर तुम्ही बटाट्याच्या रसाचा वापर करा. केवळ बटाट्याचा रसच नाही तर बटाट्याचे सालही त्यावर चांगला उपाय आहे. एक बटाटा कापून तुम्ही भाजलेल्या ठिकाणी लाऊन ठेवा. प्राथमिक भाजले असेल अथवा फटाक्यांनी भाजले असेल तर तुम्ही हा घरगुती उपाय करू शकता.