म्हणून व्यायाम करताना तुम्ही घालायला हवी स्पोर्ट्स ब्रा... नाहीतर

म्हणून व्यायाम करताना तुम्ही घालायला हवी स्पोर्ट्स ब्रा... नाहीतर

हल्ली अनेकांमध्ये फिटनेसचे वेड निर्माण झाले आहे. चांगल्या फिगरसाठी आणि कायम टवटवीत दिसण्यासाठी अनेक जण अगदी नित्यनेमाने व्यायाम करतात. काही जण नियमित व्यायाम करताना अगदी सगळ्या गोष्टी तंतोतंत पाळतात. पण काही जण ‘चालत ना..एवढं काय त्यात’ असे म्हणत फिटनेसचे काही नियम धाब्यावर बसवतात. चुकीची व्यायाम पद्धत, चुकीचे खाणे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे व्यायाम करताना चुकीचे कपडे घालणे. मी अनेकांना जीममध्ये देखील असे चुकीचे कपडे व्यायाम करताना पाहिले आहे. रोजच्या कपड्यांमध्ये घातली जाणारी ब्रा अनेक जण व्यायामाच्या वेळी वापरतात. अन्यथा स्तन सैलसर होतात आणि त्याचा त्रास होतो. तुम्ही अगदी घरी जरी व्यायाम करत असाल तर तुम्हाला स्पोर्ट्स ब्रा घालणे फारच महत्वाचे आहे. आज आपण या स्पोर्ट्स ब्रा घालण्याचे फायदे जाणून घेणार आहोत. शिवाय जर तुम्ही घालत नसाल तर तुम्हाला होणारे तोटे देखील सांगणार आहोत.

असा होतो फायदा

shutterstock

जर तुम्ही स्पोर्ट्स ब्रा अजिबात कधीच घातली नसेल तर बाजारातून चांगल्या प्रतीची स्पोर्ट्स ब्रा निवडा. त्यामुळे तुम्हाला अनेक फायदे होऊ शकतात. ज्यांचा स्तनांचा आकार मोठा आहे अशांनी तर व्यायाम करताना हमखास स्पोर्ट्स ब्रा घालायला हवी. स्पोर्ट्स ब्रा तुम्हाला नक्की काय फायदा देते ते जाणून घेऊया 

 1.  व्यायाम करताना तुमच्या स्तनांची हालचाल होते. ही हालचाल नियंत्रित आणण्याचे काम स्पोर्ट्स ब्रा करते. 
 2. तुमच्या स्तनांची अतिरिक्त हालचाल रोखण्यासोबतच तुमच्या स्तनांना आवश्यक असा आधारही स्पोर्ट्स ब्रा देते. तुमच्या इतर ब्रा च्या तुलनेत तुमच्या स्पोर्ट्स ब्राचे पट्टे मोठे असतात त्यामुळे चांगला सपोर्ट मिळतो. 
 3. छातीची खूप हालचाल झाली की, तुम्हाला उगाचच छातीत दुखल्यासारखे होते. पण जर तुम्ही स्पोर्ट्स ब्रा घातली तर तुम्हाला हा त्रास होत नाही.
 4. काही वेळा व्यायामाचे काही प्रकार करताना तुमची रोजची ब्रा योग्य व्यायाम करण्यास असमसर्थ ठरते. कारण काहींना ब्रा फार सैल तर काहींना फारच घट्ट ब्रा घालण्याची सवय असते. त्यामुळे तुमच्या स्तनांवर अतिरिक्त ताण पडू शकतो. 
 5. स्पोर्ट्स ब्रा तुमच्या स्तनांना योग्य आकारात ठेवते. तुमच्या स्तनांना उभारी देण्याचे काम स्पोर्ट्स ब्रा योग्य करते म्हणूनच तुम्ही स्पोर्ट्स ब्रा घालायला हवी. 

स्तनांचे असतात वेगवेगळे प्रकार, सर्वांनाच नसते याची माहिती

स्पोर्ट्स ब्रा घालत नसाल तर…

shutterstock

आता जर स्पोर्ट्स ब्रा चे फायदे वाचूनही तुम्ही जर स्पोर्ट्स ब्रा घालत नसाल तर तुम्हाला यामुळे तुमच्या स्तनांना होणारा त्रासही माहीत हवा. 

 •  जर तुम्ही स्पोर्ट्स ब्रा घालत नसाल तर तुमच्या स्तनांचा आकार बदलू शकतो. तुमचे स्तन सैल पडू शकतात. 
  तुमच्या स्तनांकडे असलेले लिगामेंट फाटण्याची शक्यता असते. 
 • व्यायामामुळे तुमचे स्तन आकर्षक होतात हे माहीत असेलच पण जर तुम्ही स्पोर्ट्स ब्रा घातली नाही तर तुमच्या स्तनांचा आकार बदलू शकतो. 
 • जर तुम्ही ट्रे़डमिलवर धावत असाल तर अशावेळी तुमच्या स्तनांची हालचाल खाली-वर होत असते. जर तुम्ही स्पोर्ट्स ब्रा घातली नाही तर तुमचे स्तन दुखू शकतात. 
 • स्पोर्ट्स ब्रा ही तुमच्या व्यायामासाठी खास पद्धतीने बनवलेली असते. तर तुमची रोजची ब्रा ही तुमच्या दिवसभरासाठी असते त्यामुळे तुम्ही या दोघांमध्ये गल्लत केली तर त्याचा त्रास तुमच्या स्तनांना होणे अगदी स्वाभाविक आहे. 

आता जर तुम्ही व्यायाम करत असाल अगदी घरीही व्यायाम करत असाल तर तुम्हाला स्पोर्ट्स ब्रा घालणे फारच आवश्यक आहे. 

सेक्स करताना पुरुष पाहतात स्तनांचा आकार? वाचा नेमकं काय वाटतं पुरुषांना

 घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा.