3 मे 2020 चं राशीफळ, सिंह राशीच्या लोकांना धनलाभ

3 मे 2020 चं राशीफळ, सिंह राशीच्या लोकांना धनलाभ

मेष - राजकारणात मजबूत स्थान मिळेल

आज तुमच्या शैक्षणिक समस्या कमी होतील. राजकारणातील पकड मजबूत होईल. धुर्त लोकांपासून सावध राहा. कौटुबिक कलहापासून दूर राहा. अध्यात्म आणि योगातील रस वाढेल.


कुंभ - जोडीदाराला शारीरिक समस्या होण्याची शक्यता

जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. बिघडलेली कामे सुधारणार आहेत. कामाच्या ठिकाणी अधिकारी तुमचे कौतुक करणार आहेत. आत्मसन्मान वाढेल. धार्मिक कार्यातील रस वाढणार आहे. 


मीन- कुटुंबाची साथ मिळेल

आज तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीची साथ मिळणार आहे. संकटकाळात तुमचे कुटुंब तुमच्यासोबत असेल. आरोग्याची काळजी घ्या. कोर्ट कचेरीतून सुटका मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. 

 

वृषभ - आर्थिक स्थिती बिघडण्याची शक्यता

आज खर्च वाढल्यामुळे तुमचे आर्थिक गणित बिघडू शकते. घाई घाईत कोणतेही काम करू नका. विरोधकांपासून सावध राहा. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल. मित्रांची भेट होऊ शकते.


मिथुन - जुन्या आजारपणातून सुटका मिळेल

आज जु्न्या आजारपणातून तुम्हाला सुटका मिळण्याची  शक्यता आहे. आर्थिक समस्या सुटतील. घरात मंगल कार्य घडू शकते. व्यवसायातील समस्या दूर होतील. रखडलेली कामे पूर्ण होतील. 


कर्क - जोडीदाराचा तणाव वाढणार आहे

जोडीदाराचा ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे. आरोग्य आणि सामाजिक प्रतिष्ठेची काळजी घ्या. व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. देणी - घेणी सांभाळून करा. अध्यात्मातील रस वाढणार आहे. 


सिंह - पैशांबाबत चांगली बातमी मिळेल

आज तुम्हाला पैशांबाबत शुभसमाचार मिळेल. जोडीदारासोबत नाते मजबूत होईल. कामाच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे. अध्यात्म आणि योगामधील रस वाढेल. व्यवहार करताना सावध राहा. 


कन्या - मन अशांत होणार आहे

आज तुमच्या जुन्या पोटाच्या समस्या पुन्हा त्रास देतील. मन अशांत होणार आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. विरोधक त्रास देण्याची शक्यता आहे. रचनात्मक कार्यात प्रगती होईल. देणी घेणी सांभाळून करा. 


तूळ - व्यवसायात वाढ

आज तुमच्या भावंडांच्या मदतीने तुमच्या व्यवसायात वाढ होणार आहे. जोडीदाराशी नाते मजबूत होईल. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. लहानसहान आजारपणांकडे दुर्लक्ष करू नका. 

 

वृश्चिक - विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येतील

आज विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडचणी येण्याची शक्यता आहे. उत्पन्न आणि खर्चावर नियंत्रण ठेवा. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. आईवडीलांकडून धनलाभ मिळेल.


धनु - उत्पन्नाचे साधन वाढेल

आज तुम्हाला अचानक उत्पन्नाचे नवीन साधन मिळणार आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. मुलांसोबत रचनात्मक कामे कराल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. आरोग्याची काळजी घ्या.


मकर - विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात लागणार नाही

आज मुलांना अभ्यास करावा असे वाटणार नाही. व्यवसाय आणि नोकरीत समस्या वाढतील. रखडलेली कामे पूर्ण होतील. जोडीदाराची साथ मिळेल. वाहन चालवताना सावध राहा. आरोग्याची काळजी घ्या.