ADVERTISEMENT
home / Natural Care
संवेदनशील त्वचेसाठी ब्युटी टिप्स, अशी घ्या तुमच्या त्वचेची काळजी

संवेदनशील त्वचेसाठी ब्युटी टिप्स, अशी घ्या तुमच्या त्वचेची काळजी

स्कीन केअर अथवा त्वचेची काळजी हा प्रत्येकीसाठी नेहमीच एक संवेदनशील विषय असतो. मात्र ज्यांची त्वचाच अती संवेदनशील (Sensitive skin)असते त्यांच्यासाठी तर हा विषय नक्कीच गंभीर असू शकतो. वास्तविक तुमची त्वचा कोणत्याही प्रकारची असो तुम्हाला तिची नियमित काळजी घेणं गरजेचं आहे. शिवाय त्यासाठी डेली स्कीन रूटीन पाळणं, आहाराबाबत दक्ष राहणं, नियमित व्यायाम करणं आणि त्वचा डिटॉक्स करण्यासाठी भरपूर पाणी पिणं हे ओघाने आलंच. मात्र जर तुमची त्वचा नाजूक असेल तर मात्र तुम्हाला तिची नेहमीपेक्षा जास्त निगा राखणं गरजेचं आहे.

Shutterstock

संवेदनशील त्वचेची काळजी घेणं का आहे गरजेचं

संवेदनशील त्वचेच्या लोकांनी त्वचेची नियमित काळजी घ्यायला हवी. कारण धुळ, माती, प्रदूषणाचा तुमच्या त्वचेवर विपरित परिणाम होऊ शकतो. शिवाय अशा प्रकारच्या त्वचेवर कोणतेही क्रीम, लोशन अथवा मेकअप प्रोडक्ट वापरण्याापूर्वी आधी नीट विचार करावा लागतो. कारण त्यातील केमिकल्स तुमच्या त्वचेला सूट होतीलच असं नाही. बऱ्याचदा उष्णता, थंडी, वातावरणातील बदल यांच्यामुळेही तुमच्या त्वचेचं नुकसान होऊ शकतं. म्हणून अशा त्वचेच्या लोकांनी नियमित काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत काही ब्युटी टिप्स शेअर करत आहोत. ज्यामुळे तुम्हाला त्वचेची निगा राखणं नक्कीच सोपं जाईल.

ADVERTISEMENT

Shutterstock

संवेदनशील त्वचेसाठी ब्युटी टिप्स –

जर तुमची त्वचा अती संवेदनशील असेल तर तुम्ही डेली स्कीन केअर सोबत या गोष्टी नेहमी लक्षात ठेवायला हव्या.

  • सर्वात महत्वाचं म्हणजे  मुबलक पाणी प्या. पाण्यामुळे तुमची त्वचा डिटॉक्स होते. शरीराप्रमाणेच तुमच्या त्वचेलाही पाण्याची फार गरज असते. तज्ञ्ज सांगतात, प्रत्येक ऋतूत दिवसभरात आठ ते दहा ग्लास पाणी पिणं फार गरजेचं आहे. ज्यामुळे त्वचेतील विषद्रव्ये बाहेर टाकली जातात आणि त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो. 
  • रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा आणि त्यावर एखादं सौम्य मॉश्चराईझर लावा. ज्यामुळे रात्री त्वचेला पुरेसा आराम मिळेल.
  • कोणतेही नवीन सौदर्योत्पादन वापरण्यापूर्वी  त्यावरील लेबल अवश्य वाचा. ते उत्पादन तुमच्या त्वचेसाठी योग्य आहे का याची आधीच खात्री करून घ्या. चेहऱ्यावर सौदर्योत्पादनाचा वापर करण्यापूर्वी त्याची पॅच टेस्ट घ्या. जेणेकरून तुमच्या त्वचेचं नुकसान होणार नाही. 
  • चेहरा अती गरम अथवा अती थंड पाण्याने कधीच धुवू नका. कारण यामुळे तुमच्या त्वचेचे  पोअर्स ओपन होण्याची शक्यता असते. जर असे झाले तर तुमच्या त्वचेला खाज येऊ शकते. म्हणूनच नेहमी सामान्य तापमान अथवा कोमट पाण्याने चेहरा धुवा. 
  • त्वचेवर केमिकलयुक्त प्रोडक्टचा वापर करण्याऐवजी होममेड अथवा घरी नैसर्गिक पदार्थांपासून तयार केलेले उपचार करा. 
  • चेहरा धुताना अथवा पुसताना तो रगडू नका. हलक्या हाताने आणि अलगद त्वचेवर मसाज करा. कारण संवेदनशील त्वचेवर याचे लगेच व्रण उठू शकतात अथवा ती यामुळे लालसर होऊ शकते.
  • पार्लरमध्ये कोणतीही ब्युटी ट्रिटमेंट घेण्यापूर्वी ब्युटीशिअनला तुमची त्वचा संवेदनशील आहे याची जाणीव करून द्या.  
  • आहाराबाबत सावध राहा. कारण चुकीच्या आहारामुळे तुमच्या त्वचेचं नुकसान होऊ शकतं. यासाठी अती तेलकट, मसालेदार आणि प्रक्रिया केलेले पदार्थ कमी प्रमाणात खा. त्याऐवजी ताजी फळं, हिरव्या पालेभाज्या, सॅलेडचे प्रमाण वाढवा. 

खूप दिवसांपासून तुमची आमची भेट झाली नव्हती. पण आजपासून गॉसिप, मेकअप टीप्स आणि तुमच्या आवडीचे सगळे विषय घेऊन POPxo marathi येत आहे.

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

तांदूळ पीठ वापरा आणि त्वचा बनवा अधिक उजळ

गुलाबपाणी… त्वचा आणि केसांचं सौदर्य खुलवणारा नैसर्गिक उपाय!

निरोगी त्वचेसाठी ब्युटी टिप्स (Beauty Tips For Skin In Marathi)

ADVERTISEMENT
01 Jul 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT