पाळीव प्राणी पाळणं हे नक्कीच सुखावह असू शकतं पण ते सहज सोपं असेल असं मुळीच नाही. तुम्ही ‘पेट स्टोअर’ मध्ये जाऊन कोणत्याही प्राण्याला तुमच्या घरात आणू शकत नाही. त्याआधी तो पाळीव प्राणी तुम्ही पाळू शकता का हे तुम्हाला माहीत असायला हवं. प्रत्येक माणसाच्या राशीचा एक स्वभावधर्म असतो. तो तुम्ही पाळत असलेल्या प्राण्यांच्या स्वभावधर्माशी जुळला तरच हे प्राणी पाळणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. यासाठीच कोणताही प्राणी पाळण्यापूर्वी तो तुमच्या राशीसाठी अनुकूल आहे का हे अवश्य पाहावं. यासाठीच जाणून घ्या घरात कोणते प्राणी पाळणं तुमच्या राशीनुसार ठरेल उत्तम…
मेष – (21 मार्च – 19 एप्रिल)
मेष राशीची माणसं ही नेहमीच स्वावलंबी आणि सक्रीय असतात. कारण मेष राशीचे असल्यामुळे त्यांच्यामध्ये प्रचंड ऊर्जा असते. मात्र असं असुनही एखाद्या प्राण्याची देखभाल करताना ते लवकर कंटाळू शकतात. म्हणून मेष राशीच्या लोकांनी कुत्रा पाळावा. कारण तुमच्या या मित्रासोबत तुम्ही सकाळचा आणि रात्रीचा वॉक करू शकता. त्याचप्रमाणे तुमच्यासाठी पक्षीदेखील लकी ठरू शकतात.
वाचा – Trending Dog Names Male Marathi
वृषभ – ( 20 एप्रिल – 20 मे)
वृषभ राशीची माणसं हुशार, प्रेमळ पण थोडी हट्टी आणि हेकेखोर असतात. त्यांना ऐशोआराम आणि नोकरचाकर अशी जीवनशैली आवडत असते. कामामध्ये आळसी असलेल्या वृषभ राशीसाठी मांजर पाळणं शुभ ठरू शकतं. त्याचप्रमाणे ससा आणि कुत्रादेखील या राशीचे लोक पाळू शकतात.
मिथुन -(21 मे – 21 जून)
मिथुन राशीची माणसं प्रामाणिक असूनही थोडीशी असंयमी आणि अस्वस्थ असतात. त्यांना आयुष्यात स्वातंत्र्य आणि निरनिराळे बदल हवे असतात. म्हणूनच अशा लोकांनी पोपट पाळावा. ज्यामुळे तुम्ही सतत त्याच्यासोबत निरनिराळ्या गप्पा मारू शकता. पोपट हा एक हुशार पक्षी असल्यामुळे तुमचे त्याच्यासोबत नक्कीच चांगले जमू शकते. शिवाय पोपटामुळे तुमचे सतत मनोरंजनदेखील होऊ शकते. मिथुन राशीच्या लोकांनी माकड पाळण्यामुळे त्यांना चांगला फायदा मिळू शकतो.
कर्क -(22 जून – 22 जुलै)
कर्क राशीची माणसं थोडीशी संवेदनशील आणि मूडी असतात. मात्र त्यासोबतच ती फारच प्रेमळ आणि प्रामाणिक असतात. त्यामुळे कर्क राशीच्या लोकांनी हॅमस्टर्स पाळावेत. कारण अशा छोट्या प्राण्यांची ते नीट आणि जाणिवपूर्वक काळजी घेऊ शकतात. कर्क राशीच्या लोकांचे उंदीर आणि गिनीपिगसोबतही छान जुळू शकते.
सिंह – (23 जुलै- 22 ऑगस्ट)
सिंह रासीची माणसं आत्मविश्वासू आणि ध्येयवादी असतात. शिवाय सिंह रास मांर्जारजातीच्या जातकुळीत मोडत असल्यामुळे तिचे मांजरीशी नक्कीच चांगले जमते. शिवाय सिंह राशीची माणसं थोडी आळशीदेखील असतात. सिंह राशीच्या लोकांनी घोडा पाळावा तो त्यांच्यासाठी नक्कीच लकी ठरू शकतो. आजकालच्या जीवनशैलीत घोडा पाळणं शक्य नसलं तरी तुम्ही त्याचे मित्र नक्कीच होऊ शकता.
कन्या -(23 ऑगस्ट – 22 सप्टेंबर)
कन्या राशीची माणसं मदतशील असतात. त्यांची निरिक्षणक्षमता चांगली असते. मात्र असं असूनही ती थोडी चिडखोरदेखील असतात. त्यामुळे त्यांना प्राणी पाळणं आणि त्यांची निगा राखणं जमेलच असं नाही. यासाठीच या राशीच्या लोकांनी मासे पाळावेत. कारण माशांची काळजी नक्कीच कमी घ्यावी लागते.
तूळ- (23 सप्टेंबर – 22 ऑक्टोबर)
तूळ राशीची माणसं शांत आणि काळजी घेणारी असतात. मात्र त्यांना असेच प्राणी आवडतात जे दिसायसा चांगले असतील आणि त्यांच्या घरी येणाऱ्या लोकांना घाबरवणार नाहीत. यासाठीच त्यांनी मांजर पाळावी.
वृश्चिक -(23 ऑक्टोबर – 21 नोव्हेंबर)
वृश्चिक राशीची माणसं थोडी हटके आणि इतरांपेक्षा वेगळी असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी पाळीव प्राणीदेखील तसेच असायला हवे. या राशीची माणसं कितीही ध्येयवादी आणि मेहनती असली तरी त्यांना आयुष्यात एकटंच जगावं लागतं. त्यामुळे या राशीच्या लोकांनी मांजर, बेडूक, साप असे प्राणी पाळावेत.
धनु -(22 नोव्हेंबर – 21 डिसेंबर)
धनु राशीच्या लोकांना प्रवास करायला आणि जगभर फिरायला आवडतं. त्यामुळे अशा लोकांना पाळीव प्राणी पाळणं शक्यच नसतं. धनु राशीने मासे पाळावेत.
मकर -(22 नोव्हेंबर – 21 डिसेंबर)
मकर राशीची माणसं जबाबदार आणि संयमी असतात. यायाच अर्थ असा की ते कोणत्याही प्राण्याची व्यवस्थित काळजी घेऊ शकतात. सर्व प्रकारचे प्राणी या राशीची लोक नक्कीच पाळू शकतात.
कुंभ -(20 जानेवारी – 18 फेब्रुवारी)
कुंभ राशीची माणसं हुशार असतात शिवाय विनोदबुद्धीदेखील असतं. सुरूवातीला या राशीच्या लोकांना प्राणी पाळणं आवडत नाही. पण त्यांनी त्यांचा विचार बदलला तर ते एक चांगले प्राणी मित्र होऊ शकतात. पक्षी आणि प्राणी दोन्हीही पाळणं त्यांच्यासाठी सोयीचं असू शकतं.
मीन -( 19 फेब्रुवारी – 20 मार्च)
मीन राशीची माणसं दयाळू आणि एकनिष्ठ असतात. शिवाय ते अतीसंवेदनशीलही असू शकतात. त्यामुळे या राशीच्या लोकांनी मासे पाळावे. त्याचप्रमाणे कुत्रा आणि गिनीपिग पाळणं त्यांना नक्कीच आवडू शकतं.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
राशीनुसार निवडा तुमचे करिअर (Choose career according your zodiac in Marathi)
तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा ‘आई’ आहात