कोरोनामुळे आपण सगळेच घरात अडकून पडलो आहोत. #MissionBeginAgain सुरु झाले असले तरी अजूनही अनेकांनी लहान मुलांना बाहेर जाण्याची परवानगी दिलेली नाही. ऑनलाईन शाळा आणि दिवसभर घरात बसून मुलंही कंटाळली आहेत. दिवसभर पालक #workfromhome करतात. त्यामुळे त्यांच्याकडेही मुलांसाठी म्हणावा असा वेळ नसतो. त्यामुळे मुलांना अधिकच कंटाळा येतो. एरव्ही आई-बाबा कधी घरी येतील याची वाट पाहणारे आता घरात पालकांसोबत राहूनही कंटाळले आहेत. या सगळ्यामधून वेळ काढून तुम्हाला तुमच्या मुलासोबत वेळ घालवणे फारच गरजेचे आहे. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी असे काही सोपे खेळ आणले आहेत. ते तुम्ही अगदी घरबसल्या पटकन खेळू शकता. यासाठी खूप साहित्य लागणार नाही याची खात्री आमची.. पण तुम्ही तुमच्या मुलांसाठी रोज थोडा वेळ या खेळांसाठी काढणे गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊया कुटुंबासोबत घरीच बसून खेळता येतील असे सोपे खेळ
डॉट्स आणि बॉक्स (Dots And Boxes)
घरी बसून खेळण्यासारखा एकदम सोपा खेळ म्हणजे ‘डॉट्स आणि बॉक्स’ यासाठी तुम्हाला फार साहित्य लागणार नाही.
साहित्य: एक मोठा कागद, पेन/पेन्सिल
असा खेळा खेळ:
- एक मोठा पेपर घेऊन रांगोळीसाठी आपण ज्याप्रमाणे ठिपके काढतो तसे ठिपके काढून घ्या.
- आता तुम्हाला हा खेळ खूप वेळ खेळायचा असेल तर तुम्ही पूर्ण पानभर काही अंतरावर ठिपके काढू शकता.
- आता खेळाची सुरुवात करताना तुम्हाला दोन ठिपके जोडून रेष काढायची आहे.
- रेष काढताना तुम्हाला त्यापासून एक चौकोन कसा बनेल या कडे लक्ष द्यायचे आहे. रेषा काढताना तुम्हाला समोरच्या पार्टनरचा चौकोन होऊ द्यायचा नाही.
- हा खेळ खूप वेळ चालू शकतो. ज्याचा बॉक्स होईल त्याने त्या बॉक्समध्ये त्याच्या नावाचे आद्याक्षर टाकायचे. हा खेळ खेळण्यातही एक मजा आहे.
#COVID 2019: या काळात ध्यान साधना करुन मिळवा मन:शांती (Meditation Benefits In Marathi)
विचार करा (Thinking Games In Marathi)
मुलांची बुद्धिमत्ता वाढवून त्यांच्यामध्ये विचार करण्याची क्षमता वाढवणारा असा हा खेळ आहे.
साहित्य: यासाठी तुम्हाला काहीही लागणार नाही.
असा खेळा हा खेळ :
- गोलाकार बसून तुम्हाला एका शब्दाने सुरुवात करायची आहे.
- तुम्ही नाव नाव खेळत असाल तर तुम्ही एक नाव घ्या. पुढच्याने शेवटच्या अक्षरापासून एखादे नाव घ्यावे.
- तुम्ही हा खेळ कधीही थांबवू शकता.
लहानपणीचा हा खाऊ तुमच्या आठवणी करेल ताज्या
बॉटल फिरवा (Spin The Bottle)
बॉटल फिरवण्याचा हा खेळ तसा जुनाच आहे. यासाठी तुम्हाला फक्त बॉटल लागेल.
साहित्य: कोणतीही बॉटल
असा खेळा खेळ :
- गोलाकार बसून तुम्हाला हा खेळ खेळावा लागतो.
- बॉटल गोलाकार फिरवून ज्याच्याकडे बॉटलचे तोंड येईल. त्याला तुम्ही एखादा टास्क द्या.
नाव, गाव, फळ, फूल (Name Game)
नाव, गाव, फळ, फूल हा खेळ तुम्ही अनेकदा खेळला असेल. हा खेळ तुम्ही अनेकदा खेळलाही असेल. हा खेळ खेळण्यासाठीही तुम्हाला फार साहित्य लागणार नाही.
साहित्य: पेपर, पेन/पेन्सिल
असा खेळा खेळ:
- एक पेपर घेऊन त्यावर नाव, गाव, फळ, फूल, रंग, वस्तू असे कॉलम आखा.
- आता तुम्ही यामध्ये आणखी काही गोष्टी टाकू शकता आणि कॉलम वाढवू शकता. हा खेळ बुद्धीचा खेळ आहे.
- खेळणाऱ्यापैकी एकाने किंवा न खेळणाऱ्या व्यक्तिने एक अक्षर द्यावे. अक्षर दिल्यानंतर पटकन त्या अक्षरावरुन सगळे कॉलम भरायला घ्यावे. ज्याचे पहिले होईल त्याने हात वर करुन सांगावे आणि बाकी सगळ्यांनी लिहिणे थांबवावे.
- तपासतना प्रत्येकाने काय काय लिहिले ते सांगावे. जर एखादा शब्द जर दोन जणांनी किंवा दोघांपेक्षा जास्त जणांनी लिहला असेल तर ठरवलेल्या गुणांपेक्षा अर्धे गुण देण्यात यावे. उदा. 10 गुण नवीन नावाला, 5 गुण सारख्या लिहलेल्य शब्दाला.
- ज्यावेळी तुम्हाला खेळ थांबवायचा असेल त्यावेळी तुम्ही सगळ्या गुणांची बेरीज करा आणि विजेता ठरवा.
लहान मुलांना वाचनाची गोडी कशी लावाल
फुल्ली आणि गोळा (Cross And Zero)
अगदी लहानपणापासून खेळत आलेला हा खेळ आहे. शाळेतही अनेकांनी चोरुन हा खेळ खेळला असेल. हा खेळ सोपा वाटत असला तरी देखील डोक्याचा आहे. हा खेळ फ्क्त दोघांमध्येच खेळता येऊ शकतो.
साहित्य: पेपर, पेन
असा खेळा खेळ :
- नऊ चौकोन असलेला बॉक्स तयार करा. एकाने सुरुवात करताना X किंवा O लिहा. तुम्हाला रांगेत तीन X किंवा O लिहिणे गरजेचे आहे.
- समोरच्याने दुसऱ्या व्यक्तिंना त्यांचे तीन शब्द रांगेत होऊ द्यायचे नाहीत.
पत्त्यांचा किल्ला (Building A Fort)
पत्त्यांचा किल्ली बनवणे म्हणजे डोक्याला फारच ताण देणारा खेळ असे अनेकांना वाटत असले तरी हा खेळ एकाग्रता आणि संयमाचा आहे. अत्यंत शांतपणे तुम्हाला हा खेळ खेळावा लागतो.
साहित्य: कोणतेही पत्ते
असा खेळा खेळ:
- एक टेबल आणि कोणताही स्तब्ध टेबल घ्या.
- तुम्ही एकावेळी काही पत्त्यांचे वाटप करुन पत्ते किल्ल्याप्रमाणे रचयला घ्या किंवा एकाला आधी संधी द्या. मग दुसऱ्याला पत्त्यांचा किल्ला करण्याची संधी द्या.
लीडरप्रमाणे वागा (Follow The Leader)
मुलांना अभ्यास करण्याचा कंटाळा असेल अशावेळी तुम्ही मुलांसोबत हा खेळ खेळा. तुमच्याप्रमाणे अनुकरण करायला सांगणे असा हा खेळ आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांकडून बऱ्याच चांगल्या गोष्टी करुन घेऊ शकता.
साहित्य: काहीही नाही
असा खेळा खेळ:
- आता तुम्ही एखादी कृती करुन मुलांना तसे करायला लावा. उदा. गाणे गाणे, लिहिणे, चित्र रंगवणे, व्यायाम करणे, नाचणे.
- तुम्ही हा खेळ खेळत असताना मुलांनाही लीडर बनवू शकता. मग ते जसे करतील तसे तुम्हाला करणे भाग आहे. या खेळात मजा तर येते. पण मुलांकडून काही अॅक्टिव्हिटी करुन घेऊ शकता.
स्तब्ध राहा (Freeze)
स्ट्ॅच्यू म्हणत तुम्ही हा खेळ देखील नक्कीच लहानपणी खेळला असेल. मुलं सुद्धा हा खेळ मैदानात आणि घरा राहून खेळू शकता.
साहित्य: फक्त थोडी जागा आणि वाटल्यास एखादं गाणं
असा खेळा खेळ:
- हा खेळ बाहेर खेळण्यासारखा आहे. पण घरी खेळताना तुम्ही याला थोडा ट्विस्ट देऊ शकता. एखादे छान गाणे लावा.आणि मुलांना स्टॅच्यू द्या. तुम्ही कोणत्याही स्टाईलने सुटून घ्या. एकावर राज्य आल्यानंतर तुम्ही गाणं लावा.
- गाणं लावून छान नाचा आणि नाचता नाचता स्टॅच्यू द्या आणि त्यानंतर जर कोणी हलले किंवा हसले की ती व्यक्ती त्या गेममधून आऊट किंवा त्या व्यक्तीवर राज्य
लावा खजिना शोध (Treasure Hunt In Marathi)
मुलांची बुद्धी तल्लख करायची असेल तर हा खेळ अत्यंत मजेशीर आहे. यामध्ये नुसतीच मजा नाही तर तुम्ही त्यांच्याकडून अभ्यासही करुन घेऊ शकता. कसा ते पाहुया
साहित्य: कागद, पेन, एखादे चॉकलेट किंवा मुलांच्या आवडीची कोणतीही वस्तू
असा खेळा खेळ :
- हा खेळ खेळताना तुम्हाला कोडं तयार करावे लागते. तुम्ही मुलांच्या अभ्यासाशी निगडीत कोडी तयार करा. ती कागदावर लिहा.
- असे लिहित असताना तुम्हाला ती वेगवेगळ्या जागी लपवायची आहे. ती जागाही त्या कोड्यामध्ये लिहायला विसरु नका.
- या खेळामध्ये खूप मजा तर येते पण सोबत अभ्यासही होऊन जातो. तुम्ही बेरीज, वजाबाकी, म्हणी असे सगळे काही त्यामध्ये लिहू शकता.
हॉट पोटॅटो (Hot Potato)
आता या खेळाचे नाव ऐकून तुम्ही गोंधळून जाऊ नका. कारण हा खेळ म्हणजे पासिंग द बॉल सारखा आहे. कुटुंबासोबत एकदम धमाल आणणारा हा खेळ आहे.
साहित्य: उशी आणि गाणं
असा खेळा खेळ :
- उशी किंवा अशी कोणतीही वस्तू तुम्ही घ्या. जी तुम्हाला पास करता येईल.
- जी व्यक्ती खेळत नाही. त्याला न पाहता गाणं लावायला सांगा.
- गाणं मध्येच थांबवून तुम्हाला ज्याच्याकडे उशी किंवा ती वस्तू येईल त्याला काहीतरी करायला लावा.
- हा खेळ तुम्ही शेवटी दोन व्यक्ती राहीपर्यंत खेळू शकता.
तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)
1. घरीच आपण काही खेळांचे बोर्ड बनवू शकतो का?
हो, तुमच्या घरी पुठ्ठा, स्केचपेन असे काही साहित्य असेल तर तुम्ही अगदी सहज बोर्ड बनवू शकता. लुडो, बुद्धीबळ, सापशिडी अशा काही खेळांचे बोर्ड तुम्हाला सहज बनवता येतात. तुम्हाला बोर्ड बनवता येत नसेल तर तुम्ही गुगल करुन तुम्ही त्याचे फोटो काढून घरीच खेळांचे बोर्ड बनवू शकता.
2. लहान मुलांसाठी व्हिडिओ गेम चांगला आहे का?
टेक्नॉलॉजीची मुलांशी ओळख करुन देणे अत्यंत गरजेचे असते. त्यामुळे मुलांना व्हिडिओ गेम्स ही तुम्ही खेळायला द्यायला हवा. पण हल्ली असे काही चॅलेंजिग व्हिडिओ गेम असतात ज्यामुळे मुलांमध्ये नाहक स्पर्धा वाढत राहते. ते तासंनतास व्हिडिओ गेम खेळत राहतात. त्यामुळे मुलांसाठी टेक्नॉलॉजी समजण्याच्या दृष्टिकोनातून व्हिडिओ गेमची ओळख करुन द्या पण त्यांना जास्त खेळूही देऊ नका.
3. इंडोर गेम्स खेळण्यासाठी जास्त जागा लागते का?
काही खेळांसाठी जागा ही नक्कीच लागते. पण तुमच्याकडे जागा नसेल तर तुम्ही काही बैठे खेळ आरामात खेळू शकता. त्याला जागा फार लागत नाही. घरातील कोणत्याही कोपऱ्यात बसून तुम्ही हे खेळ खेळू शकता.
आता तुमच्या मुलांसोबत तुम्हाला काही सोपे मजेदार खेळ खेळायचे असतील तर आम्ही सांगितलेल्या काही खेळांपैकी मजेशीर खेळ नक्की खेळा.