ADVERTISEMENT
home / Diet
डार्क की मिल्क कोणते चॉकलेट शरीरासाठी चांगले, जाणून घ्या खरे फॅक्टस

डार्क की मिल्क कोणते चॉकलेट शरीरासाठी चांगले, जाणून घ्या खरे फॅक्टस

 

चॉकलेट, लाईम ज्यूस, आईस्क्रिम, टॉफिया माधुरीचं हे गाणं कानावर पडलं तरी हे सगळे गोडधोड पदार्थ खाण्याची इच्छा होते. हल्ली डाएट किंवा बदलत्या लाईफस्टाईलमुळे सगळीचजण फिट कसे राहू याकडे लक्ष देतात. त्यामुळे साखरेचे पदार्थ नको रे बाबा असेच लोकांना वाटते. पण त्यातल्या त्यात अनेकांना चॉकलेटचा मोह काही केल्या टाळता येत नाही. पण त्यातल्या त्यात हल्ली मिल्क चॉकलेटला पर्याय म्हणून अनेक जण डार्क चॉकलेटचा पर्याय स्विकारतात. पण खरचं डार्क चॉकलेट चांगलं असता का? मिल्क आणि डार्क चॉकलेटपैकी कोणते चॉकलेट शरीरासाठी चांगले असते ते जाणून घेऊया. म्हणजे तुम्हालाही कोणते चॉकलेट खायला हवे ते कळेल.

DIY : घरीच नैसर्गिक पद्धतीने तयार करा कुंकू

मिल्क चॉकलेटचा होऊ शकतो त्रास

मिल्क चॉकलेट

Instagram

 

मिल्क चॉकलेट कोणाला आवडत नाही. चवीला गोड आणि मस्त लागणारे चॉकलेट एखादे खाल्ले किंवा प्रमाणात खाल्ले तर ठीक. कारण त्याचा त्रास तुमच्या आरोग्याला होत नाही. पण जर तुम्ही सतत गोड चॉकलेट्सचे सेवन करत असाल तर तुम्हाला थोडी खबरदारी घेण्याची गरज आहे. कारण मिल्क चॉकलेटमध्ये साखरेचे प्रमाण खूप असते. त्याच्या अती सेवनामुळे तुमच्या शरीरातील फॅटचे प्रमाण वाढते. यातून मिळणाऱ्या प्रोटीनचे प्रमाण फारच कमी असते. त्यामुळे त्यापासून तुम्हाला काहीच फायदा मिळत नाही. पण तुम्हाला अॅसिडीटी वाटत असेल, चक्कर आल्यासारखे किंवा थोडीशी डोकेदुखी होत असेल तर तुम्ही अशावेळी चॉकलेटचा एखादा छोटा तुकडा चघळू शकता. 

ADVERTISEMENT

पण याचे अती सेवन तुमच्या शरीरासाठी चांगले नाही हे मात्र नक्की!

जाणून घ्या त्वचेवर स्कीन केअर प्रॉडक्ट लावण्याची योग्य वेळ

डार्क चॉकलेटचे सेवन ठरते फायद्याचे

डार्क चॉकलेटचे फायदे

Instagram

 

हल्ली अनेक प्रकारचे डार्क चॉकलेट मिळतात. यामध्ये तुम्हाला शुगर फ्रीचा पर्यायही मिळतो. डार्क चॉकलेट हे चवीला कडवट असते. यामध्ये अनेक पर्याय हल्ली मिळतात. अगदी 55% कोकोआ पासून ते त्याहून अधिक कडवट चवीची चॉकलेट यामध्ये मिळतात. अनेक न्युट्रिशनिस्ट डाएटवर असतानाही डार्क चॉकलेट खाण्याचा सल्ला देतात. डार्क चॉकलेटमध्ये अॅडेट शुगरचे प्रमाण मिल्क चॉकलेटच्या तुलनेत कमी असते. डार्क चॉकलेट खाण्याचे काही फायदे आहेत ते जाणून घेऊया. 

ADVERTISEMENT
  • डार्क चॉकलेट तुमचा रक्तपुरवठा सुरळीत करण्याचे काम करते. 
  • ह्रदयासंदर्भातील सगळ्या आजारांपासून डार्क चॉकलेट तुम्हाला दूर ठेवते. 
  • डार्क चॉकलेटमधील अँटीऑक्सिडंट तुमच्या आरोग्यासाठी फारच फायदेशीर असतात.
  • तुमच्या मेंदूला चालना देण्याचे कामही डार्क चॉकलेट करते. 
  • डार्क चॉकलेटचा एक वेगळा फायदाही आहे. तपासाअंती असे सिद्ध झाले आहे की, डार्क चॉकलेटच्या सेवनामुळे तुमच्या त्वचेवर एक सुरक्षा कवच तयार होते त्यामुळे तुमची त्वचा काळवंडत नाही. 
  • डार्क चॉकलेचे फायदे वाचून तुम्ही जर डार्क चॉकलेट खाण्याचा प्रयत्न करत असाल तर त्याचेही प्रमाण आहे. तुम्ही एका दिवसाला फक्त 100 ग्रॅमच डार्क चॉकलेट खाऊ शकता. 

आता तुम्हाला डार्क आणि मिल्क कोणते चॉकलेट चांगले हे समजले असेलच.तुम्हीही याचे अगदी बिनधास्त सेवन करायला घ्या.

केसाला येणारा दुर्गंध दूर करण्यासाठी करा सोपे घरगुती उपाय

07 Jul 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT