घरात एखादी पार्टी अथवा कार्यक्रम असेल तर काचेची स्टायलिश आणि लक्झरी भांडी अधिक चांगला लुक मिळवून देतात. पण काचेची भांडी सांभाळणं म्हणजे सर्वांसाठी थोडं कठीणच आहे. काचेच्या भांड्यांची चमक ही काही कालावधीनंतर निघून जायला लागते आणि काचेवर अधिक मळ बसून ती भांडी जुनी वाटू लागतात. याची साफसफाई करायची असेल तर अतिशय नाजूकपणे ही भांडी हाताळावी लागतात. तसंच याची चमक ठेवण्यासाठीही तुम्हाला याची व्यवस्थित काळजी घ्यावी लागते. काचेची भांडी नेहमी चकचकीत दिसावीत यासाठी आम्ही तुम्हाला काही घरगुती टिप्स सांगणार आहोत. तुम्ही याचा वापर केल्यास, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसंच तुमची काचेची भांडी जास्त काळ टिकतील आणि तुम्हाला ती व्यवस्थित जपूनही ठेवता येतील. जाणून घेऊया काचेची भांडी चमकदार ठेवण्यासाठी काय आहेत सोप्या टिप्स.
बेकिंग सोड्याचा उपयोग करा सफाईसाठी, महागड्या उत्पादनांपेक्षा उत्तम सफाई
जुन्या काचेच्या भांड्यांना चमक देण्यासाठी सोप्या घरगुती टिप्स
Shutterstock
- काचेची भांडी चमकवण्यासाठी तुम्ही बेकिंग पावडर काही वेळ पाण्यात घालून ठेवा आणि त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट नंतर काचेच्या भांड्यावर लावा आणि मग भांडी स्वच्छ करा. असं केल्याने जुन्या काचेच्या भांड्यावर आलेले डाग गायब होतील.
- लहान तोंडाचे काचेचे ग्लास अथवा फ्लॉवरपॉटवरील डाग घालविण्यासाठी तुम्ही गरम पाण्यात साबण घाला आणि त्यात अमोनिआचे काही थेंब मिसळून ही भांडी स्वच्छ करा. यामध्ये मीठ घालून वरून व्हिनेगर घाला आणि मग व्यवस्थित मिक्स करून घ्या. काही वेळ तसंच ठेवा. काही वेळानंतर या मिश्रणाने काचेची भांडी साफ करा. पूर्वीसारखी ही भांडी चमकदार दिसतील. यावरील सर्व काळेपणा आणि धूळ निघून जाण्यास व्हिनेगर आणि मीठाच्या पाण्यामुळे मदत होते.
- काचेचे ग्लास चमकदार पुन्हा बनविण्यासाठी पाण्यात अगदी चिमूटभर नीळ घाला आणि या पाण्याने ग्लास धुवा. काही मिनिट्ससाठी तुम्ही जर हे ग्लास तांदळाच्या पाण्यात भिजत ठेवले तर हे ग्लास पुन्हा अगदी नवे असल्यासारखे दिसतील. तुम्हाला जास्त कष्ट घ्यायचीही गरज नाही.
- पाण्यामध्ये लिंबाची साल मिक्स करा आणि या सालीने काचेची भांडी स्वच्छ करा. ही काचेची भांडी अगदी पहिल्यासारखी स्वच्छ आणि आकर्षक दिसतील. यावरील जुनाटपणा निघून जाईल. तसंच ही भांडी स्वच्छ करताना सिंकमध्ये तुम्ही जुना टॉवेल टाकून ठेवा. जेणेकरून साबणाने अथवा लिंबामुळे तुमच्या हातातून काचेची भांडी सटकली तर ती पडून फुटणार नाहीत.
योगा मॅटची स्वच्छता आहे महत्वाची नाहीतर होतील त्वचेचे विकार
Shutterstock
- साबणाच्या जागी तुम्ही बेकिंग पावडरने काचेची भांडी स्वच्छ केलीत तर त्यावर जुनाटपणा दिसून येणार नाही. बेकिंग पावडरमुळे काचेची भांडी चकचकीत राहतात.
- काचेची भांडी ही कधीही एकात एक ठेऊ नका. त्यामुळे दुसऱ्या काचेच्या भांड्यांवर चरे पडतात. वापरायची नसतील तर कपटात ठेवताना या भांड्यांना कागदात गुंडाळून ठेवा. म्हणजे चरे पडणार नाहीत आणि पुन्हा जेव्हा घरातील कोणत्याही कार्यक्रमांना वापरायची असतील तेव्हा ती भांडी अगदी चकचकीत आणि नवीच दिसतील.
- काचेची भांडी धुताना नेहमी एका टबामध्ये घेऊन धुवावीत आणि काचेची भांडी धुताना इतर कोणतीही भांडी त्यात असू नयेत. तसंच ही भांडी धुऊन झाल्यावर ती टॉवेलने स्वच्छ पुसून लगेच नीट ठेवावीत. जेणेकरून त्यावर कोणताही ओरखडा अथवा चरा येत नाही.
- कट डिझाईनच्या काचेच्या क्रॉकरीवर डाग लागल्यास, साफ करण्यासाठी ही भांडी तुम्ही गरम पाण्यात व्हिनेगर घालून त्यात बुडवून ठेवा. मग नायलॉनच्या स्क्रबरने ही भांडी रगडून घासा. पण घासताना त्यावर जास्त जोर येणार नाही याची काळजी घ्या. त्यानंतर ही भांडी पुसून घ्या. तुम्ही ही भांडी पुसल्यानंतर तुम्हाला अगदी पूर्वीसारखी चमक या काचेच्या भांड्यांवर दिसून येईल.
स्वयंपाकघरातील चिकट टाईल्स चमकविण्यासाठी सोप्या टिप्स
घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा