परिणामकारक सोप्या घरगुती उपायांनी मरतील घरातील ढेकूण

ढेकणांच्या त्रासाने असाल त्रस्त तर करा सोपे उपाय

घरात ढेकून झाले असतील तर त्याचा खूपच त्रास होतो. ढेकून माणसाच्या शरीरातील रक्त शोषून घेतात आणि अशा ठिकाणी घरात लपून राहतात की त्यांच्यापासून सुटका मिळवणंही कठीण होतं. घरात एकदा ढेकूण झाले तर त्यांच्यापासून सुटका मिळवणं अत्यंत कठीण होतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मादी ढेकून ही साधारण 500 अंडी घालते. त्यामुळे एकदा घरात ढेकून झाले  की त्यातून बाहेर पडणं फारच कठीण होतं. तुम्हीही जर ढेकणांच्या त्रासाने त्रस्त असाल तर त्यासाठी तुम्हाला आम्ही काही सोपे उपाय देणार आहोत. त्याचा उपयोग करून तुम्ही घरातील ढेकणांचा नायनाट नक्कीच करू शकता. काय आहेत हे सोपे उपाय घ्या जाणून.  

पुदिन्याची पाने

Shutterstock

पुदिन्याच्या पानांचा सुगंध हा ढेकणांसाठी वाईट ठरतो. ढेकणांना हा सुगंध सहन होत नाही. त्यामुळे जर तुमच्या गादीमध्ये ढेकूण असतील तर रोज तुम्ही न चुकता ताजा पुदीना गादीमध्ये ठेवा. यामुळे ढेकूण मरण्यास मदत होते. तुम्हाला हवं तर तुम्ही पुदिन्याचा स्प्रेदेखील घरात बनवू शकता आणि गादीवर अथवा ज्या ठिकाणी ढेकूण झाले आहेत तिथे मारू शकता. यामुळे ढेकणांचा नायनाट करणे सोपे होईल.

घरच्या घरी फेसपॅक करण्याआधी तयार करा या फेसपॅक पावडर

लाल मिरची

Freepik.com

ढेकूण मारण्यासाठी लाल मिरची ही अत्यंत उपयुक्त आहे. तुम्हाला कदाचित हे वाचून आश्चर्य वाटलं असेल पण लाल मिरची ही खूपच फायदेशीर आहे. यासाठी तुम्ही सर्वात पहिल्यांदा एक चमचा लाल मिरची, आलं, ओव्याचे तेल आणि एक कप पाणी घ्या. आलं किसून त्यात लाल मिरची आणि ओव्याचे तेल मिक्स करा आणि मग हे मिश्रण एक कप पाण्यात मिक्स करा. त्यानंतर हे गाळून घ्या आणि स्प्रे बॉटलमध्ये भरा. ज्याठिकाणी ढेकूण आहेत  असं  तुम्हाला जाणवलं आहे त्याठिकाणी दर दोन दिवसानी हा स्प्रे फवारा आणि मग आठवड्याभरातच तुम्हाला ढेकूण नाहीसे झाल्याचे आढळून येईल. 

कडुलिंबाचे तेल

Shutterstock

कडुलिंबाचे तेलही यासाठी फायदेशीर ठरते. सर्वात पहिले तुम्ही दोन मोठे चमचे कडुलिंबाचे तेल घ्या.  एक कप पाणी आणि अर्धा चमचा डिटर्जंट पावडर तुम्ही घ्या. यानंतर पाण्यामध्ये कडुलिंबाचे तेल आणि डिटर्जंट पावडर नीट मिक्स करून घ्या. हे मिश्रण तुम्ही स्प्रे च्या बाटलीत  भरा आणि ढेकूण असणाऱ्या  ठिकाणी स्प्रे फवारा. जोपर्यंत ढेकून मरत नाहीत तोपर्यंत तुम्ही ही प्रक्रिया रोज करा. कडुलिंबामध्ये अँटिबॅक्टेरियल गुण असतात जे किड्यांना मारण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे याचा उपयोग तुम्हाला करता येऊ शकतो. 

केसांसाठी कडुलिंबाचे फायदे (Benefits Of Neem For Hair In Marathi)

रबिंग अल्कोहोल

सर्वात पहिले तुम्ही 90 मिली रबिंग अल्कोहोल आणि एक स्प्रे ची बाटली घ्या.  या बाटलीत हे अल्कोहोल भरा.  ढेकूण असणाऱ्या ठिकाणी हे फवारा. जेव्हा ढेकूण मरायला लागत आहेत हे सिद्ध होईल तोपर्यंत हे मारत राहा. ढेकणांवर अल्कोहोल मारल्यामुळे त्यांची त्वचा जळू लागते आणि त्यामुळे ते पटकन मरतात. 

लिव्हिंग रूम सजविण्यासाठी करा अशा सोफा कम बेड डिझाईनचा वापर

ढेकूण मारण्याचे औषध

हे तर सर्वांनाच माहीत आहे.  ढेकूण फर्निचर, बेड,  गादी इत्यादी ठिकाणी अगदी कानाकोपऱ्यात असतात.  त्यामुळे अशा कानाकोपऱ्यातून  त्यांना बाहेर काढणं अत्यंत गरजेचे असते. किटकनाशकाचा वापर करून तुम्ही हे काम करू शकता. ढेकूण मारण्याचे औषध बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे याचा तुम्ही वापर करू शकता. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक