ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
नैसर्गिकरित्या चेहऱ्यावरून मेकअप कसा काढावा सोप्या टिप्स (How To Remove Makeup Naturally)

नैसर्गिकरित्या चेहऱ्यावरून मेकअप कसा काढावा सोप्या टिप्स (How To Remove Makeup Naturally)

महिलांना मेकअप हा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. मात्र मेकअप जास्त वेळ चेहऱ्यावर राहिला तर त्वचा खराब होते. नेहमी झोपताना चेहऱ्यावरील मेकअप पूर्ण काढून झोपणं आवश्यक आहे. बऱ्याचदा आपण चेहऱ्यावरील मेकअप काढण्यासाठी बाजारातील विविध उत्पादनं वापरतो ज्यामध्ये अनेक रासायनिक पदार्थही असतात. ज्यामुळे चेहरा खराब होण्याची अथवा चेहऱ्यावर पुळ्या येण्याचीही शक्यता असते. मेकअप काढण्याचा उत्तम उपाय म्हणजे नैसर्गिक गोष्टींचा वापर. नैसर्गिक गोष्टींचा वापर करूनही तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरील अगदी कितीही हट्टी मेकअप असेल तर काढता येतो. तुमच्या चेहऱ्यावरून आणि डोळ्यांवरून मेकअप काढायचा असेल तर नैसर्गिकरित्या नक्की काय गोष्टींचा आपण वापर करून घेऊ शकतो त्याबद्दल आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत. नैसर्गिकरित्या चेहऱ्यावरून मेकअप कसा काढावा याच्या काही सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला देणार आहोत. तुम्हाला कोणत्याही रसायनिक रिमूव्हरचा वापर करण्याची गरज नाही. बाजारात मिळणाऱ्या रिमूव्हरमध्ये अनेक रासायनिक पदार्थांचाही वापर असतो. त्यामुळे चेहरा खराब होण्याची भीती असते. त्यामुळे नैसर्गिक वस्तूंचा वापर करणे योग्य. चेहऱ्यावर वेगळा कोणताही परिणाम नैसर्गिक गोष्टींच्या वापरामुळे होणार नाही आणि तुमची त्वचा तितकीच सुंदर राहील. चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी जितक्या जास्तीत जास्त नैसर्गिक वस्तूंचा वापर करता येईल तितका करा. बाजारातील वस्तूंनी चेहरा जपण्यापेक्षा नैसर्गिक गोष्टींनी जपा. जाणून घेऊया नैसर्गिक सोप्या पद्धती

मध आणि बेकिंग सोडा (Honey & Baking Soda)

मध आणि बेकिंग सोडा (Honey and baking soda)

Shutterstsock

ADVERTISEMENT

चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा मेकअप असला तरीही नैसर्गिकरित्या काढण्यासाठी तुम्हाला मध आणि बेकिंग सोड्याचे मिश्रण हा उत्तम पर्याय आहे. मधामध्ये नैसर्गिकरित्या अँटिबॅक्टेरिया  गुणधर्म असल्यामुळे तुम्हाला चेहऱ्यावर कोणताही त्रास होत नाही. तर बेकिंग पावडरमुळे तुमच्या चेहऱ्यावरील डेड स्किन अर्थात मृत पेशी निघून जायला मदत मिळते. तुमचा चेहरा अधिक चमकदार आणि तजेलदार दिसण्यासाठी याचा उपयोग होतो. 

कसे वापरावे 

  • स्वच्छ कपडा घ्या 
  • त्यावर ऑर्गेनिक मध चमच्याने लावा 
  • त्यावर बेकिंग पावडर थोडीशी शिंपडा 
  • या कपड्याने चेहऱ्यावरील मेकअप काढा आणि तुमच्या चेहऱ्यावरील मेकअप तुम्हाला या मिश्रणाने सहज निघालेला दिसेल
  • मधाचा चिकटपणा घालविण्यासाठी नंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्या 

कोरड्या आणि तेलकट त्वचेसाठी ऑलिव्ह ऑईल (Olive Oil)

कोरड्या आणि तेलकट त्वचेसाठी ऑलिव्ह ऑईल (Olive oil for dry and oily skin)

Shutterstock

ADVERTISEMENT

ऑलिव्ह ऑईलमध्ये केवळ तुमची त्वचा चांगली ठेवायचे घटकच समाविष्ट नाहीत तर तुमची त्वचा अधिक मऊ आणि मुलायम करणारे घटकही यामध्ये समाविष्ट आहेत. तुमची त्वचा कोरडी असेल तर मेकअप नैसर्गिकरित्या काढण्यासाठी ऑलिव्ह ऑईल हा उत्तम पर्याय आहे. कारण ऑलिव्ह ऑईल तुमची त्वचा मेकअप काढल्यानंतर निस्तेज होऊ देत नाही. कोरडेपणाने चेहरा अधिक निस्तेज दिसतो. हा परिणाम टाळण्यासाठी तुम्ही नक्की ऑलिव्ह ऑईलचा वापर करा. तर तेलकट त्वचेसाठीही हे तेल तितकेच उत्तम काम करते. तेलकट त्वचेवर ऑलिव्ह ऑईल वापरल्याने तेल साचून राहात नाही. त्वचा अधिक संवेदनशील असेल तर तुम्ही मेकअप काढण्यासाठी एरंडेल तेल अथवा जोजोबा तेलही वापरू शकता. 

मेकअपसाठी वापरण्यात येणाऱ्या सौंदर्य प्रसाधनांमध्ये थोड्या प्रमाणामध्ये अॅस्ट्रिंजंट असतं. त्यामुळे त्वचा अधिक कोरडी होते. पण ऑलिव्ह ऑईल वापरल्याने मेकअप स्वच्छ होतोच, त्याशिवाय त्वचेचा कोरडेपणा निघून जाऊन त्याला आर्द्रता प्राप्त होते. 

कसे वापरावे 

  • स्वच्छ कपडा अथवा कापसाचा बोळा घ्यावा 
  • त्यावर काही थेंब ऑलिव्ह ऑईल ओतावे 
  • चेहऱ्यावरील अथवा डोळ्यावरील मेकअप काढण्यासाठी याचा उपयोग करावा. एका स्ट्रोकमध्येच मेकअप निघून जातो 
  • चेहऱ्यावरील ऑईल काढण्यासाठी पुन्हा एकदा कापसाने चेहरा स्वच्छ करून घ्या आणि मग थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. मेकअप पूर्ण निघून जाईल

ADVERTISEMENT

बेबी ऑईल (Baby Oil)

बेबी ऑईल (Baby oil)

Shutterstock

बऱ्याचदा मेकअप नुसत्या रिमूव्हरनेही निघून जातो. पण मस्कारा अथवा काजळ काढताना मात्र जीव जातो. पण त्यावरही नैसर्गिक उपाय आहे. तो म्हणजे इतर कोणत्याही रिमूव्हरने मस्कारा अथवा काजळ जात नसेल तर तुम्ही बेबी ऑईलचा वापर करावा. बेबी ऑईलने पटकन मेकअप निघतो. 

कसे वापरावे 

ADVERTISEMENT
  • स्वच्छ कपडा अथवा कापसाचा बोळा घ्यावा 
  • त्यावर बेबी ऑईलचे काही थेंब टाकावे
  • हातावरही बेबी ऑईल लाऊन घेतल्यास चालते
  • हाताने बेबी ऑईल लावणार असल्यास, सर्क्युलर पद्धतीने हे तेल डोळ्याला आणि चेहऱ्याला लावावे
  • कापसाने अथवा कपड्याने चेहरा पुसून घ्यावा आणि मग थंड पाण्याने चेहरा धुवावा. मेकअप पूर्ण निघून जातो 

दूध (Milk)

दूध (Milk)

Shutterstock

दूध हे उत्तम नैसर्गिक रिमूव्हर म्हणून काम करते. तुमच्या चेहऱ्यावर खूप वेळ मेकअप असेल आणि तो काढणे कठीण होत असेल तर तुम्ही कच्च्या दुधाचा वापर करून पाहा. दूध हा अत्यंत सोपा आणि जलद आणि नैसर्गिक उपाय आहे. संवेदनशील त्वचेसाठी यापेक्षा चांगला पर्याय असूच शकत नाही. नुसतं दूध नाही तर तुम्ही नारळ्याच्या दुधाचाही यासाठी वापर करू शकता.  नारळाचं दूधही नैसर्गिकरित्या त्वचेसाठी उत्तम असून चेहऱ्यावरील मेकअप काढण्यासाठी याचा उपयोग करून घेता येऊ शकतो. 

कसे वापरावे 

ADVERTISEMENT
  • स्वच्छ कपडा अथवा कापसाचा बोळा घ्यावा
  • कच्च्या दुधात हा बोळा बुडवावा आणि त्यानंतर चेहऱ्यावरील मेकअप पुसावा 
  • दुधाने  पटकन मेकअप निघतो. अगदी काजळदेखील पटकन निघते 
  • कोमट पाण्याने नंतर चेहरा धुवा 
  • दुधाचा वापर केल्याने चेहऱ्यावर अधिक मऊपणादेखील राहतो आणि त्वचाही अधिक चमकते 
  • तुम्ही साधा मेकअप केला असेल तर तो काढण्यासाठी दुधाइतका दुसरा चांगला नैसर्गिक उपाय कोणताही नाही

बेबी लोशन (Baby Lotion)

बेबी लोशन (Baby lotion)

Shutterstock

बेबी ऑईलप्रमाणे बेबी लोशनदेखील नैसर्गिक रिमूव्हर म्हणून  तुम्हाला वापरता येऊ शकेल. फक्त यासाठी तुम्हाला चांगल्या दर्जाचे बेबी लोशन वापरण्याची गरज आहे. याचा परिणाम पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. आपली त्वचा अत्यंत संवदेनशील असते त्यामुळे अशा बेबी लोशनचा वापर केल्यास, त्वचा अधिक चांगली राहाते. 

ADVERTISEMENT

कसे वापरावे 

  • स्वच्छ कपडा अथवा कापसाचा बोळा घ्यावा
  • बेबी लोशन या कापसाच्या बोळ्यावर अथवा कपड्यावर काढावे आणि त्यानंतर चेहऱ्यावरील मेकअप पुसावा 
  • बेबी लोशननेही पटकन मेकअप निघतो
  • मेकअप पूर्ण काढून झाल्यावर चेहरा व्यवस्थित थंड पाण्याने धुवा 

परफेक्ट मेकअपसाठी जाणून घ्या 5 सोप्या टिप्स

व्हॅसलीन (Vaseline)

व्हॅसलीन (Vaseline)

Shutterstock

ADVERTISEMENT

थंडीच्या दिवसात आपली त्वचा अधिक मऊ मुलायम ठेवण्यासाठी व्हॅसलीनचा उपयोग केला जातो याची सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र नैसर्गिकरित्या मेकअप काढण्यासाठीही तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, केवळ डोळ्यांवरील मेकअप काढण्यासाठी तुम्ही व्हॅसलीनच वापर करा. याचा उपयोग करताना विशेष काळजी घ्यावी लागते. व्हॅसलीन हे अतिशय जाडसर असते आणि पटकन तुमच्या डोळ्यात अथवा त्वचेच्या आतमध्ये जाण्याची शक्यता असते. त्यामुळे याचा वापर करताना अत्यंत हलक्या हाताने आणि काळजीपूर्वक करायला हवा. मस्कारा आणि काजळ काढण्यासाठी तुम्ही याचा उपयोग करू शकता. 

कसे वापरावे 

  • हाताच्या बोटाला व्हॅसलीन लाऊन घ्या. कापसाने करता येणार असेल तर अतिउत्तम. कापसाला व्हॅसलीन लाऊन घ्या
  • त्यानंतर हलक्या हाताने मस्कारा काढण्यासाठी याचा उपयोग करा 
  • व्हॅसलीन त्वचेवर राहू देऊ नका. तुम्ही व्हॅसलीनने डोळ्यांचा मेकअप काढून झाल्यावर पाण्याने स्वच्छ चेहरा धुवा.
  • नुसत्या पाण्याचा वापर न करता क्लिंन्झरचा वापर करा

वाफ (Steam)

वाफ (Steam)

ADVERTISEMENT

shutterstock

वाफेमुळे मेकअप निघू शकतो यावर अनेक लोकांचा विश्वास बसत नाही. पण खरं सांगायचं तर ही एक उत्तम नैसर्गिक पद्धत आहे. तसंच यामुळे तुमचा चेहरा अधिक चमकदार होतो आणि त्याशिवाय मेकअपचा एकही कण तुमच्या चेहऱ्यावर यामुळे राहात नाही. अनेक मॉडेल्सची त्वचा ही अशा पद्धतीन मेकअप काढून जास्त चांगली राहाते. तसंच त्वचेवरील पोअर्सची समस्यादेखील होत नाही. 

कसे वापरावे 

  • स्टीमरमध्ये पाणी घ्या आणि ते गरम करा 
  • डोक्यावर टॉवेल ठेवा आणि वाफ घ्या 
  • चेहऱ्यावर असलेला अगदी न निघणाऱ्यातला मेकअपदेखील यामुळे निघतो
  • आलेल्या वाफेमुळे मेकअपही निघेल आणि चेहराही चमकदार होईल
  • स्वच्छ कपड्याने अथवा कापसाने चेहरा स्वच्छ पुसून घ्या. टिश्यू पेपरचा वापर करू नका. अन्यथा चेहऱ्याला टिश्यू पेपर चिकटून बसतो आणि चेहरा खराब होतो 

Makeup Hacks: डल मेकअप रिफ्रेश करण्याच्या सोप्या टिप्स

ADVERTISEMENT

पाणी (Water)

पाणी (Water)

Shutterstock

पाणी हा चेहऱ्यावरून मेकअप काढण्याचा नैसर्गिक पर्याय कसा काय असू शकतो असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडेल. तुम्ही अतिशय साधा मेकअप केला असेल तर तो पाण्यानेही निघू शकतो. त्यासाठी तुम्हाला रिमूव्हर वापरायची गरज नाही. 

कसे वापरावे 

ADVERTISEMENT
  • नेहमीचा फेसवॉश चेहऱ्याला लावा आणि थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा

टोनर (Toner)

टोनर (Toner)

Shutterstock

चेहऱ्यावर बरेचदा काही कार्यक्रमांना जाताना अतिशय हेव्ही मेकअप करावा लागतो. मात्र हा मेकअप काढताना खूप वेळ लागतो. रिमूव्हरनेही हा मेकअप पटकन जात नाही. पण अशावेळी तुम्ही टोनरचा वापर करा. कितीही हेव्ही मेकअप असला तरीही टोनरचा वापर करून तुम्हाला तो मेकअप काढणं सहज शक्य होतं. फक्त तुमच्या चेहऱ्यावरील नैसर्गिक तेलही टोनरमुळे कमी होतं आणि चेहरा कोरडा होतो इतका एकच त्याचा वेगळा परिणाम होतो. पण पटकन मेकअप निघायला हवा असेल तर तुम्ही टोनरचा वापर करू शकता. तुमची त्वचा तेलकट  असेल तर तुम्ही याचा वापर नक्की करा. 

ADVERTISEMENT

कसे वापरावे 

  • स्वच्छ कपडा अथवा कापसाचा बोळा घ्यावा
  • त्यावर टोनर घ्यावे आणि मेकअप पुसावा 
  • टोनर लाऊन झाल्यावर नेहमीच्या फेसवॉशचा वापर करून थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा 

क्लिन्झिंग ऑईल (Cleansing Oil)

क्लिन्झिंग ऑईल (Cleansing oil)

Shutterstock

तुमची त्वचा खूपच कोरडी असेल तर नैसर्गिकरित्या मेकअप काढण्यासाठी तुम्ही क्लिंन्झिंग ऑईलचा वापर करा. क्लिंन्झिंग ऑईलमुळे चेहरा चमकदार आणि उत्तम राहातो. तसंच यामुळे चेहऱ्याला कोणतीही इजा अथवा हानी पोहचत नाही. मात्र तुमची त्वचा तेलकट असल्यास याचा उपयोग करू नका. 

ADVERTISEMENT

कसे वापरावे 

  • कापसावर क्लिंन्झिंग ऑईल घ्या 
  • तुमच्या भुवया, ओठ, चेहरा सगळीकडे हे व्यवस्थित लावा 
  • दोन मिनिट्स हाताने व्यवस्थित संपूर्ण चेहऱ्याला मसाज करा. यामुळे मेकअप आणि चेहऱ्याला लागलेली सर्व घाण निघून जाण्यास मदत मिळते
  • क्लिंन्झरने  त्यानंतर चेहरा स्वच्छ धुऊन घ्या 
  • त्वचा अधिक चांगली राहण्यासाठी त्यानंतर चेहरा पुसून त्यावर मॉईस्चराईजर लावा

मेकअप साफ करण्यासाठी परफेक्ट रिमूव्हर्स, तेदेखील तुमच्या बजेटमध्ये

सॅलिसिलिक क्लिंन्झर (Salicylic Cleanser)

सॅलिसिलिक क्लिंन्झर (salicylic cleanser)

ADVERTISEMENT

Shutterstock

सॅलिसिलिक क्लिंन्झरचा वापर चेहऱ्यावर अॅक्ने असतील तर तुम्ही नक्की करा. चेहऱ्यावर अॅक्ने असले तरीही मेकअप हा कधी ना कधीतरी केला जातोच. अॅक्ने आहेत म्हणजे मेकअप करायचा नाही असं होत नाही. तुम्ही मेकअप करताना काळजी घ्या आणि अगदी मेकअप काढतानाही नैसर्गिकरित्या काढला जाईल याकडे लक्ष द्या. नैसर्गिकरित्या मेकअप काढायचा असेल तर तुम्ही सॅलिसिलिक क्लिंन्झरचा वापर करा. 

कसे वापरावे 

  • मेकअप काढताना सॅलिसिलिक क्लिंन्झरचा वापर करावा 
  • चेहरा स्वच्छ पुसल्यावर चेहऱ्याला मॉईस्चराईज करावे. हे करणं अत्यंत गरजेचं आहे. चेहरा स्वच्छ राखण्यासाठी आणि त्वचा हायड्रेट होण्यासाठी याची गरज भासते. 

वॉशक्लॉथ (Washcloth)

वॉशक्लॉथ (Washcloth in water)

ADVERTISEMENT

Shutterstock

एखादा स्वच्छ कपडा घेऊन त्यानेही तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील मेकअप काढू शकता. तुम्हाला कोणत्याही रिमूव्हरची गरज भासणार नाही. कितीही लाँग लास्टिक मेकअप असला तरीही या पद्धतीने तो पटकन निघून जातो. फक्त या पद्धतीचा वापर करताना हलक्या हाताने वापर करावा. चेहरा खसाखसा पुसू नये याची काळजी घ्यावी. चेहऱ्याची त्वचा अत्यंत संवदेनशील असल्याने हलक्या हाताने याचा वापर करण्यात यावा. तसंच हा कपडा स्वच्छ आणि चांगला आहे की नाही याची वापरण्याआधी खात्री करून घ्यावी. 

कसे वापरावे 

  • स्वच्छ कपडा घ्यावा
  • काही वेळ कोमट पाण्यात भिजवून ठेवा
  • नरम कपड्याने तुम्ही चेहऱ्यावरील मेकअप पुसून काढा 
  • यामुळे तुमच्या चेहऱ्यावर अजिबात मेकअप राहणार नाही. तसंच काजळ अथवा न निघणारा मस्कारादेखील तुम्ही कपड्याने बोटांचा वापर करून काढू शकता
  • यानंतर पुन्हा एकदा फेसवॉशचा वापर करून तुम्ही थंड पाण्याने चेहरा धुवा 

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा  

19 Aug 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT