एक पौष्टिक आहार अथवा पोट भरण्याचा सोपा उपाय म्हणून तुम्ही नक्कीच स्मूदीचा तुमच्या आहारात समावेश करून घेऊ शकता. तसंच स्मूदीच घरच्या घरी बनवणंही खूप सोपं आहे. केवळ बाहेर जाऊन तुम्ही स्मूदीचा आस्वाद घ्यायला हवा असंही नाही. काही विशिष्ट आणि अगदी घरात असणाऱ्या फळांच्या उत्कृष्ट चवीच्या स्मूदीज तुम्ही बनवू शकता. काही खास साहित्य घालूनही या बनवता येतात. तुम्हाला कशा स्मूदीज हव्या आहेत त्यानुसार तुम्ही त्या तयार करून घेऊ शकता. स्वादिष्ट स्मूदी बनविण्यासाठी तुम्हाला त्याचे फक्त कॉम्बिनेशन माहीत असायला हवे. ताजी आणि स्वादिष्ट फळं यासाठी तुमच्याकडे असयाला हवीत. स्वादिष्ट स्मूदी बनविण्यासाठी तुम्ही डब्बाबंद फळांचा अथवा पल्पचा वापरही करू शकता. केवळ एका फळाचा वापर करूनही स्मूदी बनवता येते अथवा वेगवेगळी फळं वापरूनही तुम्हाला स्मूदीचा स्वाद घेता येतो. खरं तर स्मूदी बनविण्यासाठी कोणकोणत्या फळांच्या कॉम्बिनेशनचा वापर करायचा हे महत्त्वाचे आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्ही फळांसह दूध, क्रीम, दही याचाही वापर करू शकता. स्मूदी करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की, यामध्ये साखर मिक्स करू नये. हे कोणत्याही प्रकारचे मिल्कशेक नाही. त्यामुळे फळांची मूळ गोडीच तुम्ही यामध्ये घ्यायला हवी. त्यालाच स्मूदी असं म्हणतात. अशाच काही खास स्मूदीजची रेसिपी मराठीत आम्ही तुम्हाला देत आहोत. तुम्हीही घरच्या घरी स्वादिष्ट स्मूदी बनवून आरोग्य ठेवा निरोगी.
स्ट्रॉबेरी केळी (Strawberry Banana Smoothie Recipe In Marathi)
स्ट्रॉबेरी आणि केळ्याची स्मूदी पोटात लवकर भूक लागू देत नाही. ही दोन्ही फळं बऱ्यापैकी हेव्ही असल्याने तुम्हाला लवकर भूक लागत नाही. तसंच या दोन्हीची गोडी एकमेकांमध्ये मिक्स होऊन याची चव उत्कृष्ट लागते
साहित्य
- 1 केळं
- 2 कप स्ट्रॉबेरी
- अर्धा कप व्हॅनिला योगर्ट (दही)
- अर्धा कप दूध
- 2 चमचे मध
- चिमूटभर दालचिनी पावडर
- 1 कप बर्फ
कृती
केळं, स्ट्रॉबेरी, बर्फ, व्हॅनिला योगर्ट, दूध, मध, दालचिनी पावडर हे सर्व ब्लेंडरमध्ये एकत्र घालून जाडसर वाटून घ्या. तुमची स्मूदी तयार.
ट्रिपल बेरी ब्लेंड (Triple Berry Blend Smoothie Recipe In Marathi)
यामध्ये तीन प्रकारच्या बेरींचा उपयोग केला जातो त्यामुळे त्याला ट्रिपल बेरी ब्लेंड असे नाव देण्यात आले आहे. तुम्हाला जर बेरीज आवडत असतील तर तुम्ही नक्कीच या स्मूदीचा आस्वाद घ्यायला हवा.
साहित्य
- दीड कप मिक्स बेरीज (ब्लॅकबेरी, स्ट्रॉबेरी आणि रासबेरी)
- 1 कप दूध
- 1 कप बर्फ
- तुम्हाला जर हवी असेल तर एक चमचा साखर
कृती
सर्व बेरीजमधील वरचा भाग काढून घ्या. त्यानंतर वरील सर्व साहित्य मिक्स करून तुम्ही एकत्र या सर्व बेरीज वाटून घ्या आणि तुमची ट्रिपल बेरी ब्लेंड स्मूदी तयार. तीन वेगवेगळे रंग असल्याने या स्मूदीचा रंग अप्रतिम दिसतो आणि स्वादही तितकाच स्वादिष्ट असतो.
गाजर आणि सफरचंदाची स्मूदी रेसिपी (Carrot & Apple Smoothie Recipe In Marathi)
गाजर आणि सफरचंद ऐकून थोडंसं तुम्हाला विचित्र वाटलं असेल. पण गाजर आणि सफरचंद ही दोन्ही फळं तुमच्या डोळ्यांसाठी आणि त्वचेसाठी उत्कृष्ट आहेत. तसंच या दोन्हीचा नुसता रस पिण्यापेक्षा तुम्ही याचे मिक्स्चर करून स्मूदी पिणं तुमच्या आरोग्यासाठी उत्तम ठरते.
साहित्य
- एक कप गाजराचा रस
- एक कप सफरचंदाचा रस
- अर्धा कप बर्फ
कृती
गाजर आणि सफरचंदाचे तुकडे करून त्याचा रस काढून घ्या आणि मग बर्फाचे तुकडे त्यात मिक्स करून पु्न्हा एकदा हे मिश्रण एकत्र ब्लेंडरमधून काढा. तुमची स्मूदी तयार. बऱ्याच जणांना हा स्वाद आवडणार नाही. पण तुम्हाला जर नुसतं आवडलं नाही तर तुम्ही त्यात थोडंसं मीठ आणि काळीमिरी पावडर मिक्स करून पिऊ शकता हे चवीला अप्रतिम लागतं.
किवी आणि स्ट्रॉबेरी स्मूदी रेसिपी (Kiwi Strawberry Smoothie Recipe In Marathi)
किवी हे मुळातच चवीला खूपच छान फळ आहे आणि त्याच्या सोबतील स्ट्रॉबेरी हे स्मूदीसाठी उत्कृष्ट कॉम्बिनेशन ठरते. बऱ्याच जणांना या कॉम्बिनेशनची चव आवडते. तुम्हीही घरच्या घरी ही स्मूदी तयार करून त्याची चव घेऊ शकता.
साहित्य
- 1 कप स्ट्रॉबेरी
- 2 साल काढलेले किवी
- 2 चमचे साखर (याची गोडी कमी असल्याने साखर वापरावी)
- 2 कप बर्फ
कृती
किवी साल काढून घ्यावे. त्यानंतर स्ट्रॉबेरी, किवी, साखर आणि बर्फ घालून ब्लेंडरमधून वाटावे. स्मूदी तयार. तुम्हाला हवं असल्यास, यामध्य तुम्ही तुमच्या पसंतीचे योगर्ट अथवा दहीदेखील वापरू शकता. मात्र त्याचे प्रमाण कमी ठेवावे. अन्यथा त्याची चव चांगली लागणार नाही.
किवी (Kiwi) तुमच्या फिटनेस आणि त्वचेसाठी आहे वरदान, वापरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
चेरी व्हॅनिला स्मूदी रेसिपी (Cherry Vanilla Smoothie)
चेरीमध्ये मुळातच गोडवा जास्त असतो. त्यात व्हॅनिलाचा स्वाद आल्यानंतर हे कॉम्बिनेशन खूपच आवडीचे ठरते. तसंच या दोन्ही गोष्टींमुळे पोटही भरलेले राहाते.
साहित्य
- दीड कप फ्रोझन चेरी
- पाऊण कप दूध
- 3 चमचे साखर (नसली तरीही चालेल)
- अर्धा चमचा व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट
- पाव चमचा बदामाचे एक्स्ट्रॅक्ट
- चिमूटभर मीठ
- 1 कप बर्फ
कृती
चेरी व्यवस्थित साध्या होऊ द्याव्यात. दूध तुम्हाला कच्चे आवडत असेल तर तसे नाहीतर तापवून थंड करून घ्या. तापवणार असल्यास, त्यात साखर घाला. चेरी आणि वरील सर्व साहित्य मिक्स करून ब्लेंडरमधून त्याची स्मूदी करून घ्या. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही व्हॅनिला एक्स्ट्रॅक्टऐवजी यात व्हॅनिला आईस्क्रिमचाही वापर करून घेऊ शकता.
केळे-खजूर-लिंबाची स्मूदी रेसिपी (Banana, Date & Lime Smoothie)
हे कॉम्बिनेशन वाचून तुम्हाला कदाचित थोडं विचित्र वाटत असेल. पण शरीराला प्रोटीन मिळण्यासाठी हे उत्कृष्ट कॉम्बिनेशन आहे. तसंच याची स्मूदी बनवणंही सोपं आहे
साहित्य
- 2 केळी
- पाऊण कप कापलेला खजूर
- एका लिंबाचा रस
- दीड कप सोया मिल्क
- बर्फ
कृती
खजूराच्या बिया काढून घ्या. केळ्याचे तुकडे करून घ्या. ब्लेंडरमध्ये वरील सर्व साहित्य घालून फेटून घ्या. तुमची स्मूदी तयार. खजूर आणि केळ्याची चव अप्रतिम लागते. त्यात लिंबाच्या रसाचा आंबटपणा चव अधिक वाढवतो. यामधून विटामिन सी मिळते त्यामुळे ही स्मूदी आरोग्यासाठी नक्कीच चांगली ठरते.
अननस आणि नारळाची स्मूदी रेसिपी (Pineapple Coconut Smoothie)
अननस आणि नारळाची एकत्र चव कदाचित सगळ्यांना आवडेलच असं नाही. पण तरीही याची चव अप्रतिम लागते. तुम्हाला काही वेगळी चव अनुभवायची असेल तर नक्की ही स्मूदी करून पाहा.
साहित्य
- 2 कप नारळ पाणी
- 2 कप कापलेले अननसाचे तुकडे
- दीड चमचा लिंबाचा रस
- 1 चमचा मध
- अर्धा कप नारळ पाणी (वेगळे)
कृती
दोन कप नारळाच्या पाण्याचा आईस क्यूब ट्रे मध्ये बर्फ जमवा. हा बर्फ जमल्यावर वरील सर्व साहित्य घेऊन ब्लेंडरमधून ब्लेंड करून स्मूदी बनवा. नारळाच्या पाण्याची चव यामध्ये खूपच चांगली जमून येते.
सफरचंद आणि आल्याची स्मूदी रेसिपी (Apple Ginger Smoothie)
सफरचंदाचा गोडवा आणि आल्याची चव याचे कॉम्बिनेशन खूपच मस्त लागते. ही स्मूदी बऱ्याच जणांना आवडते. ही करणंही सोपं आहे.
साहित्य
- सालं काढलेले 1 सफरचंद
- अर्धा तुकडा सालं काढलेले आणि तुकडे केलेल आले
- 2 लिंबाचा रस
- पाव कप मध
- 1 कप पाणी
- 2 कप बर्फ
कृती
आल्याचे साल काढून त्याचे तुकडे करून घ्या. सफरचंदाचे साल काढून त्याचे तुकडे करा. वरील सर्व साहित्य मिक्स करून ब्लेंड करून स्मूदी तयार करा.
स्पाईस्ड पमकिन स्मूदी रेसिपी (Spiced Pumpkin Smoothie)
बऱ्याच जणांना गोड गोड स्मूदी नकोशी वाटते. ठराविक वेळाने त्याचा स्वाद नको वाटायला लागतो. अशा लोकांसाठी स्पाईस्ड पमकिन स्मूदी हा चांगला पर्याय आहे.
साहित्य
- ½ कप भोपळ्याची प्युरे
- सिल्कन टोफू
- 3 ½ चमचा ब्राऊन शुगर
- 1 कप दूध
- अर्धा चमचा पमकिन पाय स्पाईस
- चिमूटभर मीठ
- 1 कप बर्फ
कृती
वरील सर्व साहित्य घेऊन ब्लेंडरमध्ये मिक्स करून ब्लेंड करा. यामध्ये साखर अजिबात मिक्स करू नका हे लक्षात ठेवा. तुम्हाला उत्तम स्पाईस्ड स्मूदी मिळेल.
मेक्सिकन कॉफी (Mexican Coffee)
तुम्ही कॉफी प्रेमी असाल तर तुमच्यासाठी ही उत्तम स्मूदी आहे. तुम्हाला यातून कॉफीचा आस्वादही घेता येतो आणि पोटदेखील भरते.
साहित्य
- अर्धा कप थंड एस्प्रेसो अथवा स्ट्राँग कॉफी
- अर्धा कप दूध अथवा बदामाचे दूध
- 3 ½ चमचे ब्राऊन शुगर
- पाव चमचा दालचिनी पावडर
- पाव चमचा बदाम एक्स्ट्रॅक्ट
- अर्धा कप बर्फ
कृती
यासाठी स्ट्राँग कॉफी असणं अत्यंत आवश्यक आहे. वरील सर्व साहित्य मिक्स करून ब्लेंड करून घ्या आणि तुमची मेक्सिकन स्मूदी तयार आहे. याच्या नुसत्या सुगंधानेही कॉफीप्रेमींना नक्कीच ताजेतवाने वाटते.
त्वरीत वजन कमी करण्यासाठी कॉफी आणि मधाचा होईल उपयोग
काकडी आणि केल स्मूदी रेसिपी (Cucumber Kale Smoothie)
केल ही एक पालेभाजी आहे. शरीराला पौष्टिक तत्व मिळण्यासाठी ही भाजी चांगली असते. बऱ्याचदा नुसती भाजी खाणं शक्य होत नाही. त्यामुळे त्याची स्मूदी बनवून पिणं नक्कीच योग्य ठरतं.
साहित्य
- दीड कप भाजीचा रस
- अर्धी सोललेली काकडी
- 3 केल भाजीची पाने
- अर्ध्या लिंबाचा रस
कृती
वरील सर्व ब्लेंड करून स्मूदी करून घ्यावी. तुम्हाला कदाचित याची चव आवडणार नाही. पण त्यात तुम्ही चिमूटभर मीठही घालू शकता. कदाचित त्याने तुम्हाला चव लागेल. ही स्मूदी चवीसाठी नाही तर तुम्ही शरीराला पौष्टिक तत्व मिळविण्यासाठी पिणे आवश्यक आहे.
चॉकलेट चिप कुकी स्मूदी रेसिपी (Chocolate Chip Cookie Smoothie)
चॉकलेट कोणाला आवडत नाही? त्यातही जर चॉकलेटची स्मूदी बनवायची असेल तर नक्कीच उत्साह अधिक वाढतो. चॉकलेटची ही स्मूदीही घरच्या घरी बनवता येते.
साहित्य
- 1 कप व्हॅनिला आईस्क्रिम
- 1 कप दूध
- तोडलेले चॉकलेट चिप कुकीज
- पाव कप मिनी चॉकलेट चिप्स (वरून घालण्यासाठी)
कृती
वरील सर्व साहित्य (मिनी चॉकलेट चिप्स सोडून) घेऊन ब्लेंड करावे. वरून मिनी चॉकलेट चिप्स त्यात घालावे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये दुधाचे प्रमाण वाढवू शकता.
लेमन पॉपी सीड स्मूदी रेसिपी (Lemon Poppy Seed Smoothie)
ऐकल्यानंतरच लगेच ही स्मूदी प्यावी असं वाटू लागतं. ही स्मूदी तुम्हाला घरच्या घरी बनवणं सोपं आहे.
साहित्य
- 2 चमचे पॉपी सीड्स
- अर्ध्या लिंबाचा रस
- 1 कप दही
- पाव कप साखर
- अर्धा कप दूध
- अर्धा कप बर्फ
कृती
वरील सर्व मिश्रण ब्लेंडरमधून नीट मिक्स करून घ्यावे. पॉपी सीड्स तशाचा राहू देऊ नयेत नाहीतर स्मूदी पिताना त्याचा स्वाद चांगला लागत नाही.
मिंट – अलॅपिनो स्मूदी रेसिपी (Mint-Jalapeno Smoothie)
अलॅपिनो आणि मिंट अर्थात पुदीन्याचा दोन्हीचा स्वाद हा थोडा तिखटसर असतो. त्यामुळे तुम्हाला गोड स्मूदी आवडत नसतील तर ही स्मूदी तुम्ही नक्की ट्राय करा.
साहित्य
- पाऊण कप ताजा पुदीना
- 1 बी असणारे अलॅपिनो पावडर
- 2 ½ चमचे मध
- चिमूटभर मीठ
- 2 कप दही
- बर्फ
- वरून घालण्यासाठी जिरे आणि सिलांट्रो
कृती
वरील सर्व मिश्रण ब्लेंडर मधून वाटून घ्या. स्मूदी तयार झाल्यानंतर त्यावर जिरे आणि सिलांट्रो पसरवा. दिसायाला आणि स्वादालाही हे उत्तम लागतं.
लिक्विड डाएटच्या मदतीने महिन्याभरात करा वजन कमी
पीच-मँगो-केळ्याची स्मूदी (Peach, Mango & Banana Smoothie)
आंब्याच्या सीझनमध्ये ही स्मूदी तुम्ही नक्कीच ट्राय करायला हवी. या तिघांच्या कॉम्बिनेशनची चव अप्रतिम लागते.
साहित्य
- 1 कप पीच
- 1 आंबा
- 1 कप दही
- 1 कप बर्फ
- अर्धे केळं
- चवीपुरती साखर
कृती
आंब्याच्या फोडी करून घ्या. पीच कापून तुकडे करा. हे सर्व ब्लेंडरमध्ये मिक्स करून घ्या. चवीला ही स्मूदी अप्रतिम लागते आणि तुम्हाला दरवर्षी आंब्याच्या हंगामात नक्कीच ही स्मूदी करून प्यायला आवडेल.
स्मूदी बनविण्यासाठी कशाचा उपयोग करावा (Things To Remember While Making Smoothie)
स्मूदीच्या रेसिपी जाणून घेण्याआधी स्मूदी बनविण्यासाठी कशाचा उपयोग करून घेता येतो ते जाणून घेऊया.
- दूध, टोन्ड अथवा फुल क्रिम असणाऱ्या दुधाचा वापर करता येतो
- ज्या लोकांना दूध आवडत नाही त्यांना सोया दूध वापरता येते. यामध्ये प्रोटीन अधिक प्रमाणात मिळते
- जाड स्मूदी बनवायची असेल तर तुम्ही दह्याचा वापर करू शकता
- बदाम दूध अथवा सुक्या मेव्याच्या दुधाचा वापरही तुम्हाला करता येतो
- स्मूदीमध्ये काळा अथवा हर्बल चहा वापरल्यास, अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण वाढते आणि स्मूदीची गोडीही कमी होते
- आईस्क्रिम, थंड सरबत याचा वापर केल्यास, बर्फाची आवश्यकता भासत नाही
- सोडा घातल्याने स्मूदी हलकी बनते आणि लिंबू वापरल्यासदेखील तुम्ही सोड्याचा वापर यात करू शकता
- काहीच नसल्यास, तुम्ही पाण्याचा वापरही करू शकता
- जेवणाच्या ठिकाणी तुम्हाला स्मूदी प्यायची असेल तर त्यात प्रोटीन पावडर अथवा पनीरचे पाणी मिक्स करा. पोट भरलेले राहील
घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा