ADVERTISEMENT
home / Fitness
दातांवर प्लाक साचण्यास हे खाद्यपदार्थ असतात कारणीभूत

दातांवर प्लाक साचण्यास हे खाद्यपदार्थ असतात कारणीभूत

पूर्वी दातांच्या सौंदर्याकडे फार लक्ष दिले गेले नसले तरी आता मात्र दातांचे सौंदर्य अधिक पाहिले जाते. यामुळेच की काय दातांचे सौंदर्य वाढवणाऱ्या अनेक ट्रिटमेंट सध्या आपल्याकडे उपलब्ध आहेत. दातांवर कोणत्याही महागड्या ट्रिटमेंट करायच्या नसतील तर तुम्हाला अगदी बारीक बारीक गोष्टीतून दाताची काळजी घेता यायला हवी. दात खराब दिसण्यासाठी किंवा दात अस्वच्छ वाटणारी पहिली गोष्ट म्हणजे दातांवर साचणारी ‘प्लाक’. आपण जे अन्नपदार्थ खातो. त्यातील काही कण आपल्या दाताला चिकटून राहतात. दातावरुन तो थर निघाला नाही की, तो तसाच साचत राहतो आणि दातावर एक पिवळसर झाक तयार होते त्याला ‘Plaque’ असे म्हणतात. साधी सोपी वाटणारी ही गोष्ट दातांसाठी दुखणे बनून बसते. असे कोणते खाद्यपदार्थ आहेत.जे खाल्ल्यामुळे तुमच्या दातांवर प्लाक जास्त साचण्याची शक्यता असे ते पाहुया.

तुमचे smile खुलवणाऱ्या या नव्या उपचारपद्धती तुम्हाला माहीत आहेत का

कोल्ड ड्रिंक्स

कोणतेही कोल्ड ड्रिंक्स

Instagram

ADVERTISEMENT

दातांमध्ये प्लाक साचण्यासाठी कारणीभूत असलेला पहिले पदार्थ म्हणजे कोल्डड्रिंक्स. अनेकांना कोल्डड्रिंक्स प्यायला आवडते.पण कोल्डड्रिंक्समध्ये असलेली साखर तुमच्या आरोग्यासाठी जशी हानिकारक असते. तशीच ती तुमच्या दातांच्या आरोग्यासाठी हानिकारक असते. कोल्ड ड्रिंक्समधील साखर दातांना चिकटून राहते. ती तुमच्या डोळ्यांना अगदी पटकन दिसत नसली तरी ती तुमच्या दातांना चिकटलेली असते. अगदी पहिल्यावेळी तुम्हाला तुमच्या दातांवर चिकटलेली साखर दिसत नाही. पण कालांतराने तुम्हाला दातांवर पिवळा थर साचलेला दिसेल. याकडे दुर्लक्ष केले तर हा प्लाक कडक होतो आणि तुमच्या हिरड्यांना त्रासदायक ठरतो.

केक किंवा मिष्ठान्न

केक

Instagram

केक किंवा कोणतीही मिठाई खाल्ल्यानंतर तुम्ही अगदी आवर्जून दात घासायला हवे. कारण मिठाई किंवा केक यामध्ये साखरेचे प्रमाण हे जास्त असते. ते खाल्लायनंतर तुमच्या दातांमध्ये ते अधिक काळ तसेच राहतात. तुम्हाला हे गोड पदार्थ टाळता येत नसतील तर तुम्ही तुमच्या काही सवयी बदला हे पदार्थ खाल्ल्यानंतर फ्लॉस करायला अजिबात विसरु नका. 

ADVERTISEMENT

चॉकलेट

चॉकलेटचे अति सेवन

Instagram

चॉकलेटही अनेकांना काही केल्या टाळता येत नाही. पण चॉकलेटमध्ये असलेली साखर तुमच्या दातांच्या आरोग्यासाठी चांगली नाही. चॉकलेट खाण्यामुळे दात किडतात हे इतकेच तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला त्यामुळे होणारा प्लाकचा त्रासही माहीत हवा. चॉकलेटमध्ये असलेली साखरही तुमच्या दातांना चिकटून राहते आणि दातांवर पिवळा प्लाक तयार करते. 

पाव किंवा ब्रेड

बर्गर किंवा पिझ्झा

ADVERTISEMENT

Instagram

मैद्याचे पदार्थही तुमच्या दातांसाठी चांगले नाही. बर्गर किंवा पिझ्झा असे पदार्थ तुम्ही सतत खात असाल तर तुम्हाला दातांची काळजी घेणे फारच गरजेचे असते. मैदा तुमच्या दाताला चिकटून राहतो. या पदार्थांमध्येही साखर आणि स्टार्च असते. ती तुमच्या दाताला चिकटून राहते आणि तुमच्या दातांवर प्लाक साचतो. हा प्लाक स्वच्छ केला नाही तर तो कडक होतो. अनेकदा प्लाकचा रंग पिवळा असतो पण त्याकडे दुर्लक्ष करतो कालांतराने त्यांचा रंग काळा पडू लागतो.दातांभोवती ते इतका कडक थर तयार करतात की, ते काढण्यासाठी डेंटिस्टची मदत घेणे अनिवार्य असते.

तुमच्या दातांच्या सौंदर्याचा विचार करणेही तितकेच गरजेचे

दुधाचे पदार्थ

दुग्धजन्य पदार्थ

ADVERTISEMENT

Instagram

दुग्धजन्य पदार्थ म्हणजे पनीर, चीझ, मेयोनिज या सगळ्यामध्ये साखर असते. साखरशिवाय यामध्ये स्टार्च ही असते त्यामुळे या पदार्थांमुळेही तुमच्या दातांवर थर साचतो. नुकतेच दात आलेल्या बाळांची काळजी घेणेही गरजेचे असते. कारण लहान बाळांना दिवसभर दूध दिले जाते. त्यानंतर त्यांचे दात आपण सतत घासत नाही. त्यामुळे त्यांच्या दातावर अगदी सहज प्लाक साचतो. दात शुभ्र पांढरे ठेवण्यासाठी घरगुती उपाय म्हणून तुम्ही दुधाचे कोणतेही पदार्थ खाल्ल्यानंतर फ्लॉस करायला आणि दात स्वच्छ करायला विसरु नका. प्लाकचा त्रास हा सगळ्यांनाच असतो. तो टाळता येत नसला तरी काळजी घेता येते. त्यामुळे कोणत्याही पदार्थाचे सेवन केल्यानंतर चूळ भरा आणि दात स्वच्छ ठेवा.  

दातदुखीसाठी घरगुती उपाय, मिनिटात मिळेल आराम (Tips To Get Rid Of Toothache In Marathi)

05 Aug 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT