गरोदरपणी स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होत असतात. त्यामुळे घरातील आणि ओळखीतील अनुभवी महिला गरोदर स्त्रीयांना खाण्या-पिण्याबाबत अनेक सल्ले देत असतात. स्वाभाविक आहे पहिल्यांदाच आई होणाऱ्या मातेला हे सल्ले ऐकून अधिक चिंता वाटू लागते. कारण यातला कोणता सल्ला घ्यावा आणि कोणता नको हे तिला ठरवता येत नाही. गरोदर महिलांनी नारळपाणी प्यावे की नाही याबाबतही अनेक समज-गैरसमज आहेत. म्हणूनच आम्ही तुमच्या मनातील हा गुंता हळूवार सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Shutterstock
गरोदर महिलांना नारळपाणी पिणे सुरक्षित आहे का –
या प्रश्नाचं उत्तर असं की, गरोदर महिलांसाठी नारळपाणी अतिशय सुरक्षित आणि लाभदायक आहे. अनेक संशोधनात असं आढळून आलं आहे की गरोदर असताना नारळपाणी पिण्यामुळे होणाऱ्या बाळावर चांगला आणि सकारात्मक परिणाम होतो. याचं महत्त्वाचं कारण असं की यामुळे महिलांचा गर्भपाताचा धोका कमी होतो. त्यामुळे गरोदर महिलांनी या काळात नियमित नारळपाणी पिण्यास काहीच हरकत नाही.
Shutterstock
नारळपाण्यामुळे गरोदर महिलांना काय फायदे मिळतात –
गरोदर महिलांना बाळाच्या वाढ आणि विकासासाठी पुरेशा पोषणाची गरज असते. नारळपाण्यातील पोटॅशिअम, सोडिअम आणि मॅग्नेशिअममुळे त्यांना अनेक पोषकतत्वे मिळू शकतात. त्याचप्रमाणे आणखी काय काय फायदे मिळतात हे अवश्य वाचा.
नारळपाण्यातून मिळते इलेक्ट्रोलाईटस –
गरोदर महिलांच्या शरीराला मॉर्निंग सिकनेस अथवा उलटी, मळमळमुळे इलेक्ट्रोलाईट्सची गरज असते. नारळपाण्यात भरपूर प्रमाणात इलेक्ट्रोलाईट असतात. शिवाय त्याच सोडिअम, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, कॅल्शिअमसारखी खनिजंही असतात. ज्यामुळे गरोदर महिलांना नारळपाणी पिण्याने पटकन फ्रेश आणि टवटवीत झाल्यासारखं वाटतं. या इलेक्ट्रोलाईट्समुळे त्यांच्या शरीरातील पीएच स्तर नियंत्रित राहण्यास मदत होते.
Shutterstock
शरीर हाडट्रेट राहण्यास मदत होते –
नारळपाणी गरोदर महिलांसाठी गुणकारी असण्याचं आणखी एक कारण म्हणजे यामुळे त्यांचे शरीर सतत हाडड्रेट राहते. याकाळात महिलांना द्रव्य पदार्थांच्या सेवनाची जास्त गरज असते. कारण यामधून त्यांच्या शरीरातील एमिनोटिक फ्लुअड म्हणजेच गर्भजलाची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. बाळाला हालचाल करण्यासाठी आणि आवश्यक रक्तपूरवठा होण्यासाठी गर्भजल उपयु्क्त असतं. नारळपाण्यामुळे गर्भजलाची पातळी नियंत्रित राहते आणि बाळाचे पोषण होते.
रक्तदाब आणि मधुमेहाला नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर –
गरोदरपणात अनेक महिलांना अचानक रक्तदाब वाढण्याचा अथवा गर्भापणातील मधुमेहाचा त्रास जाणवतो. अशा वेळी त्या महिलांनी नारळपाणी पिल्यास त्यांना नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. नारळपाण्यामुळे गर्भवती महिलांचा रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होऊ शकते.
Shutterstock
गरोदरपणी नारळपाणी किती प्रमाणात प्यावे –
गरोदर महिलांना कोणत्याही गोष्टीचे अतीसेवन मुळीच करू नये. म्हणूनच नारळपाणी फायदेशीर असले तरी प्रमाणातच घ्यावे. त्यामुळे तुमच्या शरीरप्रकृतीनुसार तुम्हाला किती प्रमाणात नारळपाणी पिण्याची गरज आहे हे तुमच्या डॉक्टरांना विचारणे योग्य ठरेल. शिवाय जर तुम्हाला रक्तदाब, मधुमेह अथवा इतर आरोग्य समस्या असतील तर अशा वेळी तुम्ही नारळपाणी पिणे सुरक्षित आहे का हे तुमच्या डॉक्टरांना व्यवस्थित सांगता येऊ शकते. कारण कधू कधी नारळपाणी पिण्यामुळे या समस्या वाढू शकतात. त्याचप्रमाणे या काळात महिलांनी पोषक आणि संतुलित आहार घ्यावा.ज्यामुळे सर्व प्रकारची जीवनसत्वे बाळाला मिळतील आणि त्याची योग्य वाढ आणि विकास होईल. याकाळात महिलांनी मद्यपान, धुम्रपान, कॅफेनसारखी उत्तेजक पेय घेणे टाळावे.
फोटोसौजन्य – शटरस्टॉक
अधिक वाचा –
गरोदर महिलांसाठी सर्दी-खोकल्यावर घरगुती उपाय
गरोदर राहण्यासाठी करण्यात येतोय मेन्स्ट्रूअल कपचा वापर
गरोदरपणातही करा ही सोपी योगासने