ADVERTISEMENT
home / Bath and Body Products
Benefits Of Sea Salt Scrub In Marathi

त्वचेचे सौंदर्य खुलवेल सी सॉल्ट स्क्रब (Sea Salt Scrub For Skin In Marathi)

त्वचेवरील मृत त्वचा काढून टाकणे हे स्क्रबचे मुख्य काम.याशिवाय त्वचेवरील मळ, घाण काढून टाकण्यासही स्क्रब मदत करते. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे स्क्रब मिळतात. स्ट्राबेरी, शुगर, वॉलनट, कॉफी, फ्रुट असे वेगवेगळ्या प्रकारचे स्क्रब त्वचेसाठी वेगवेगळ्या पद्धतीने फायदेशीर असतात. आज आपण जाणून घेणार आहोत सी सॉल्ट स्क्रब (Sea Salt Scrub) विषयी. सी सॉल्ट स्क्रब याचे त्वचेशी निगडीत अनेक फायदे आहेत. या स्क्रबचा नेमका उपयोग कसा करायला हवा आणि त्याचे तुमच्या त्वचेसाठी आवश्यक असलेले फायदे कोणते? या विषयी आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घ्या सी सॉल्ट स्क्रबविषयी अधिक माहिती

सी सॉल्ट स्क्रब म्हणजे काय? (What Is Sea Salt Scrub In Marathi)

सी सॉल्ट स्क्रब

Instagram

ADVERTISEMENT

समुद्रातून मिळणाऱ्या मिठापासून तयार झालेल्या या स्क्रबला ‘सी सॉल्ट स्क्रब’ असे म्हणतात. मिठाचा उपयोग हा त्वचा एक्सफोलिएट करण्यास काम करते. सी सॉल्टचेही वेगवेगळे प्रकार आहेत. यामध्ये तुम्हाला ‘हिमालयन सी सॉल्ट’, ‘कोशेर सॉल्ट’, ‘फ्लेक सॉल्ट’, ‘टेबल सॉल्ट’, ‘काला नमक’ असे वेगवेगळे प्रकार यामध्ये मिळतात. मिठाचा उपयोग करत त्याचा स्क्रब म्हणून उपयोग करण्यासाठी त्यामध्ये लिंबू किंवा वेगवेगळ्या इसेन्शिअल ऑईलचा उपयोग केला जातो. तर साधारणपणे अशा पद्धतीने मिठाचा उपयोग करणे यालाच ‘सी सॉल्ट स्क्रब’ असे म्हणतात. चांगल्या त्वचेसाठी समुद्री मीठ स्क्रब लावा. आता जाणून घेऊया सी सॉल्ट स्क्रबचे फायदे

सी सॉल्ट स्क्रबचे फायदे (Benefits Of Sea Salt In Marathi)

सी सॉल्ट स्क्रबचे अनेक फायदे आहेत. तुमच्या त्वचेसाठी ते किती फायदेशीर आहेत ते आता आपण जाणून घेऊयात

त्वचा एक्सफोलिएट (Exfoliate The Skin)

त्वचा करते एक्सफोलिएट

ADVERTISEMENT

Instagram

त्वचा स्वच्छ करण्याचे काम ‘सी सॉल्ट स्क्रब’ फार उत्तम पद्धतीने करते. त्वचेवरील मृत त्वचा काढून टाकण्यास सी सॉल्ट स्क्रब फारच उत्तम आहे. मिठामध्ये असलेले गुणधर्म त्वचेवरील घाण, धूळ, छिद्र स्वच्छ करण्याचे काम करतात. त्यामुळे मिठाचा पहिला आणि महत्वाचा गुणधर्म म्हणजे तुमची त्वचा खोलवर स्वच्छ करणे. रोजच्या गडबडीत आपल्याला त्वचेची खोलवर स्वच्छता करणे जमत नाही. अशावेळी मिठाचा स्क्रब तुमच्यासाठी फारच फायद्याचा ठरतो. तुमच्या घरी असलेले कोणत्याही प्रकारचे मीठ घेऊन त्यामध्ये लिंबाचा रस किंवा तुमच्या आवडीचे कोणतेही ऑईल घ्यावे. आंघोळ करताना या स्क्रबने संपूर्ण शरीर घासून काढावे. असे करताना त्याचा अतिरिक्त वापर करणे टाळा. 

वाचा – आरोग्यासाठी कॉफीचे फायदे

त्वचेचा PH राखण्यास मदत करते (Maintains Ph Of The Body)

त्वचेसाठी PH हा फार महत्वाचा असतो. PH म्हणजे पोटँशिअल हायड्रोडन. तुमच्या त्वचेची PH पातळी ही 5 असणे तरी गरजेचे असते. ती जर या पातळीपेक्षा खाली असेल तर त्वचेच्या इतर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. पण ती जर 5 आणि 5 पेक्षा जास्त असेल तर तुमच्या त्वचेला त्याचा फारसा त्रास होत नाही. सी सॉल्ट स्क्रब तुमच्या त्वचेचा PH राखण्यास मदत करते.

ADVERTISEMENT

वाचा – खडीसाखरेचे आरोग्यदायी फायदे

त्वचा पूर्ववत करण्यास मदत करते (Helps To Regenerate Your Skin)

त्वचा पूर्ववत करते

Instagram

त्वचेवरील मृत त्वचा काढून टाकल्यानंतर येणारी नवीन त्वचा चांगली राहावी यासाठी तुम्ही सी सॉल्ट स्क्रबचा उपयोग करा. नवीन त्वचा ती त्वचाही चांगली येते. त्यामुळे जर तुम्हाला त्वचेसंदर्भात काही तक्रारी असतील तर तुम्ही आठवड्यातून दोन वेळा तरी तुम्ही कोणत्याही सी सॉल्टचा उपयोग करा. तुम्हाला तुमची त्वचा खूप बदललेली दिसेल. निरोगी त्वचेसाठी आपण कोरियन त्वचेची काळजी घेण्याचा दिनक्रम देखील वापरू शकता. जर तुम्हाला मिठाने त्रास होत असेल तर तुम्ही त्याचा वापर करताना थोडा जपून करा.

ADVERTISEMENT

त्वचेवरील ताण कमी करते (Reduces Skin Tension)

त्वचा सुंदर करणे हे इतकेच काम सी सॉल्ट करत नाही. तर तुमची त्वचा आराम देण्याचे कामही सी सॉल्ट करते. व्यायाम करताना किंवा खूप चालल्यानंतर तुमचे अंग सांधे दुखू लागले असतील तरी तुम्हाला सी सॉल्ट स्क्रब वापरता येते. पायाला किंवा दुखणाऱ्या भागी सी सॉल्ट लावून तुम्ही त्यावर गरम कपड्याचा शेक द्या. त्यामुळे तुमच्या त्वचेवरील ताण कमी होतो आणि तुमची दुखापतही कमी होते. त्यामुळे तुम्ही अशापद्धतीनेही याचा वापर करु शकता. 

त्वचेचे तारुण्य राखते (Maintains Youthful Skin)

त्वचेचे तारुण्य

Instagram

चिरतरुण त्वचा कोणाला आवडत नाही. सी सॉल्टमध्ये असलेले अँटी-बॅक्टेरीअल गुणधर्म हे त्वचेसाठी फायदेशी असतात. कारण त्वचेवर बॅक्टेरीया असतील तर त्यामुळे पिंपल्स आणि पुरळ येण्याची शक्यता अधिक असते. सी सॉल्टचा वापर केल्यामुळे या बॅक्टेरीया मरतात. त्यामुळे तुम्हाला पिंपल्स आणि पुरळ येत नाहीत. सी सॉल्ट मसाज त्वचेला झाल्यामुळे त्वचा फ्रेश दिसते. तसेच चेहर्यावरील तेले त्वचेसाठी फायदेशीर असतात. तुम्हालाही तुमच्या त्वचेचे तारुण्य राखायचे असेल तर तुम्ही सी सॉल्टचा वापर नक्की करायला हवा.

ADVERTISEMENT

पिंपल्सचे डाग आणि काळवंडलेली त्वचा उजळवते (Fades Dark Spot And Blemishes)

पिंपल्सचा त्रास अनेकांना असतो. काहींना पिरेड्सच्या आधी तर काहींना सतत पिंपल्स येतात. कधी कधी आपण पिंपल्सना इतके वैतागतो की, ते फोडण्याचा प्रयत्न करतो. तर काही पिंपल्स हे इतके हट्टी असतात की, त्यामुळे तुमच्या त्वचेवर त्याचे डाग तसेच राहतात. त्यामुळे तुमची त्वचा अधिक काळवंडते. तुमच्या पिंपल्ससाठी आणि काळवंडलेल्या त्वचेसाठी सी सॉल्ट स्क्रब हे फारच उत्तम आहे. त्याच्या वापरामुळे त्वचेवर असलेले पिंपल्सचे डाग कमी होण्यास मदत मिळते

पोअर्स करतात कमी (Minimize Large Pores)

पोअर्स करतात कमी

Instagram

तुमचा चेहरा तुमची ओळख असते हे खरे असले तरी सौंदर्याच्या दृष्टिकोनातून तुमची त्वचा सुंदर असेल तर तुमचा चेहरा अधिक ओळखीचा होतो. चेहऱ्याच्या विचार केला तर आपल्या चेहऱ्यावर बारीक बारीक छिद्र असतात. वय वाढते तशी ही छिद्र मोठी होऊ लागतात.त्याला ‘पोअर्स’ असे म्हणतात. काही जणांना ऐन तारुण्यात असे पोअर्स चेहऱ्यावर येऊ लागतात. सी सॉल्ट त्यावर उत्तम काम करु शकते. सी सॉल्टच्या वापरामुळे तुमच्या त्वचेवरील पोअर्स कमी होण्यास मदत मिळते. मिठामुळे तुमच्या त्वचेवरील ही छिद्र आंकुचित होतात आणि तुमची त्वचा अधिक तरुण दिसू लागते. 

ADVERTISEMENT

त्वचा करते डिटॉक्स (Detoxify The Skin)

सी सॉल्टमध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशीअम आणि मिठाचे पाणी असते. जे तुमच्या त्वचेची जळजळ कमी करुन तुमच्या त्वचेचे डिटॉक्स करायला मदत करते. समुद्राच्या पाण्यामध्ये असणारे मिनरल्स त्वचेसाठी फायदेशीर असते. ते त्वचा डिटॉक्स करण्यासोबत तुमच्या त्वचेला नवा तजेला आणण्याचे काम करतात. त्वचा डिटॉक्स झाल्यामुळे तुमच्या त्वचेचा कोरडेपणा यासारख्या अनेक समस्या कमी होतात. त्वचेला तजेला देण्याचे काम डिटॉक्स गुणधर्म असलेले स्क्रब करते त्यामुळे सी सॉल्ट स्क्रब हे अत्यंत फायदेशीर ठरते.

सुरकुत्या करते कमी (Reduces Fine Lines And Wrinkles)

सुरकुत्या करते कमी

Instagram

त्वचेच्या अनेक समस्येपैकी एक समस्या म्हणजे वार्धक्याची लक्षणे दिसणे. जर तुम्हाला त्वचेवर सुरकुत्या दिसत असतील. तर त्या कमी करण्यासाठी सी सॉल्ट स्क्रब फारच उत्तम आहे. सी सॉल्ट स्क्रबच्या वापरामुळे तुमच्या त्वचेला तजेला मिळतो. तुमच्या त्वचेखालील तारुण्य टिकवून ठेवणारे कोलॅजन बुस्ट करण्यास मदत मिळते. तुमची सुरकुतलेली आणि सैल पडलेली त्वचा अधिक घट्ट आणि तरुण दिसू लागते. सी सॉल्टच्या वापराचा हा एक फायदा तुम्हाला होऊ शकतो. 

ADVERTISEMENT

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)

1. सी सॉल्ट तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेसाठी चांगले असते का?

कोणत्याही स्क्रबचा जास्त प्रयोग त्वचेसाठी चांगला नसतो. चेहऱ्याची त्वचा ही फार नाजूक असते. त्यामुळे सी सॉल्टचा वापर चेहऱ्यासाठी करणे टाळा. मिठामुळे तुमच्या त्वचेला काही दुखापत होण्याची शक्यता असते. त्यामुळे सी सॉल्ट स्क्रबचा उपयोग तुम्ही चेहऱ्यासाठी टाळणे फारच उत्तम

2. मीठाच्या स्क्रबपेक्षा साखरेचा स्क्रब चांगला असतो का?

तुमच्या त्वचेवरील मृत त्वचा काढून त्याला मुलायम करण्याचे काम साखर आणि मीठ दोन्ही करते. पण साखर चेहऱ्यावर थोडी सौम्य असते. तर मीठामुळे तुमच्या त्वचेला चीर किंवा जखमा होऊ शकतात. त्यामुळे मीठापेक्षा साखर ही त्या तुलनेत बरी आहे. पण तरीदेखील साखरेच्या अति प्रयोगानेही त्वचेला हानी पोहोचू शकते. साखरेची दरदीत वाटलेली पावडर तुम्ही वापरु शकता.

3. सी सॉल्टचा उपयोग आठवड्यातून किती दिवस करायला हवा?

कोणत्याही स्क्रबचा उपयोग हा आठवड्यातून एकदा फार-फार दोनदा करायला हवा. तरच त्याचा फायदा तुम्हाला मिळू शकतो. जर तुम्ही त्याचा जास्त वापर केला तर मात्र तुम्हाला त्याचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमची त्वचा कोरडी पडू शकते.

06 Sep 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT