ADVERTISEMENT
home / Natural Care
पुरळ घरगुती उपाय

पुरळ घरगुती उपाय, असे कमी करा अंगावरील रॅशेस | Home Remedies For Skin Rashes In Marathi

भारतात कोणताही ऋतू असला तरी उन्हाळा कायमस्वरूपी असतोच. त्यामुळे उन्हाची काहिली वाढू लागली की घाम आणि दुर्गंधीमुळे अंगावर अनेक त्वचेच्या समस्या निर्माण होतात. ओलसरपणा, सतत येणाऱ्या घामामुळे अंगावर पुरळ उठणे (पाठीवर पुरळ येणे, घामोळ्या उठणे अशा समस्या निर्माण होऊ लागतात. असह्य ऊन आणि घामामुळे झालेल्या रॅशेसची खाज यामुळे अक्षरशः जीव नकोसा वाटू लागतो. शरीराला थंडावा मिळण्यासाठी आणि अंगावरील घामोळे आणि पुरळ कमी करण्यासाठी तुम्ही घरीच काही गोष्टी करू शकता. अंगावरील पुरळ घरगुती उपाय करून कमी करता येते यासाठीच हे काही सोपे घरगुती उपाय जरूर करून पाहा.

कोल्ड कॉम्प्रेस (Cold Compress)

अंगावर उठलेल्या पुरळ अथवा रॅशेसची खाज, जळजळ कमी करण्याचा एक सोपा आणि पटकन करण्यासारखा उपाय म्हणजे कोल्ड कॉम्प्रेस. यासाठी तुम्ही थंड पाण्याने अंघोळ करू शकता, अंगावर बर्फ चोळू शकता अथवा बर्फ ठेवलेल्या टॉवेलने अंग शेकवू शकता. थंड पाण्यामुळे पुरळामुळे होणारा दाह काही  क्षणांसाठी नाहिसा होतो. अंगावरील सूज, खाज कमी होते आणि पुरळ अधिक प्रमाणात वाढत नाही. बर्फामुळे तुमच्या प्रभावित भागावरचा रक्तप्रवाह रोखला जातो. ज्यामुळे बर्फ लावलेल्या भागावरची जळजळ आणि दाह थांबतो. बाजारात असं बर्फाने शेकवण्यासाठी आईस बॅग अथवा आईस पॅड मिळतात त्याने तुम्ही तुमचं पुरळ कमी करू शकता.

कसा कराल उपाय:

  • आईस बॅग अथवा एखाद्या प्लास्टिक बॅग, कापडामध्ये बर्फाचे तुकडे भरा
  • हे कापड अथवा बॅग तुमच्या पुरळ उठलेल्या त्वचेवरून फिरवा
  • तुमच्या त्वचेवरील खाज कमी होईपर्यंत हा उपाय करा
  • गरज असेल तर थोड्या थोड्यावेळाने  हा उपाय करा

कोरफडाचा गर (Aloe Vera Uses In Marathi) 

कोरफड हे अॅंटि इनफ्लैमटरी, अॅंटि मायक्रोबायल, अॅंटिव्हायरल, अॅंटि ऑक्सिडंट आणि अॅंटि बॅक्टेरिअल आहे. कोरफड मध्ये जखमा भरून काढणारे गुणधर्म असतात. कोरफड मध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई, बी 12, कॅल्शियम, झिंक, मॅग्नेशियम असतं. ज्यामुळे तुमच्या त्वचेच्या समस्या लवकर बऱ्या होतात. शिवाय यामुळे तुमच्या त्वचेवर कोणताही दुष्परिणाम होत नाही.  त्यामुळे तुम्ही तुमच्या त्वचेचा दाह कमी करण्यासाठी कोरफडाचा  गर एखाद्या मलमाप्रमाणे वापरू शकता. कोरफडाचे फायदे जाणून घेण्यासाठी ही माहिती अवश्य वाचा.

ADVERTISEMENT

कसा कराल उपाय:

  • कोरफडीच्या पानांमधून गर काढून घ्या
  • पुरळ उठलेला भाग स्वच्छ पाण्याने धुवून पूसून घ्या
  • कोरफडाचा गर त्या भागावर लावा आणि त्वचेमध्ये मुरू द्या
  • दिवसभरात कमीत कमी दोनदा हा उपचार करा

aloevera-gel
ओटमील बाथ (Oatmeal Bath)

आहारात ओटस् चा वापर एक पौष्टिक धान्य म्हणून केला जातो. पण एवढंच नाही तर ओट्स तुम्ही तुमच्या त्वचेच्या समस्या  कमी करण्यासाठी देखील वापरू शकता. आजकाल अनेक त्वचेवर लावण्यात येणाऱ्या औषधांमध्ये ओट्स वापरण्यात येते. ओट्स हे अॅंटि इनफ्लैमटरी आणि अॅंटि ऑक्सिडंट आहे. ज्यामुळे तुमच्या त्चचेच्या समस्या कमी होतात, खाज, जळजळ, कोरडेपणा आणि त्चचेचा राठपणा कमी करण्यासाठी तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता. ओट्समध्ये तुमची त्वचा बरी करणारे गुणधर्म असतात. यासाठी नियमित ओटमीलच्या पाण्याने अंघोळ करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

कसा कराल उपाय:

  • पाण्याच्या एका बादलीमध्ये कोमट पाणी आणि एक कप मिक्सरमध्ये वाटलेली ओटस पावडर टाका
  • ओट्सची पावडर पाण्यात व्यवस्थित विरघळू द्या
  • पाण्यात ओट्स तीस मिनीटे भिजल्यावर तुम्ही  तुमच्या गरजेनुसार आणखी पाणी त्यात टाकू शकता
  • या पाण्याने दिवसभरात कमीत कमी दोन वेळा अंघोळ करा

नारळाचे तेल (Coconut Oil Benefits In Marathi)

नारळाचे तेल हे त्वचेच्या कोणत्याही समस्येवर अगदी रामबाण उपाय प्रमाणे काम करते. ज्यामुळे पुरातन काळापासून त्वचेच्या समस्या, जखमा बऱ्या करण्यासाठी नारळाच्या तेलाचा वापर केला जातो. नारळाच्या तेलात सॅच्युरेटेड फॅट  आणि अॅंटिसेप्टिक गुणधर्म असतात. नारळाच्या तेलाचे फायदे अनेक आहेत यासाठीच अंगावरील पुरळ कमी करण्यासाठी या तेलाचा वापर करणं फायदेशीर ठरेल.

ADVERTISEMENT

कसा कराल उपाय:

  • नारळाचे  तेल त्वचेसाठी उत्तम असल्यामुळे पुरळ उठलेल्या भागाप्रमाणेच संपूर्ण शरीरावर तुम्ही कुठेही हे तेल लावू शकता.
  • ज्यामुळे तुमच्या त्वचेची खाज आणि दाह त्वरीत कमी होते
  • नारळाचे तेल वापरण्यापूर्वी ते थोडं कोमट करून घ्या आणि मसाज करून त्वचेत मुरवा
  • शुद्ध नारळाचे तेल वापरल्यास तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो

वाचा – Ushnata Kami Karnyache Upay

टी ट्री ऑईल (Tea Tree Oil)

टी ट्री ऑईल अॅंटि सेप्टिक आणि अॅंटि इनफ्लैमटरी असल्यामुळे याचा वापर तुम्ही तुमच्या अंगावरील पुरळ कमी करण्यासाठी नक्कीच करू शकता. झाडाच्या खोडाच्या अर्कापासून काढलेलं हे एक इसेंशिअल ऑईल असतं. काही संशोधनात असं आढळून आलं आहे की, यामुळे त्वचेचा दाह आणि जळजळ कमी होऊ शकते. टी ट्री ऑईल बॅक्टेरिआ, विषाणू, बुरशी नष्ट करून त्वचेला इन्फेक्शन पासून दूर ठेवते. 

कसा कराल उपाय:

ADVERTISEMENT
  • टी ट्री ऑइल त्वचेवर थेट कधीच लावू नये यासाठी ते नारळाच्या अथवा इतर कोणताही तेलात मिसळून लावावे
  • तुम्ही तुमच्या मॉईस्चराईझरमध्येही हे तेल मिसळू शकता
  • अंघोळ करताना तुम्ही ते तुमच्या पुरळ उठलेल्या भागावर लावू शकता
  • मात्र ते लावण्याआधी त्याची पॅच टेस्ट घ्या  ज्यामुळे तुम्हाला  त्याची अॅलर्जी आहे का हे समजेल

पुरळ घरगुती उपाय
बेकिंग सोडा (Baking Soda Uses In Marathi)

बेकिंग सोडा हा फार पूर्वीपासून त्वचेची खाज, जळजळ कमी करण्यासाठी वापरण्यात येत आहे. त्यामुळे हा एक सुरक्षित आणि योग्य  असा घरगुती उपाय नक्कीच आहे. बेकिंग सोडाचा वापर केल्याने तुमच्या अंगावरील पुरळ, घामोळे नक्कीच कमी होऊ शकतात. त्वचेला थंडावा देण्यासोबत यामुळे त्वचेचा पी एच बॅलन्स देखील राखला जातो. त्वचेवर बेकिंग सोडा वापरण्याचे काय फायदे आहेत हे तुम्हाला नक्कीच माहीत असायला हवं.

कसा कराल उपाय:

  • एका बाथटबमध्ये एक ते दोन कप बेकिंग सोडा मिसळा
  • या पाण्याने अंघोळ करा अंग कोरडे करा आणि अंगाला मॉईस्चराईझ करा
  • तुम्ही बेकिंग सोडा आणि पाणी मिसळून तयार केलेली पेस्टदेखील तुमच्या पुरळ उठलेल्या भागावर लावू शकता

अॅपल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar)

त्वचेची निगा राखण्यासाठी आणि त्वचेच्या समस्या कमी करण्यासाठी अनेक काळापासून अॅपल सायडर व्हिनेगर घरगुती उपाय म्हणून वापरले जाते. कारण अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये अॅंटि मायक्रोबायल घटक असतात. अनेक संशोधनात असं आढळलं आहे की अॅपल सायडर व्हिनेगरमुळे बॅक्टेरिआपासून त्वचेचं रक्षण होतं. 

कसा कराल उपाय:

ADVERTISEMENT
  • पाण्यात अॅपल सायडर व्हिनेगर मिसळा आणि तुमच्या अंगावरील पुरळ उठलेल्या भागावर लावा
  • जर पुरळ उठणाऱ्या भागामध्ये जखम झाली असेल तर मात्र हा उपाय करू नका
  • अॅपल सायडर व्हिनेगर कॉटन पॅडने तुम्ही पुरळावर लावू शकता
  • अॅपल सायडर व्हिनेगर पाण्यात मिसळून अंघोळ केल्यानेही तुम्हाला चांगला फायदा होतो

सी सॉल्ट अथवा समुद्री मीठ (Sea Salts)

खडे मीठ अथवा समुद्री मीठ निर्जंतूकीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. मीठाच्या पाण्याने अंघोळ केल्यामुळे तुमचे स्नायू मोकळे होतात शिवाय अंगावरील जीवजंतू नष्ट होतात. अंगावर खाज येत असेल, पुरळ उठलं असेल, घामोळे आलं असेल अथवा जळजळ होत असेल तर आंघोळीसाठी मीठपाणी नक्कीच फायदेशीर ठरेल.

कसा कराल उपाय:

  • पाण्याने भरलेल्या टब अथवा बादलीमध्ये दोन मोठे चमचे खडे मीठ टाका
  • पंधरा मिनीटांनी मीठ पाण्याने विरघळेल
  • या पाण्याने नियमित दोन वेळा अंघोळ करा
  • अंघोळीनंतर अंग कोरडे करून अंगावर मॉईस्चराईझर लावा

पुदिन्याचे तेल (Menthol)

पुदिनाच्या पानांपासून काढलेल्या तेलाला मॅथॉंल असं म्हणतात. या तेलामुळे त्वचेला थंडावा आणणारा आणि दाह कमी करणारा परिणाम मिळतो. अंगावरील पुरळ, घामोळे, खाज, जळजळ कमी करण्यासाठी तुम्ही अंगावर पुदिन्याचे तेल लावू शकता. याचे कोणतेही दुष्परिणाम त्वचेवर होत नाहीत. 

कसा कराल उपाय:

ADVERTISEMENT
  • पाण्यामध्ये पुदिन्याचे तेल मिसळा
  • कॉटन पॅडने पुरळ उठलेल्या भागावर हे मिश्रण लावा
  • पुदिन्याची पाने वाटूनदेखील तुम्ही  पुरळावर लावू  शकता
  • पुदिन्याचे  तेल पाण्यात टाकून त्याने अंघोळ केल्याने तुमच्या त्वचेला चांगला आराम मिळेल

मॉईस्चराईझिंग (Moisturizing)

मॉईस्चराईझर हे क्रिम अथवा लोशनबेस असते. ज्यामुळे तुमची त्वचा मऊ आणि हायड्रेट राहण्यास मदत होते. मॉईस्चराईझिंग क्रिममध्ये बऱ्याचदा इसेंशिअल ऑईल वापरण्यात येतात. ज्यामुळे तुमच्या त्वचेचा कोरडेपणा आणि जळजळ कमी होते. 

यासाठीच पुरळ उठल्यावर अंगावर मॉईस्चराईझर लावण्यामुळे तुम्हाला थंडावा मिळतो आणि लवकर बरे वाटते.

कसा कराल उपाय:

  • जास्त तेलाचे घटक असलेले मॉईस्चराईझर निवडा
  • लोशनयुक्त मॉईस्चाईझर लावण्यामुळे तुमच्या त्वचेला थंडावा मिळेल
  • दररोज सकाळी अंघोळीनंतर आणि रात्री  झोपताना त्वचा स्वच्छ केल्यावर त्यावर मॉईस्चराईझर लावा

Home remedies for skin rashes-1

अंगावर पुरळ उठणेबाबत मनात असलेले प्रश्न – FAQ’s

अंगावरील पुरळ त्वरीत कमी करण्याचा जलद मार्ग कोणता?

अंगावर पुरळ उठल्यावर थंड पाण्याने अंघोळ करणे अथवा कोल्डप्रेस उपचार करणे हा सर्वात जलद परिणाम करणारा उपाय आहे. शिवाय त्यासाठी तुम्हाला कोणताही खर्च अथवा त्रास सहन करावा लागत नाही. घरच्या घरी करण्यासारखा आणि त्वरीत आराम देणारा हा उपाय कोणी कधीही करू शकतो. याचप्रमाणे वर दिलेले अंगावर पुरळ उठणे उपाय (angavar pural yene upay) अवश्य ट्राय करा.

ADVERTISEMENT

अंगावर पुरळ उठल्यावर डॉक्टरांचा सल्ला घेणे कधी आवश्यक आहे?

जर वर दिलेले घरगुती उपचार करूनही तुम्हाला आराम मिळत नसेल, अंगावरील पुरळ सतत वाढत असेल, दाह आणि जळजळसोबत अंगावर लालसर चट्टे उठत असतील तर तुम्हाला त्वरीत डॉक्टराचा  सल्ला घेणे गरजेचं आहे. 

अंगावरील पुरळ वॅसलिन लावण्याने कमी होतात का?

वॅसलिन जेलीमुळे तुमची त्वचा मऊ होते आणि त्वचेची खाज कमी होते. त्यामुळे अंगावरील पुरळ कमी करण्यासाठी घरच्या घरी करण्यासारखा एक सोपा उपाय म्हणजे वॅसलिन जेली त्या भागावर लावणे. 

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

19 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT