कृत्रिम आयलॅशेस लावताय, मग आधी जाणून ही माहिती

कृत्रिम आयलॅशेस लावताय, मग आधी जाणून ही माहिती

डोळे जितके सुंदर तितकंच तुमचं सौंदर्य आकर्षक ठरत असतं. कारण सर्वांत आधी नजर जाते ती डोळ्यांवर आणि रोखून धरण्याची ताकद ही या डोळ्यांमध्येच असते. थोडक्यात मेकअपमध्ये आय मेकअप मुख्य भूमिका निभावत असतो. मोठे आणि आकर्षक डोळे आणि घनदाट पापण्या हे अनेकींचं स्वप्न असतं. कारण अशा पापण्या प्रत्येकीला असतातच असं नाही. मात्र कृत्रिम पापण्यांच्या मदतीने तुम्ही तात्पुरता हा लुक नक्कीच मिळवू शकता. सणसमारंभ अथवा एखाद्या कार्यक्रमासाठी तयार होताना अशा कृत्रिम आयलॅशेस अथवा कृत्रिम पापण्या लावण्यात काही गैर नाही. मात्र त्याआधी तुम्हाला त्या कशा लावाव्या आणि या पापण्यांमधून डोळ्यांची काळजी कशी घ्यावी हे माहीत असायला हवं.

Shutterstock

कृत्रिम आयलॅशेस कधी लावाव्या -

फॉल्स, फेक अथवा कृत्रिम आयलॅशेस लावताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. प्रत्येकवेळी तुम्ही घनदाट आयलॅशेसच लावण्याची गरज आहे असं नाही. फक्त जेव्हा तुम्हाला एखाद्या कार्यक्रमासाठी हेव्ही मेकअप करायचा असतो तेव्हा तुम्ही अशा डेंस अथवा घनदाट पापण्या लावू शकता. मात्र ऑफिस अथवा साध्या  कार्यक्रमांना तुम्ही त्या कापून थोड्या छोट्या आणि पातळ करूनही लावू शकता. ज्यामुळे तुमचा लुक नॅचरल वाटेल.

Shutterstock

कृत्रिम आयलॅशेसचे प्रकार -

बाजारात दोन प्रकारच्या आयलॅशेस मिळतात.

  • ग्लू आयलॅशेस
  • मॅग्नेटिक आयलॅशेस

ग्लू आयलॅशेस स्वस्त असतात मात्र लॉंग लास्टिंग नसतात. शिवाय ग्लू चांगला नसेल तर त्या लगेच निघू शकतात शिवाय  या आयलॅशेस एकदा वापरल्यावर टाकून द्याव्या लागतात त्यांचा पुन्हा वापर करता येत नाही. मात्र मॅग्नेटिक आयलॅशेस लावणे सोपे असून  त्या पुन्हा पुन्हा वापरता येतात. या आयलॅशेस थोड्या महाग असून त्यांना चिकटवण्यासाठी ग्लूची  गरज नसते. मॅग्नेटमुळे त्या तुमच्या पापण्यांवर सहज चिकटतात. मात्र या दोन्ही प्रकारच्या खोट्या आयलॅशेस लावताना तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे.

Shutterstock

Beauty

LIT Lip & Eye Sparkles - Crown Jewels

INR 445 AT MyGlamm

कृत्रिम आयलॅशेस कशा लावाव्या -

जर तुम्ही मॅग्नेटिक आयलॅशेस लावणार असाल तर  आयमेकअप सुकल्यावरच त्या लावा. शिवाय त्या लावताना तुमचे हातही कोरडे असावेत. कारण ओलसर हाताने अथवा मेकअर ओला असताना जर तुम्ही मॅग्नेटिक आयलॅशेस लावले तर डोळ्यांना इनफेक्शन होण्याचा धोका वाढतो. शिवाय प्लकर ने त्या पिक करा आणि डोळ्यांच्या पापण्यांच्या वरच्या  दिशेने अथवा खालच्या  दिशेने त्या लावा. पहिल्यांदा वापरताना  त्या व्यवस्थित बसतील असं नाही यासाठी त्या तुम्हाला कोपऱ्यात पिक करून व्यवस्थित बसवाव्या लागतील. या आयलॅशेस स्ट्रेचेबल असतात. त्याचप्रमाणे ग्लू आयलॅशेस लावताना आयलॅशेसवर योग्य पद्धतीने ग्लू लावा ज्यामुळे त्या पटकन पापण्यांवर चिकटतील. 

Shutterstock

फॉल्स आयलॅशेस लावल्यावर आणि काढताना काय काळजी घ्यावी -

ग्लू वाल्या आयलॅशेस ओले कापड अथवा कॉटन लावून तुम्ही काढू शकता. मॅग्नेटिक आयलॅशेस मात्र तुम्ही कोरड्या हाताने सावकाश ओढून काढू शकता. शिवाय लक्षात ठेवा की आयलॅश लावल्यावर चेहरा धुवू नये नाहीतर तुमच्या डोळ्यांना इनफेक्शनचा त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे डोळ्यांच्या समस्या अथवा इनफेक्शन झालेले असताना याचा वापर मुळीच करू नये.  रात्री झोपण्यापूर्वी आयलॅशेस योग्य पद्धतीने काढून मगच झोपा नाहीतर त्याचे दुष्परिणाम तुमच्या डोळ्यांवर होऊ शकतात. 

 

Shutterstock