आयलॅश कर्लर वापरताना कधीच करू नका या चुका

आयलॅश कर्लर वापरताना कधीच करू नका या चुका

आयलॅश कर्लर वापरण्यामुळे मेकअपचा लुकच बदलतो. कारण यामुळे तुमचा आयमेकअप अगदी खास दिसतो. तुमच्या लांब, काळ्याभोर आणि कर्ल केलेल्या पापण्यांमुळे तुमचा चेहरा आकर्षक आणि उठावदार दिसू लागतो. त्यामुळे मेकअप करताना आयलॅश कर्लर हे मेकअप टूल तुमच्याकडे असायलाच हवं. मात्र ते वापरण्यापूर्वी ते कसं वापरावं याचं ज्ञान मिळवा नाहीतर तुमच्या पापण्या सुंदर दिसण्याऐवजी खराब होऊ शकतात. यासाठी आयलॅश कर्लर वापराताना काय काळजी घ्यावी हे जाणून घ्या.

Shutterstock

मस्कारा लावल्यावर आयलॅश कर्लरचा वापर करणे -

तुम्ही पापण्यांना मस्कारा लावल्यावर आयलॅश कर्लरचा वापर करू शकत नाही. कारण असं केल्यामुळे तुमच्या पापण्या कडक होतील आणि कर्लरचा दाब सहन न झाल्यामुळे त्या तुटतील. यासाठी मेकअपला सुरूवात करण्यापूर्वीच तुमच्या पापण्या आयलॅश कर्लरने प्रेस करून ठेवा. यामुळे तुमचे विंग आयलायनर अथवा कन्सिलरही खराब होणार नाही. तुमचा आयमेकअप चांगला होण्यासाठी ही तुमच्या मेकअपची फर्स्ट स्टेप असायला हवी. 

Shutterstock

आयलॅश कर्लर व्यवस्थित पंप न करणे -

तुमच्या पापण्या बराच काळ कर्ली दिसण्यासाठी तुम्ही तुमचे आयलॅश कर्लर कमीत कमी पाच ते आठवेळा योग्य पद्धतीने पंप करायला हवे त्यानंतर दोन सेंकदासाठी ते तसेच तुमच्या पापण्यावर दाबून ठेवायला हवे तेव्हाच तुम्हाला हवा तसा  इफेक्ट मिळू शकेल. योग्य टेकनिकचा वापर केला तरत तुम्हाला वळणदार आणि धनदाट पापण्या मिळू शकतात.

Shutterstock

जास्त जोर लावून आयलॅश कर्लर वापरणे -

खूप जोर लावून अथवा शक्तीचा वापर करून आयलॅश वापण्यामुळे तुम्हाला तुमच्या कर्ली पापण्या मिळणार नाहीत. उलट यामुळे तुमच्या पापण्या तुटून  गळू लागतील. यासाठीच कर्लरवर योग्य प्रमाणातच दाब द्या ज्यामुळे तुमचे काम व्यवस्थित होईल.

Shutterstock

आयलॅश कर्लरला हिट न देणे -

पापण्यांना कर्ल लुक मिळण्यासाठीआयलॅश कर्लर ड्रायरवर गरम करणे आणि मग वापरणे ही एक बेस्ट मेकअप हॅक आहे. कारण यामुळे तुमच्या सरळ असलेल्या पापण्या पटकन वळणदार होऊ शकतात. यासाठी तुमचे आयलॅश कर्लर ड्रायरवर थोडावेळ गरम करा आणि मग त्याने तुमच्या पापण्यांना कर्ल करा. मात्र यासाठी आयलॅश कर्लर ड्रायरपासून कमीत कमी दहा इंच लांब ठेवा नाही ज्यामुळे ते जास्त गरम होणार नाही. कारण जास्त गरम आयलॅश कर्लरचा वापर केल्यामुळे तुमच्या पापण्या जळू शकतात. 

Shutterstock

आयलॅश कर्लर वेळीच स्वच्छ न करणे -

तुमच्याकडे असलेल्या  मेकअप ब्रश आणि इतर ब्युटी टूल्सप्रमाणेच आयलॅश कर्लरही खूप महत्वाचे आहे. त्यामुळे ते वापर झाल्यावर व्यवस्थित स्वच्छ करा. कारण जर ते अस्वच्छ असेल तर तुमच्या डोळ्यांचे आणि पापण्यांचे यामुळे नुकसान होऊ शकते. यासाठीच वापर झाल्यावर रबिंग अल्कोहोल, मेकअप रिमूव्हर आणि कॉटन पॅडने ते स्वच्छ करा. आठवड्यातून एकदा सर्व मेकअप टूल्स स्वत्छ केल्यामुळे तुम्ही सुरक्षित राहाल.

डोळ्यांना आकर्षक करण्यासाठी चांगल्या आयलॅश कर्लरचा वापर करा. 

NYX Professional Makeup Eyelash Curler

INR 925 AT NYX Professional Makeup

तुम्ही आयलॅश कर्लरचा वापर करता का, ते वापरताना तुमच्याकडून या चुका कधी झाल्या आहेत का आणि आम्ही सांगितलेल्या या आय मेकअपच्या सोप्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला जरूर कंमेट बॉक्समध्ये सांगा

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक

अधिक वाचा -

बेस्ट मेकअप ब्रश किट (Best Makeup Brush Kit In Marathi)

सणासुदीला खास दिसायचं असेल तर असा करा 'आय मेकअप' (Festive Eye Makeup In Marathi)

तुमच्या मेकअप किट मध्ये हे ‘5’ मेकअप ब्रश आहेत का

गणेशोत्सवाला दिसा उत्साही, घरीच करा असा झटपट मेकअप