ADVERTISEMENT
home / Make Up Products
प्रोफेशनपद्धतीने असा लावा मस्कारा (How To Apply Mascara In Marathi)

प्रोफेशनपद्धतीने असा लावा मस्कारा (How To Apply Mascara In Marathi)

डोळ्यांचे सौंदर्य खुलवण्यासाठी काजळ, आयलायनर या इतक्याच गोष्टी पुरेशा नाहीत. डोळ्यांचा खरा लुक पूर्ण होतो तो म्हणजे मस्कारा लावल्यानंतरच. तुमच्या पापण्या कितीही पातळ आणि लहान असल्या तरी त्या सुंदर, घनदाट आणि लांब दाखवण्याचे काम ‘मस्कारा’ करते. आपल्या मेकअप किटमध्ये एकतरी मस्कारा असतो. पण मस्कारा लावताना कधी तुमच्याकडून काही चुका झाल्या आहेत का? मस्कारा लावताना तुमच्या डोळ्यांच्या आजुबाजूला चुकून मस्कारा लागला आहे किंवा तुमच्याकडून इतका जास्त मस्कारा लावला गेला आहे की ज्यामुळे तुमच्या पापण्या जड झाल्या आहेत? अशा चुका जर तुम्ही करुन झाला असाल तर आज आपण प्रोफेशनपद्धतीने नेमका कसा मस्कारा लावायचा ते जाणून घेणार आहोत. या शिवाय आम्ही तुमच्यासाठी काही बेस्ट मस्कारा निवडले आहेत जे तुम्ही घेऊ शकता आणि तुमच्या डोळ्यांचे सौंदर्य खुलवू शकता. चला तर आजच्या विषयाला करुया सुरुवात

 

तुम्हाला आहे या गोष्टींची गरज (Things You Will Need To Apply Mascara)

मस्कारा लावण्यातही एक कला आहे ही कला मेकअप आर्टिस्टकडे असते म्हणूनच त्यांनी केलेला मेकअप अधिक खुलून दिसतो. पण हा मेकअप उठून दिसण्यासाठी ते काही खास प्रोडक्टचाही वापर करतात. त्यामुळे तुम्हालाही असा लुक हवा असेल तर तुम्ही या काही गोष्टी घेऊन या.

ADVERTISEMENT

आयलॅश प्राईमर (Eyelash Primer)

आयलॅश प्राईमरची घ्या मदत

Instagram

तुमच्या पापण्यांच्या केसांना मस्कारासाठी तयार करण्याचे काम आयलॅश प्राईमर करते. जसे मेकअप करण्यापूर्वी आपण त्वचेसाठी प्राईमर वापरतो अगदी त्याच पद्धतीने आयलॅश प्राईमर कामी येतात. प्रोफेशन मेकअप आर्टिस्ट अगदी हमखास या वस्तूचा उपयोग पापण्यांना लावण्यासाठी करतात. आयलॅश प्राईमरचा रंग हा पारदर्शक असतो. पापण्यांना एका जागी स्थिर ठेवून त्यांना नरीश करण्याचे काम करतो. याच्या उपयोगामुळे तुमच्या पापण्यांवर जास्तीचा मस्कारा न लागता सगळ्या केसांवर अगदी समान असा मस्कारा लागला जातो. त्यामुळे तुमच्याकडे आयलॅश प्राईमर असायला हवा.

कन्सिलर (Concealer)

डोळ्यांखाली आणि वर लावा कन्सिलर

ADVERTISEMENT

Instagram

डोळ्यांखाली आणि डोळ्यांवर आलेली काळी वर्तुळे जर तुम्ही योग्यपद्धतीने लपवणे गरजेचे असते. कन्सिलरच्या मदतीमुळे तुम्हाला डोळ्यांखालील वर्तुळे अगदी योग्य पद्धतीने लपवता येतात. डोळे स्वच्छ आणि अधिक चांगले दिसू लागतात. त्यानंतर पापण्यांना लावलेला मस्कारा अधिक उठून दिसतो. म्हणून मस्कारा लावण्यासोबतच तुमच्याकडे कन्सिलरअसणेही गरजेचे आहे. तुमच्या स्किनटोनला चांगले दिसेल असे कन्सिलर तुम्ही निवडा.

आयलॅश कर्लर (Eyelash Curler)

आयलॅश कर्लर

Instagram

ADVERTISEMENT

पापण्यांना मोठ्या दाखवण्याचे काम आयलॅश कर्लर अगदी योग्य पद्धतीने करते. आयलॅश कर्लरचा वापर केल्यामुळे तुमच्या प्रत्येक पापण्यांना वेगळे करुन त्यांना गोलाकार देण्याचे काम करते यामुळे तुमच्या आयलॅश मोठ्या आणि आकर्षक दिसू लागतात. याच्या वापरामुळे मस्कारा लावल्यानंतर तुमच्या पापण्या अधिक दाट आणि मोठ्या दिसू लागतात. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयलॅश अगदी कोणत्याही त्रासाशिवाय मोठ्या आणि सुंदर दिसायला हव्या असतील तर तुमच्याकडे आयलॅश कर्लर असायला हवे.  आयलॅश कर्लर हे बाजारात अगदी सहज आणि बजेटमध्ये मिळते. 

मस्कारा वाँड (Mascara Wand)

मस्कारा वाँड

Instagram

मस्कारा लावण्यासाठी असलेल्या ब्रशला मस्कारा वाँड असे म्हणतात. याच्या माध्यमातून मस्कारा लावणे सोपे असते. आता तुम्ही म्हणाल की, मस्कारामध्ये मस्काराब्रश असताना हा वाँड कशाला? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. पण मस्कारा वाँडच्या मदतीने तुम्हाला पापण्यांना लागलेला जास्तीचा मस्कारा व्यवस्थितपणे पसरवण्यास मदत मिळते. त्यामुळे तुमच्याकडे एकतरी मस्कारा वाँड असायला हवा.  मस्कारा वाँड ही फार स्वस्त असतात त्यामुळे तुम्हाला फार काही पैसे खर्च करण्याची गरज नाही. 

ADVERTISEMENT

मस्कारा (Mascara)

मस्कारा

Instagram

सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे चांगल्या क्वालिटीचा मस्कारा हवा. मस्कारा चांगला असेल तर तुमच्या पापण्यांना तो योग्य पद्धतीने लागतो. हल्ली अनेक वेगळ्या प्रकारचे मस्कारा मिळतात. ज्यांची निवड तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे करु शकता. हल्ली वॉटरप्रुफ, स्मजप्रुफ आणि घनदाट पापण्या दाखवणारे मस्कारा मिळतात. तुम्ही बजेट आणि फायदे पाहून त्यांची निवड करा. 

ADVERTISEMENT

मस्कारा लावण्याची योग्य पद्धत (How To Apply Mascara In Marathi)

असा लावा मस्कारा

Instagram

मस्कारा लावण्यासाठी तुम्हाला काय साहित्य हवे ते कळले असेल तर आता आपण मस्कारा कसा लावायचा ते पाहुया. 

Step 1: सगळ्यात आधी तुमचा चेहरा स्वच्छ करुन तुमच्या चेहऱ्याचा बेस करुन घ्या. आयलॅश प्राईमरचा उपयोग करुन तुमचे आयलॅश प्रेप करुन घ्या. असे केल्यामुळे तुमच्या पापण्या पुढच्या स्टेप्ससाठी तयार होतील. 

ADVERTISEMENT

Step 2: पापण्यांना प्राईमर लावल्यानंतर आता तुम्हाला तुमच्या डोळ्यांचे  सौंदर्य खुलवण्यासाठी तुम्ही डोळ्यांच्या वर आणि खाली कन्सिलर लावा. कन्सिलर तुमच्या पापण्यांना लागले तरी हकरत नाही. पण तुम्ही ते योग्य पद्धतीने ब्लेंड करायला विसरु नका. 

Step 3: आयलॅश कर्लरचा उपयोग करुन तुम्ही पापण्यांना गोलाकार वळवून घ्या. त्यांना वरच्या दिशेला आणि गोलाकार फिरवून तुम्ही त्यांना सेट करा. 

Step 4: आता वेळ आहे  मस्कारा लावण्याची मस्कारा उघडून वाँडवर मस्कारा घेऊन  पापण्यांवर फिरवा. मस्कारा नेहमी वरच्या दिशेने लावा. डोळे बंद करुन वरच्या बाजूनेही मस्कारा फिरवा. त्यामुळे त्याचा आकार अधिक चांगला येतो.

Step 5: डोळ्यांच्या खाल मस्कारा लावताना खूप घेऊ नका. कारण अनेकदा खालच्या पापण्यांना मस्कारा लावतानाच तो आजुबाजूला लावला जातो.

ADVERTISEMENT

मस्कारा चुकून आजुबाजूला लागला गेला असेल तर तुम्ही एक इयर बडवर मेकअप क्लिनझर घेऊन ते काढून टाकण्याचा अगदी सावकाशीने प्रयत्न करा. 

हे मस्कारा तुम्हाला देतील घनदाट पापण्या (Best Mascara In India In Marathi)

चांगल्या मस्काराच्या शोधात असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी खास आणि चांगले मस्कारा निवडले आहेत. तुमच्या मेकअप किटमध्ये तुम्ही याचा समावेश करु शकता.

Bobbi Brown Smokey Eye Mascara

तुम्ही उत्तम मस्कारा शोधत असाल तर बॉबी ब्राऊन कंपनीचा हा मस्कारा तुमच्यासाठी फारच उत्तम आहे. या मस्काराचे पॅकिंग जितके आकर्षक आहे तितके त्याचे फायदेही आहेत. हा मस्कारा तुमच्या पापण्यांवर छान पसरतो. याचा मस्कारा वाँड जाड असला तरी तुमच्या सगळया पापण्यांना न्याय देण्यास उत्तम आहे

ADVERTISEMENT

फायदे (Pros): तुमच्या डोळ्यांचे सौंदर्य खुलवणाऱ्या पापण्यांवर अगदी योग्य पद्धतीने हा  मस्कारा लागतो. याचा मस्कारा वाँड तुमच्या पापण्यांना छान दिसतो.

तोटे (Cons): बेस्ट प्रोडक्ट असले तरी याची किंमत खूप आहे.

L’Oreal Paris Voluminous Lash Paradise Mascara

भारतीयांचा सगळ्यात आवडीचा ब्रँड म्हणून याची ओळख असलेला या ब्रँडचा मस्काराही तुम्हाला हव्या असलेल्या लांब आणि घनदाट पापण्या देण्यासाठी एकदम परफेक्ट आहे. याचा ब्रश यामध्ये फार महत्वाचे काम करतो.

फायदे (Pros):  पापण्या सुंदर दिसण्यासाठी हा क्रिमी फॉर्म्युला एकदम बेस्ट आहे यामुळे तुमच्या पापण्या छान उठून दिसतात. मुळात तुमच्या पापण्या कितीही लहान असल्या तरी त्यांनी मोठ्या आणि घनदाट दाखवण्याचे काम करतात. 

ADVERTISEMENT

तोटे (Cons):  याे फार असे तोटे नाहीत.

Givenchy Phenomen Eyes Mascara

मेकअप उत्पादनामध्ये आणखी एक उत्तम आणि चांगला ब्रँड म्हणून याची ओळख आहे. पण याचा मस्कारा अधिकच चर्चेचा विषय आहे तो फक्त त्याच्या मस्कारा वाँडमुळे. याचा वाँड इतर वाँडच्या तुलनेत फारच वेगळा आहे . हा गोलाकार आणि लहान आहे त्यामुळे आजुबाजूला पसरत नाही. डोळ्यांचा आकार कोणताही असला तरी लावता येतो

फायदे (Pros):  हा मस्कारा मोठ्या आणि घनदाट पापण्यांसाठी योग्य आहे.

तोटे (Cons): याचा ब्रश हा अनेकांसाठी प्लस पाँईट असला तरी अनेकांना हा ब्रश आवडत नाही.

ADVERTISEMENT

Smashbox Super Fan Mascara

मेकअपमधील आणखी एक चांगला ब्रँड म्हणून ओळख असलेला या कंपनीचा मस्काराही अनेकांच्या आवडीचा आहे. हा मस्कारा कोणत्याही केमिकल्सपासू बनलेला नाही. त्यामुळे याचे कोणतेही नुकसान नाही. हा मस्कारा तुम्हाला घनदाट आणि लांब पापण्या देण्यासाठी एकदम योग्य आहे. 

फायदे (Pros): लांब घनदाट पापण्यांसाठी अत्यंत योग्य असा हा मस्कारा आहे. 

तोटे (Cons): याचे फारसे असे तोटे नाही

Myglamm Twist It Mascara

माय ग्लॅम उत्पादित हा मस्कारा नवा असून याच्या वाँडचा आकार याची खासियत आहे. हा थोडासा वाकडा असल्यामुळे तो पापण्यांना अगदी योग्य पद्धतीने लावता येतो. लांब आणि घनदाट पापण्या देण्यासाठी हा मस्कारा मस्त आहे.

ADVERTISEMENT

फायदे (Pros): हा मस्कारा वाँड वेगळा असल्यामुळे तो चांगला काम करतो. 

तोटे (Cons):  या मस्काऱ्याचे किमान दोन कोटही तुम्हाला लावावे लागतात. त्यानंतर त्याचा बेस्ट रिझल्ट मिळतो.

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)

1. अगदी नवख्या व्यक्तिने मस्कारा लावताना काय काळजी घ्यावी ?
मस्कारा अगदी पहिल्यांदाच लावत असाल तर तुम्ही अगदी कमीत कमी मस्कारा घेऊन तुमच्या पापण्यांना लावायला सुरुवात करा. डोळ्याच्या वरच्या भागाला जर तुम्ही मस्कारा लावत असाल तर बाहेरच्या बाजूने सुरुवात करा. अलगद आतल्या बाजूला मस्कारा लावत या असे करताना त्यातील वाँड/ ब्रश तुम्ही वरच्या बाजूला  फिरवा. खाली मस्कारा लावताना मस्कारा वाँड खालच्या दिशेने फिरवा. जर चुकून मस्कारा डोळ्यांना लागला तर तुम्ही इअर बडचा उपयोग करुन तुम्ही ते काढू शकता. 

ADVERTISEMENT

2. पापण्यांवर कोणतेही पिग्मेंट न अडकू देता मस्कारा कसे लावावे? 
खूप जण मस्कारा जास्त लावल्यानंतर पापण्या अधिक सुंदर दिसतील असे समजून पापण्यांना खूप मस्कारा लावतात. त्यामुळेच पापण्यांवर मस्काराचा थर साचतो. जो अतिशय वाईट दिसतो. तुम्हला असे होऊ द्यायचे नसेल तर तुम्ही डोळ्यांना अगदी कमीत कमी मस्कारा लावा. जर तुमच्या पापण्यांना जास्तीचा मस्कारा चुकून लागला असेल तर तुम्ही एखाद्या जुन्या स्वच्छ वाँडचा उपयोग करुन अधिकचा मस्कारा काढू शकता. पण हे तुम्हाला मस्कारा सुकण्याआधी करावे लागेल. 

3. व्हॅसलिनमुळे पापण्या दाट दिसण्यास कशी मदत मिळते? 
व्हॅसलिन तुमच्या पापण्यांना नरीश करुन त्यांना अधिक दाट दाखवण्याचे काम करते. मेकअप करताना तुम्ही व्हॅसलिनचा उपयोग करु शकत नाही. कारण त्यामुळे तुमचा चेहरा तेलकट होईल. पण तुम्ही अगदी थोडेसे इयर बडवर घेऊन तुम्ही पापण्यांवर फिरवा. त्यानंतर आयलॅश कर्लरचा उपयोग करुन पापण्यांना आकार द्या आणि मग त्यावर मस्कारा लावा. 

आता या पद्धतीचा उपयोग करुन तुम्ही अगदी प्रोफेशनलपद्धतीने मस्कारा लावू शकता. 

24 Sep 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT