लग्न समारंभ, एखादी पार्टी किंवा बॅकलेस कपडे घालण्याची ज्यावेळी वेळ येते. अशावेळी आपली पाठ चांगली दिसते की नाही असा प्रश्न अनेकांना असतो. कारण सगळ्यांची पाठ नितळ, आकर्षक असतेच असे नाही ( ती असली तरी देखील एखाद्या सेलिब्सला पाहिल्यानंतर आपल्याला आपली पाठ तशी नितळ वाटत नाही) तुम्हालाही अशी भीती वाटत असेल पण तरीही बॅकलेस ड्रेसची हौस भागवून घ्यायची असेल तर तुम्ही मेकअपचा उपयोग करुन तुमची पाठ सुंदर करु शकता. आता हा पाठीचा मेकअप करण्यासाठी तुम्हाला नेमकं काय हवं आणि त्याची सुरुवात कशी करावी ते आज जाणून घेऊया.
बॅकलेस ब्लाऊज घालायचा असेल तर त्यापूर्वी घ्या अशी त्वचेची काळजी
असा करा पाठीचा मेकअप
पाठीचा मेकअप करणे सोपे असले तरी ते आपले आपल्याला करता येत नाही. त्यासाठी तुम्हाला दुसऱ्याची मदत घ्यावी लागते. त्यामुळे तुम्ही ज्याच्याकडून हा मेकअप करुन घेणार आहात त्याला मेकअपची किमान माहिती असणे आवश्यक आहे. आता पाठीचा हा मेकअप कसा करायचा ते जाणून घेऊया.
- कन्सिलरचा उपयोग हा चेहऱ्यावरील खड्डे, काळे डाग, काळी वर्तुळं लपवण्यासाठी केला जातो. त्याचा उपयोग तुम्ही पाठीसाठीही करु शकता. पाठीवर असलेल्या डागांवर अगदी हलक्या हाताने आणि कमीत कमी कन्सिलर लावा. हे कन्सिलर पसरण्यासाठी हाताने थोडे डॅब करा. त्यानंतर कन्सिलर टिकून राहावे यासाठी त्यावर ट्रान्सल्युशंट पावडरचा प्रयोग करा. तुमच्या पाठीवरील पिंपल्स अथवा त्याचे डाग लपवण्यात त्यामुळे मदत मिळेल. तुमची पाठ एकसारखी आणि चांगली दिसेल. तुम्ही साडी नेसली असेल आणि त्या ब्लाऊजचा गळा मोठा असेल अशावेळी ही सोपी ट्रिक तुम्ही वापरु शकता.
- फाऊंडेशनचा उपयोग करुनही तुम्हाला त्वचा एकसारखी करता येऊ शकते. तुमच्याकडे असलेले तुमच्या स्किनटोनचे फाऊंडेशन अगदी कमीत कमी घेऊन तुम्ही संपूर्ण पाठीला लावा (किंवा जेवढा बॅकलेस ड्रेस आहे त्याच जागी मेकअप करा) फाऊंडेशन लावल्यानंतर घाम येऊ नये म्हणून ट्रान्सलुशंट पावडर लावा.
- तुम्हाला खूप घाम येत असेल तर पाठीला मेकअप करण्याआधी तेलकट मॉश्चरायझर लावू नका. त्या ऐवजी तुम्ही प्राईमरचा उपयोग करा. त्यामुळे तुमचा मेकअप अधिक काळ टिकून राहील.
- जर तुम्ही एखाद्या पार्टीसाठी बॅकलेस ड्रेस घालत असाल तर तुमची पाठ थोडी शाईनी दिसली तर अधिक चांगली दिसते. आता शाईन असलेले फाऊंडेशनही मिळते. तुम्ही त्याचा प्रयोगही करु शकता. त्यामुळे तुमची पाठ उठून दिसेल.
- आता जर तुमच्याकडे अशा पद्धतीचे फाऊंडेशन नसेल तर तुम्ही तुमच्या पाठीसाठी हायलायटरचा उपयोग करु शकता. लिक्वीड हायलायटरची निवड ही यासाठी सगळ्यात उत्तम आहे. कारण ती एखाद्या क्रिमप्रमाणे तुमच्या त्वचेला चिकटून राहते. त्यामुळे तुमचे कपडे खराब होत नाही.
- जर तुम्ही निवडलेले कपडे खूप फिक्कट रंगाचे असतील तर असे मेकअप करण्याआधी त्या कपड्यांच्या कडांना थोडी बेबी पावडर लावा. म्हणजे मेकअप ओला असताना तुम्ही मेकअप केला तरी तो पटकन ड्रेसला लागणार नाही.
या काही गोष्टी करुन तुम्ही तुमच्या पाठीचा मेकअप करु शकता. पण कार्यक्रम झाल्यानंतर पाठीचा मेकअप काढायला मुळीच विसरु नका. आणि त्यानंतर पाठीची त्वचा चांगली राहण्यासाठी मॉश्चरायझर लावायलाही विसरु नका.
शिवाय तुम्ही या काही प्रोडक्टसची निवड करुनही तुमच्या पाठीचे सौंदर्य खुलवू शकता.
वेडिंग सीझनमध्ये बॅकलेस ब्लाऊज किंवा चोळी घालण्याआधी घ्या ही काळजी