बॅकलेस ब्लाऊज घालायचा असेल तर त्यापूर्वी घ्या अशी त्वचेची काळजी

बॅकलेस ब्लाऊज घालायचा असेल तर त्यापूर्वी घ्या अशी त्वचेची काळजी

लग्न म्हटलं की साडी आणि ब्लाऊज हे तर आलंच. पण हल्ली लग्नात बॅकलेस ब्लाऊजची जास्त फॅशन आली आहे. पण बऱ्याच जणींना बॅकलेस ब्लाऊज अथवा डीप बॅक ब्लाऊज घालायचा म्हटलं की, आपली पाठ त्यामध्ये चांगली दिसेल की नाही अथवा काही डाग तर दिसणार नाहीत ना असा प्रश्न पडतो. त्यामुळे बॅकलेस ब्लाऊज अथवा डीप बॅक ब्लाऊज घालायचा म्हटलं की त्याआधी त्वचेची व्यवस्थित काळजी घ्यायला हवी. केवळ पॉलिशिंग करूनच भागणार नाही तर बॅकलेस ब्लाऊज घातला म्हणजे त्याचं फोटोशूट करणं तर आलंच. त्याशिवाय कोणताही कार्यक्रम पूर्ण होणार नाही. ज्याप्रमाणे आपण चेहऱ्याची काळजी घेतो त्याचप्रमाणे  आपल्याला पाठीची त्वचाही सुंदर दिसावी यासाठी काही टिप्स जाणून घेणं गरजेचं आहे. केवळ ब्लाऊज घातला म्हणजे पाठ सुंदर दिसते असं नाही तर त्यासाठी आपण आधी काय काळजी घ्यायची आहे जाणून घेऊया. 

डेड स्किनपासून करा सुटका

Shutterstock

बॅकलेस ब्लाऊज घालायचा असेल तर पाठीची त्वचाही तितकीच चमकदार आणि  आकर्षक दिसायला हवी.  त्यासाठी तुमच्या पाठीची त्वचा जर डेड स्किनप्रमाणे दिसत असेल तर त्यासाठी तुम्ही आठवड्यातून किमान ते दोन ते तीन वेळा आपल्या त्वचेचा टोन लक्षात घेऊन व्यवस्थित स्क्रब करा. स्क्रब करा याचा अर्थ पाठ खसाखसा घासू नका.  तर त्याची व्यवस्थित काळजी घेऊन स्क्रबिंग करा जेणेकरून डेड स्किन निघून जाईल आणि पाठीला चमक येईल. पाठीला येणारी खाज यामुळे निघून जाण्यास मदत होईल. 

साडीबरोबर घाला हे 7 Sexy ब्लाऊज

अति गरम पाण्याच वापर करू नका

Shutterstock

काही जणांना आंघोळ करताना अति गरम पाणी वापरण्याची सवय असते. तुम्हाला जर त्वचा आकर्षक आणि चमकदार हवी असेल तर तुम्ही नेहमी कोमट पाण्यानेच आंघोळ करा. अति गरम पाणी हे त्वचा कोरडी बनवतं आणि त्यातील नैसर्गिक चमक घालवण्यास कारणीभूत ठरतं. इतकंच नाही तर शरीरातून तेल येऊन खाज वाढते. त्यामुळे कोमट पाण्याने पाठ साफ करा आणि आंघोळही कोमट पाण्यानेच करा. 

ट्रेंडी ब्लाऊज वापरून साडीला द्या क्लासी लुक

साबणापेक्षा वापरा बॉडीवॉश

Shutterstock

साबण त्वचेला अधिक कोरडेपणा देतो आणि  खरखरीत बनवतो. खरीखरीत पाठ दिसायलाही चांगली दिसत नाही. तसंच यामुळे तुमच्या पाठीवर पुळ्या येण्याचीही शक्यता असते.  त्यामुळे तुम्ही बॅकलेस ब्लाऊज घालायचा असेल तर त्यासाठी साबण बदलून बॉडीवॉशचा वापर करा. ज्यामध्ये नैसर्गिक घटकांचा समावेश आहे असाच बॉडीवॉश वापरा. शक्यतो घरगुती उटण्याचा वापर करा. जेणेकरून तुमची पाठ नैसर्गिक घटकांनी अधिक मऊ मुलायम राहील आणि दिसायलाही आकर्षक दिसेल. 

त्वचेनुसार निवडा तुमचा साबण, घ्या त्वचेची काळजी

चादर नेहमी बदला

तुम्ही स्वतःला जसं स्वच्छ ठेवता त्याचप्रमाणे तुम्ही रोज ज्या  बेडवर झोपता तिथे तुम्ही पाठीवर झोपता. अशावेळी नियमित चादर बदलणं आणि स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे. तसंच चादरीवर बॅक्टेरिया असतो त्यामुळे तुम्हाला खाज  आणि रॅशेसचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही जितकी स्वच्छता पाळता येईल तितकी पाळण्याचा प्रयत्न करा. 

पावसाळ्यातील त्वचेच्या समस्या, अलर्जी आणि त्याची काळजी

त्वचा नेहमी करा हायड्रेट

त्वचा ही नेहमी हायड्रेट करणं गरजेचं आहे.  आपण सहसा चेहऱ्याची काळजी घेत असतो. पण तुम्हाला बॅकलेस अथवा डीप नेक ब्लाऊज घालायचे असतील तर पाठीच्या त्वचेच्या हायड्रेशनची पण काळजी घेतली पाहिजे. कारण जेव्हा बॅकलेस घालायची वेळ येते तेव्हा हायड्रेशन अत्यंत गरजेचे असते. तुम्ही जेव्हा त्वचा ताजीतवानी ठेवाल तेव्हाच घातलेला बॅकलेस ब्लाऊज अधिक चांगला उठावदार दिसेल. त्वचेला चमक असेल तर ब्लाऊजही सुंदर दिसेल.