ADVERTISEMENT
home / Recipes
आदल्या दिवशीचा पिझ्झा पुन्हा तसाच क्रिस्पी करण्याची सोपी ट्रिक

आदल्या दिवशीचा पिझ्झा पुन्हा तसाच क्रिस्पी करण्याची सोपी ट्रिक

घरी पिझ्झा आणल्यावर किंवा केल्यावर तो प्रत्येकवेळी सगळाच संपतो असे होत नाही. कधी कधी पिझ्झा खाल्ल्यानंतर पोट इतकं भरतं की, काही स्लाईसेस तशाच राहून जातात. पिझ्झावर असलेले चीझ, आवडते टॉपिंग्ज असताना पिझ्झा स्लाईस फेकून द्यायची इच्छा होत नाही. अशावेळी या स्लाईस उद्या खाऊ या हिशोबाने आपण ती फ्रिजमध्ये ठेवून देतो. दुसऱ्या दिवशी हा पिझ्झा पुन्हा खायचा विचार करतो त्यावेळी तो मायक्रोव्हेव करणे किंवा तव्यावर गरम करणे याशिवाय काहीच पर्याय नसतो. पण असं करताना पिझ्झा म्हणावा तसा फ्रेश वाटत नाही. जर तुम्हाला आदल्या दिवशी होता तसाच क्रिस्पी आणि मॉईस्ट पिझ्झा हवा असेल तर त्यासाठी आम्ही तुम्हाला काही खास ट्रिक सांगणार आहोत. चला मग जाणून घेऊया ही सोपी ट्रिक

चिंच-गुळाची अशी चटणी कराल तर स्वयंपाकात असा होईल तिचा वापर

मायक्रोव्हेव ट्रिक

मायक्रोव्हेव ट्रिक

Instagram

ADVERTISEMENT

जर तुमच्या घरी मायक्रोव्हेव असेल तर तुमच्यासाठी ही ट्रिक फार सोपी आणि महत्वाची आहे. 

  • पिझ्झा स्लाईस बॉक्समधून काढून एका प्लेटमध्ये काढून घ्या. ही प्लेट मायक्रोव्हेव प्रुफ असू द्या. 
  • त्या प्लेटमध्ये मायक्रोव्हेवला चालू शकेल अशी एक छोटी वाटी घेऊन त्यामध्ये पाणी घ्या. 
  • आता पिझ्झा मायक्रोव्हेवमध्ये 30 ते 60 सेंकदासाठी ठेवा. पिझ्झा छान गरम आणि मॉईस्ट, फ्रेश होईल. 
  • शिळा पिझ्झा नुसता मायक्रोव्हेव केला की, तो काही काळासाठी नरम वाटतो. पण नंतर तो पुन्हा कडक आणि त्याची चव म्हणावी तितकी चांगली लागत नाही. मायक्रोवेव्हमध्ये पिझ्झा गरम करण्याची ही ट्रिक चांगलीच कामी येते. 

बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरमध्ये काय आहे फरक

तवा ट्रिक

तव्यावर पिझ्झा गरम करताना

Instagram

ADVERTISEMENT

ज्यांच्याकडे मायक्रोव्हेव नाही ते तव्यावर पिझ्झा गरम करतात. पण तव्यावर पिझ्झा गरम केल्यानंतर तो अगदी फ्रेश तसाच होतो असे नाही. त्यामुळे तुम्ही काय ट्रिक करायला हवी ते जाणून घेऊया. 

  •  पिझ्झा गरम करण्यासाठी फ्लॅट पॅनपेक्षा तुम्ही झाकण लावता येईल अशा पॅनची निवड करा. 
  • तवा गरम झाल्यानंतर पिझ्झा स्लाईस ठेवून तव्याच्या अगदी कोपऱ्यात थोडेसे पाणी टाका. पाणी चरचरण्याइतका तवा गरम हवा. 
  • झाकण बंद करुन गॅस मंद करुन पिझ्झा छान गरम होऊ द्या. पिझ्झाचे टॉपिंग्ज आणि पिझ्झाचा क्रिस्प अगदी आदल्या दिवशीसारखाच लागेल. 
  • पिझ्झासोबत पाणी ठेवल्यामुळे पाण्याचा मॉश्चर पिझ्झा बेस घेते आणि त्याला पुन्हा अगदी तसाच ताजा आणि छान बनवते. 

आता घरी कधी पिझ्झा पार्टी झाली  आणि पिझ्झा शिल्लक राहिला तर ही ट्रिक नक्की करुन पाहा तुम्हाला ताजा पिझ्झा खाल्ल्याचा नक्कीच फिल येईल. तुम्ही ही ट्रिक केल्यानंतर आम्हाला नक्की कळवा.

अप्रतिम चवीच्या स्मूदी बनवा घरच्या घरी, स्मूदी रेसिपीज (Smoothie Recipe In Marathi)

08 Sep 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT