या पाच ठिकाणी लवकर दिसू लागतात एजिंगच्या खुणा, अशी घ्या काळजी

या पाच ठिकाणी लवकर दिसू लागतात एजिंगच्या खुणा, अशी घ्या काळजी

प्रत्येकाला आपण कायम चिरतरूण दिसावं असं वाटत असतं. मात्र वाढणारं वय तुमच्या शरीरावर एजिंगच्या खुणा आपोआप निर्माण करू लागतं. एजिंगची लक्षणं कमी करण्यासाठी ती दिसू लागण्याआधीच प्रयत्न करणं गरजेचं आहे. फाईन लाईन्स, सुरकुत्या, डार्क सर्कल्स यांचा समावेश एजिंगच्या खुणांमध्ये होता. याचं कारण तुमच्या त्वचेमधील कोलेजीनची निर्मिती कमी होणं हे असू शकतं. ज्यामुळे त्वचा सैल पडते आणि सुरकुतलेली दिसू लागते. जीवनशैलीत बदल, काही नैसर्गिक उपाय, योग्य अॅंटि एजिंग प्रॉडक्टचा वापर करून तुम्ही एजिंगचे मार्क्स कमी करू शकता. मात्र त्यासाठी शरीरावर सर्वात आधी या एजिंगच्या खुणा कुठे दिसू लागतात हे माहीत असायला हवं. यासाठीच आम्ही तुम्हाला शरीरावरील अशी पाच ठिकाणं सांगत आहोत जिथे तुम्हाला सर्वात आधी म्हातारपणाच्या खुणा दिसू शकतात. 

कपाळ -

सर्वात आधी तुमच्या कपाळावर सुरकुत्या पडण्यास सुरूवात होते. यासाठी योग्य वयात अॅंटि एजिंग प्रॉडक्टचा वापर सुरू करा आणि चेहऱ्याची योग्य निगा राखा. पुरेशी झोप आणि व्यायामानेही तुम्हाला एजिंगची प्रोसेस रोखून धरता येऊ शकते. चेहऱ्यावरील एजिंग मार्क्स कमी करण्यासाठी आजकाल अनेक आधुनिक उपाययोजना उपलब्ध आहेत. 

यासाठी अधिक वाचा -

कपाळावर दिसणाऱ्या एजिंगच्या खुणा कमी करण्यासाठी सोप्या टिप्स

Shutterstock

डोळ्यांच्या पापण्या -

डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे निर्माण होणं, त्वचा पिंगमेंटेड होणं, फाईन लाईन्स दिसणं ही चेहऱ्यावर एजिंगच्या खुणा दिसू लागण्याची सुरूवात आहे. पण या खुणा सर्वात  आधी दिसू लागतात ते तुमच्या पापण्यांवर. जस जसं तुमचं वय वाढू लागतं तस तसं तुमच्या पापण्या ताणल्या जाऊ लागतात. पापण्यांवरील स्नायू कमजोर झाल्यामुळे तिथली त्वचा सुरकुतलेली आणि सैल होते. पफी आईज हाही याचाच एक परिणाम असतो. कारण वयामुळे तुमच्या डोळ्यांच्या त्वचेजवळ कोरडेपणा वाढू लागतो. यासाठीच वेळीच आयमास्क, आयक्रीम, नाईट क्रीमचा वापर सुरू करा.

Shutterstock

मान -

मानेजवळील त्वचा ही चेहऱ्याच्या त्वचेच्या तुलनेत खूपच नाजूक असते. ज्यामुळे तुमच्या मानेवर सर्वात आधी सुरकुत्या दिसण्यास सुरूवात होते. हळू हळू मानेकडील भागावर त्वचा अक्षरशः लटकत आहे असं दिसण्यास सुरूवात होते. यासाठी चेहऱ्यासोबतच  मानेच्या त्वचेचेही योग्य काळजी घ्या.

चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी करा हे ‘5’ घरगुती उपाय (Anti-Aging Home Remedies In Marathi)

Beauty

Spotlight Multitasking Strobing Liquid

INR 1,195 AT MyGlamm

ओठ -

ओठांच्या बाजूला फाईन लाईन्स येणं हे नैसर्गिक आहे.  कारण जसं जसं तुमचं वय वाढतं तस तसं तुमच्या त्वचेतील कोलेजीन निर्माण होणंही कमी होतं. अशा वेळी सर्वात नाजूक भागावरची त्वचा सैल पडण्यास सुरूवात होते. वयानुसार त्वचेतील नैससर्गिक तेल कमी झाल्यामुळे त्वचा कोरडी  आणि सुककुतलेली दिसू लागते. म्हणूनच ओठ आणि ओठांच्या आजूबाजूच्या त्वचेची योग्य काळजी घ्या.

Shutterstock

हात -

चेहऱ्याप्रमाणेच तुमच्या हातावरही म्हातारपण पटकन दिसू लागतं. हात सतत धुणं, अती सुर्यप्रकाश, त्वचेच निगा न राखणं यामुळे तुमच्या हातावरची त्वचा सैल पडू शकते. यासाठीच रात्री झोपण्यापूर्वी हात स्वच्छ धुतल्यावर त्यांना मॉईश्चराईझ करायला विसरू नका. शिवाय घराबाहेर पडण्यापूर्वी कमीत कमी अर्धा तास हात, मान आणि चेहऱ्यावर सनस्क्रीन लावा. तुमच्या हाताची तुम्ही जितकी काळजी घ्याल तितके ते जास्त मऊ, मुलायम  राहतील. 

Make Up

POSE HD BANANA POWDER - YELLOW

INR 699 AT MyGlamm