ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
मिल्क पावडरने मिळवा नितळ त्वचा (Milk Powder For Face In Marathi)

मिल्क पावडरने मिळवा नितळ त्वचा (Milk Powder For Face In Marathi)

नितळ त्वचा मिळवण्याचे स्वप्न आपल्या सगळ्यांचेच असते. कोणत्याही वयात त्वचा सुंदर दिसावी असे कोणाला वाटणार नाही. अनेकांना केमिकल्सचा उपयोग करुन त्वचेची काळजी घ्यायला मुळीच आवडत नाही. त्यांना किचनमध्ये उपलब्ध असलेल्या वस्तूंपासूनच ‘स्किनकेअर रुटीन’ फॉलो करायला आवडते. किचनमध्ये असलेले हळद, बेसन, तांदूळ पीठ, मीठ, दालचिनी, साखर, केशर, मध,दूध, दही अशा कैक वस्तूंचा उपयोग आपण त्वचेसाठी करत असतो. पण तुम्ही त्वचेसाठी कधी मिल्क पावडरचा उपयोग केला आहे का? दूधापासून तयार केली जाणारी ही मिल्क पावडर त्वचेसाठी एक उत्तम मास्क आहे. याविषयी तुम्हाला कोणतीही माहिती नसेल तर आज आपण अगदी विस्तृतपणे याची माहिती घेत मिल्क पावडरने बनवले जाणारे वेगवेगळे मास्क आणि त्याचे फायदे जाणून घेऊया. चला करुया सुरुवात

मिल्क पावडर म्हणजे काय? (What Is Milk Powder)

मिल्क पावडर

Instagram

अनेक घरांमध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी मिल्क पावडर वापरली जाते.ही मिल्क पावडर म्हणजे दूधापासून तयार करण्यात आलेली बुक्की (पावडर). आपण रोज पित असलेल्या दूध टिकण्याची एक क्षमता असते. काही कालावधीनंतर ते खराब होते. म्हणूनच अनेक दूध उत्पादन कंपन्या हे दूध साठवून ठेवण्यासाठी दूधातील पाणी काढून टाकतात. या प्रक्रियेला ‘evaporation’ असे म्हणतात. तयार झालेली पावडर ही ‘व्हाईटनर’ म्हणून ओळखली जाते. घरी दूध नसेल अशावेळी या पावडरच्या दूधात पाणी घालून तुम्ही आवश्यकतेनुसार दूध तयार करु शकता. दूध टिकवण्याची ही प्रक्रिया दूध वाया जाऊ नये म्हणून करण्यात येत असली तर आता अनेक रेसिपीज या दूधाचा वापर न करता मिल्क पावडरपासून तयार केल्या जातात.

ADVERTISEMENT

मिल्क पावडर आणि दूध काय आहे यातला फरक (Milk Powder Vs Milk)

मिल्क आणि मिल्क पावडरमध्ये आहे फरक

Instagram

मिल्क पावडर कशी बनते हे जाणून घेतल्यानंतर मिल्क पावडर आणि दूध यातला पहिला फरक आहे तो म्हणजे एक पावडर स्वरुपात आहे तर दुसरे लिक्वीड रुपात. याशिवाय यामधली पोषण मूल्य हे देखील वेगळे असतात.

ADVERTISEMENT
पोषण मूल्ये,प्रत्येकी 100 ग्रॅम (Nutritional value, per 100 grams)मिल्क पावडर (Mik Powder)दूध (Milk)
Calories49642
Total Fat27 g (41%)1g (1%)
Cholesterol97 mg (32%)5 mg (1%)
Sodium371 mg(15%)44mg (1%)
Potassium1330 mg (38%)150 mg (4%)
Total Carbohydrate389 (12%)5 g (1%)
Protein26 g (53%)3.4g (6%)
Vitamin A18%0%
Calcium91%12 %
Vitamin D5%0%
Cobalamin55%8%
Vitamin C14%0%
Iron14%0%
Vitamin B-615%0%
Magnesium21%2%

प्रत्येक ब्रँडनुसार आणि बनवण्याच्या पद्धतीनुसार या मात्रेमध्ये आणि पोषण मूल्यांमध्ये फरक असू शकतो.

मिल्क पावडरपासून बनवा हे 5 फेस मास्क (Milk Powder Face Mask for Skin Whitening)

मिल्क पावडरमुळे तुमची त्वचा अधिक खुलते. त्वचेच्या प्रकारानुसार त्याचा वापर चेहऱ्यासाठी करणे फारच गरजेचे असते. म्हणून आम्ही वेगवेगळ्या त्वचेच्या प्रकारानुसार आणि समस्येनुसार काही मिल्क पावडरचे चांगले फेस मास्क शोधून काढले आहेत.. जे तुम्हाला नितळ त्वचा तर देतीलच पण तुमच्या त्वचेच्या अन्य समस्या ही दूर करतील.

 

ADVERTISEMENT

 

मिल्क पावडर, तांदूळ- गुलाबपाणी मास्क

मिल्क पावडर, तांदूळ-गुलाबपाणी मास्क

Instagram

मिल्क पावडर, तांदूळाचे पीठ आणि गुलाबपाणीपासून तयार केलेला हा मास्क त्वचेवरील डाग काढून त्वचा एक्सफोलिएट करण्याचे काम करते. 

ADVERTISEMENT

साहित्य: 1 चमचा मिल्क पावडर, 2 चमचे तांदूळाचे पीठ, आवश्यकतेनुसार गुलाबपाणी

कृती: एका भांड्यात मिल्क पावडर, तांदूळाचे पीठ आणि भिजेल इतके गुलाबपाणी घाला. सरसरीत मिश्रण एकत्र करुन घ्या. 

असा लावा मास्क:

  • चेहरा स्वच्छ धुवून घ्या. पाण्याने धुतला तरी चालू शकेल. 
  • तयार मास्क एका ब्रशच्या किंवा हाताच्या मदतीने चेहऱ्याला लावा. 
  • संपूर्ण चेहऱ्याला मास्क लावून हा मास्क चेहऱ्यावर 20 मिनिटे चेहऱ्याला लावा.
  • मास्क चेहऱ्यावर वाळल्यानंतर हा मास्क स्क्रब म्हणून चेहऱ्यावर हलक्या हाताने घासा. 
  • थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. 

कोणत्या त्वचेसाठी योग्य: चेहऱ्यावर पिंपल्स आणि डाग असेल किंवा तुमची त्वचा ऑईली असेल तर तुम्ही हा मास्क लावल्यास उत्तम रिझल्ट मिळतील.

ADVERTISEMENT

फायदे: त्वचेवरुन डेट स्किन काढून टाकून नवीन त्वचा आणण्याचे काम हा मास्क करेल. याचा वापर आठवड्यातून तीन वेळा करण्यास हरकत नाही. 

मिल्क पावडर आणि केशर

मिल्क पावडर  आणि केशर

Instagram

दूध आणि केशर हे कॉम्बिनेशही चेहऱ्यासाठी फार चांगले आहे. केशरचा उपयोग त्वचेचा रंग उजळवण्यासाठी केला जातो. जर तुम्हाला त्वचा उजळवायची असेल तर तुम्ही या मास्कचा उपयोग करायला काहीच हरकत नाही.

ADVERTISEMENT

साहित्य: थोडेसे केशर, 1 चमचा मिल्क पावडर, पाणी

कृती: एका भांड्यात थोडेसे पाणी आणि केशर घ्या. केशर आदल्या रात्री पाण्यात केशर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी त्यामध्ये मिल्क पावडर घालून एक जाडसर पेस्ट करुन घ्या. 

असा लावा मास्क:

  • चेहरा कोरडा करुन घ्या. 
  • तयार मास्क चेहऱ्याला लावून साधारण 15 मिनिटं किंवा वाळेपर्यंत ठेवा.(अर्धा तासापर्यंत ठेवले तरी  चालेल)
  • थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. 

कोणत्या त्वचेसाठी योग्य: कोरड्या त्वचेसाठी हा मास्क एकदम उत्तम आहे. 

ADVERTISEMENT

फायदे: केशर आणि मिल्क पावडरमधील लॅक्टिक अॅसिड तुमची त्वचा उजळवतात. डागविरहीत आणि नितळ त्वचेसाठी फायदेशीर

महिन्याभरात मिळवा तुम्हाला हवी असलेली सुंदर त्वचा… तेही घरच्या घरी

मिल्क पावडर आणि मध (Milk Powder And Honey)

मिल्क पावडर आणि मध

Instagram

ADVERTISEMENT

मधाचा उपयोगही अनेक ब्युटी ट्रिटमेंटमध्ये अगदी हमखास केला जातो. मधासोबत मिल्क पावडरचा उपयोग हा अधिक फायदेशीर ठरतो. 

साहित्य: 1 चमचा मिल्क पावडर, 1 चमचा मध 

कृती: एका भांड्यात सम प्रमाणात मिल्क पावडर आणि मध घ्या. याची एक पेस्ट तयार करुन घ्या. सगळ्यात सोपा असा हा मास्क आहे. 

असा लावा मास्क: 

ADVERTISEMENT
  • चेहरा स्वच्छ करुन घ्या. 
  • तयार सोपा मास्क चेहऱ्याला लावा. 
  • मास्क छान वाळला की, चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या. 

कोणत्या त्वचेसाठी योग्य:  कोणत्याही त्वचेसाठी हा मास्क अगदी योग्य आहे. त्यामुळे तुम्ही बिनधास्त याचा वापर करु शकता.

फायदे: मधमधील अँटीऑक्सिडंट आणि मिल्क पावडरमधील लॅक्टिक अॅसिड तुमच्या त्वचेवरील मृत त्वचा काढून टाकते. काळवंडलेली त्वचा एकसारखी करते. 

मिल्क पावडर आणि वॉलनट स्क्रब (Milk Powder And Walnut Scrub)

मिल्क पावडर आणि वॉलनट स्क्रब

Instagram

ADVERTISEMENT

नैसर्गिक घटकांचा अधिकाधिक वापर करुन तुम्हाला तुमचे ब्युटीकेअर बनवायचे असतील तर मिल्क पावडर आणि वॉलनट स्क्रब हा देखील तुमच्यासाठी अगदी उत्तम पर्याय आहे. 

साहित्य: 1 चमचा मिल्क पावडर, 1 चमचा अक्रोडचा बारीक क्रश (बाजारात ब्युटी ट्रिटमेंटसाठी मिळतो)

कृती: एका भांड्यात मिल्क पावडर आणि अक्रोड घेऊन त्यामध्ये पाणी, दूध किंवा दूधाची मलई घेऊन एकत्र करा. मास्क तयार 

असा लावा मास्क:

ADVERTISEMENT
  • चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून कोरडा करुन घ्या. 
  • तयार मास्क चेहऱ्याला लावून किमान 15 मिनिटांसाठी चेहऱ्यावर ठेवा. 
  • मास्क वाळल्यानंतर काढताना चेहऱ्याला थोडे थोडे पाणी लावून तो गोलाकार दिशेने चोळून काढा. त्यामुळे ते तुमच्या त्वचेवर स्क्रबही होईल. 

कोणत्या त्वचेसाठी योग्य: साधारण कोरड्या त्वचेसाठी हा मास्क चांगला आहे. तुमची त्वचा नाजूक असेल तरी देखील तुम्ही याचा वापर करु शकता. फक्त यामधील दूध किंवा तेल असलेले घटक नको असल्यास टाळा. कारण अक्रोडमध्ये आधीच तेल असते. 

फायदे: त्वचेला इन्स्टंट ग्लो, त्वचा उजळवणे, त्वचेची खोलवर स्वच्छता करण्याचे काम योग्य पद्धतीने करते. 

मिल्क पावडर आणि जास्मिन एक्सट्रॅक्ट

जास्मिन, मिल्क पावडर फेस मास्क

Instagram

ADVERTISEMENT

इन्स्टंट ग्लो आणि स्पॉट फ्री त्वचा हवी असेल तर तुम्ही मिल्क पावडर आणि जास्मिन एक्स्ट्रॅक्ट असलेला हा मास्क  वापरु शकता. 

साहित्य: 1 चमचा मिल्क पावडर,1 चमेलीच्या फुलांचा अर्क किंवा सुकलेली फुलं, पाणी

कृती: एका भांड्यात मिल्क पावडर, चमेलीची फुल कुस्करुन घाला. (आवश्यक असल्यास तुम्ही यामध्ये दही घातले तरी चालेल, तेलकट त्वचा असणाऱ्यांनी दही घालू नका)

असा लावा मास्क :

ADVERTISEMENT
  • तयार मास्क चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर चेहऱ्यावर लावा. 
  • साधारण 15 ते 20 मिनिटं हा मास्क ठेवा. 
  • कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. 

कोणत्या त्वचेसाठी योग्य: कोणत्याही त्वचेसाठी हा मास्क योग्य आहे. 

फायदे: एव्हन टोन्ड, स्पॉट फ्री आणि सुंदर त्वचा देण्याचे काम ही त्वचा करते.

मिल्क पावडर वापरण्याचे फायदे (Benefits of Milk Powder In Marathi)

मिल्क पावडर वापरण्याचे फायदे

ADVERTISEMENT

Instagram

मिल्क पावडरपासून तयार होणारे मास्क जाणून घेतल्यानंतर जाणून घेऊया मिल्क पावडरच्या फायद्यांविषयी. त्वचेसाठी मिल्क पावडर फायदेशीर का आहेत त्या मागे असलेली ही आहेत उत्तरं.

उत्तम क्लिन्झर (Best Cleanser)

दूधामध्ये असलेला सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे लॅक्टिक अॅसिड (Lactic Acid). त्वचा स्वच्छ करण्यासाठी फारच उपयुक्त आहे. त्वचेवर असलेली अस्वच्छता काढून रंग उजळवण्याचे काम मिल्क पावडर अत्यंत चांगल्या पद्धतीने करते. लॅक्टिक अॅसिडमुळे तुमच्या त्वचेवरील मृत त्वचा निघून जाण्यास मदत मिळते.तुमच्या त्वचेवरील घाण खोलवर काढून तुमच्या त्वचेला ग्लो देण्याचे काम करते. 

खोलवर स्वच्छता (Exfoliate)

उत्तम त्वचेसाठी त्वचेची खोलवर स्वच्छता होणे फारच गरजेचे असते. मिल्क पावडरमध्ये असलेले लॅक्टिक अॅसिड आणि इतर गुणधर्म त्वचेच्या आतपर्यंत जाऊन खोलवर स्वच्छता करतात. ज्यांना स्क्रबच्या बारीक कणांचा त्रास होतो अशांनी अगदी हमखास मिल्क पावडरचा उपयोग करावा. कारण त्वचेला कोणताही ओरखडा न पाडता त्वचा स्वच्छ करण्याचे काम मिल्क पावडर खूप चांगल्या पद्धतीने करते. त्वचेवरील मृत त्वचा काढून त्या जागी कोमल, मुलायम त्वचा देते.

ADVERTISEMENT

त्वचेचे तारुण्य टिकवते (Youthful Glow)

मिल्क पावडरमध्ये नुसतेच लॅक्टिक अॅसिड नाही तर त्यासोबत व्हिटॅमिन्सही आहेत. व्हिटॅमिन A,B-6,C,D  त्वचेसाठी आवश्यक असतात. ते योग्य पद्धतीने त्वचेला मिळाले तर त्वचेवरील सुरकुत्या आणि पोअर्स कमी करण्यास मदत होते. त्यामुळे तुमची त्वचा अधिक तरुण दिसू लागते. त्वचेला हवी असलेली इलास्टिसिटी यामधून मिळते. त्यामुळे त्वचा अधिक सुंदर, तेजस्वी दिसते. 

त्वचेला देते पोषण (Nourishes Skin)

दूधाच्या तुलनेत मिल्क पावडरमध्ये असलेले पोषक घटक प्रोसेस केल्यानंतर अधिक होतात. त्वचेमधील व्हिटॅमिन्सची कमतरता भरुन काढण्याचे काम मिल्क पावडर करते. त्वचेला योग्य पोषण मिळाले की त्वचा अधिक चांगली दिसण्यास मदत मिळते. त्यामुळे मिल्क पावडर वापरण्याचा हा आणखी एक फायदा त्वचेसाठी फारच लाभदायक आहे. 

पोअर्स ठेवते स्वच्छ (Unclogging Pores)

चेहऱ्यावरील पोअर्स हे स्वच्छ आणि लहान असतील तर अशी त्वचा कायम सुंदर आणि तरुण दिसते. चेहऱ्यावर मोठे पोअर्स असतील तर अशा त्वचेला अधिक समस्यांना सामोरे जावे लागते. तेलकट त्वचेसंदर्भात या तक्रारी अनेकवेळा संभावतात. मिल्क पावडर पोअर्समध्ये जाऊन त्यांना स्वच्छ करण्याचे काम करते. पोअर्सचा आकार लहान करुन त्यामध्ये कोणतीही घाण साचू देत नाही. त्यामुळे त्याचा हा फायदाही अनेकांसाठी फार महत्वाचा ठरतो. 

ADVERTISEMENT

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’S)

1. कोणती मिल्क पावडरही सगळ्यात चांगली आहे ? 
बाजारात अनेक प्रकारच्या मिल्क पावडर मिळतात. दूधापासून तयार केलेल्याच नाही तर अन्य काही गोष्टींपासूनही मिल्क पावडर तयार करण्यात येते. उदा. कोकनट मिल्क पावडर वगैरे. पण आज आम्ही ज्या मिल्क पावडरविषयी तुम्हाला माहिती दिली आहे ती दूधापासून तयार झालेली आहे. त्यामुळे चांगल्या नावाजलेल्या ब्रँडची मिल्क पावडर घेणे नेहमी उत्तम! त्वचेसाठी आणि सेवनासाठी चांगल्या दर्जाची पावडर घ्या.

2. मिल्क पावडरचे काही दुष्परिणाम आहेत का?
दूधाप्रमाणेच मिल्क पावडरमध्ये आवश्यक असे घटक असतात. पण मिल्क पावडरचा विचार करता त्यामध्ये फार जास्त प्रमाणात कोलेस्ट्रॉल असते. अर्थात त्यामध्ये फॅटचे प्रमाण अधिक असते. अशावेळी त्याचे सेवन करणे अनेकांसाठी धोक्याचे असू शकते. त्वचेच्या बाबतीत सांगायचे झाले तर मिल्क पावडरचे फार काही तोटे नाहीत. पण ज्याला लॅक्टोसची अॅलर्जी असेल त्यांनी या पासून लांब राहिलेले बरे.

3. मिल्क पावडरपासून तयार केलेला मास्क रोज लावणे चांगले आहे का?
अजिबात नाही! त्वचेला एखाद्या गोष्टीची त्वेला अजिबात सवय करु नका. फार तर  तुम्ही आठवड्यातून दोन वेळा हा मास्क चेहऱ्याला लावा. जास्त वेळ याचा प्रयोग करणे चांगले नाही.

07 Oct 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT