ADVERTISEMENT
home / पालकत्व
गरोदरपणात पोहण्याचे फायदे, जाणून घ्या

गरोदरपणात पोहण्याचे फायदे, जाणून घ्या

काही दिवसांपूर्वी अनुष्का शर्माचा गरोदरपणातील स्विमिंग पूलमधला फोटो व्हायरल झाला होता.  बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की गरोदरपणात पोहणे कसे शक्य आहे. तर पोहणे हा गरोदरपणातील सुरक्षित व्यायाम प्रकारापैकी एक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. गरोदरपणात व्यायम करणे हे शरीर आणि मन दोन्हीसाठी अत्यावश्यक असतं. यासाठी स्विमिंग  अर्थात पोहणे, स्कुबा डायव्हिंग आणि काही हलके योग हे शरीर आणि मन दोन्हीसाठी फायदेशीर ठरतात.  तसंच गरोदरपणात पोहण्याने शरीराला अनेक फायदे होतात. उदाहरणार्थ शरीरातील मांसपेशींमध्ये विस्तार होतो आणि त्याची खेचली जाण्याची क्षमता वाढण्यास मदत होते. बऱ्याच जणांना हे पाण्यामुळे सुरक्षित वाटत नाही. पण तुम्ही पोहण्यासाठी एकटे जाण्याची गरज नाही. या लेखातून आम्ही तुम्हाला गरोदरपणामध्ये  पोहण्याचे नक्की काय फायदे (benefits of swimming during pregnancy) आहेत ते सांगणार आहोत. त्याचप्रमाणे कशी काळजी घ्यायला हवी याच्या टिप्सही महत्त्वाच्या आहेत आणि तेदेखील तुम्ही यातून जाणून घेऊ शकता. सर्वप्रथम आपण गरोदरपणात पोहण्याचे काय फायदे आहेत ते पाहूया. 

गरोदरपणात सकाळीच उठल्यावर मळमळतंय…तर करा नैसर्गिकरित्या उपचार

गरोदरपणात पोहण्याचे फायदे

गरोदरपणात पोहण्याचे अनेक फायदे आहेत. त्याची माहिती खालीलप्रमाणे – 

  • गरोदरपणाच्या काळात पायाला सूज येणे हे अत्यंत सामान्य आहे. पण तुम्ही पोहण्याची  प्रक्रिया केल्यास तुमच्य पायाची ही सूज जाण्यास मदत मिळते. पाण्यात पोहायला गेल्यानंतर तुमच्या नसा मोकळ्या होतात आणि त्यामुळेच तुमच्या पायाची सूज कमी होण्यास मदत मिळते
  • रक्तप्रवाह वाढण्यास मिळते मदत. ज्यामुळे शरीराच्या खालच्या भागात रक्ताचा पुरवठा योग्य राहोत आणि पायामध्ये कमी दुखते. अन्यथा गरोदरपणात वजन वाढून पायावर जास्त भार येतो आणि पाय सतत दुखत राहतात
  • गरोदरपणात सुरूवातीच्या दिवसात खूप मळमळ होते ज्याला मॉर्निंग सिकनेस असं म्हटलं जातं. मात्र पोहत राहिल्यास, तुम्हाला होणारा हा त्रास कमी होतो. सकाळी उठल्यानंतर उलटीसारखं वाटणं हे सामान्य लक्षण आहे. पण स्विमिंगच्या मदतीने हे लक्षण कमी होते
  • गरोदरपणामध्ये हार्मोनल संतुलन न राहणं हेदेखील खूपच जणींना जाणवतं. पण अशावेळी पूलजवळ राहणं हे तुमच्या शरीराचं तापमान संतुलित ठेवतं आणि तुमच्या मनालाही पाणी शांतता देतं
  • तुमचं शरीर टोन्ड ठेवण्यासही मदत होते आणि अतिरिक्त वजन वाढत नाही. तसंच गरोदरपणात शरीर सुटण्याची शक्यता जास्त असते. ते रोखण्यास मदत मिळते. यामुळे डिलिव्हरीच्या वेळी नॉर्मल डिलिव्हरी होण्यास फायदा मिळतो
  • तुमची हाडे आणि सांधे मजबूत राहून त्यांना अधिक आराम मिळतो. त्यामुळे रोज किमान अर्धा तास पोहायला जाणे हे तुमच्या तब्येतीसाठी फायदेशीर ठरते 

‘अशी’ लक्षणं जाणवत असतील तर तुम्ही गरोदर आहात हे समजा

ADVERTISEMENT

गरोदरपणात पोहण्यासाठी जात असाल तर काही महत्त्वाच्या टिप्स

  • एक चांगला स्विमसूट घ्या. तुमचे गरोदरपणाचे महिने वाढतील तसा तुमच्या पोटाचा आणि तुमचा आकार हा बदलत जाणार आहे याची काळजी तुम्हाला घ्यायला हवी
  • पाण्यात घसरण्याची शक्यता असते. त्यामुळे अतिशय हलकेपणाने आणि काळजीपूर्वक तुम्ही पाण्यात उतरा
    पाण्यात उतरताना नेहमी हायड्रेटेड राहा. तुम्हाला मध्येच तहान लागली तर तुम्ही कोणाच्या तरी मदतीने पाणी पिऊ शकता. तसंच तुम्ही नऊ महिने तैराकीमध्ये सुरक्षितरित्या मदत घेऊन पूलमध्ये राहू शकता
  • आपल्यासह प्रत्येक वेळी कोणी ना कोणी आहे की नाही याची काळजी घ्या. कधीही स्विमिंग पूलमध्ये एकट्याने जाऊ नका
  • तुमच्यासाठी पोहणे सुरक्षित आहे की नाही याची सल्लामसलत तुम्ही तुमच्या डॉक्टरांसह नक्की करा आणि त्यानंतरच पोहायला जा

You Might Like These:

गरोदर राहण्यासाठी करण्यात येतोय मेन्स्ट्रूअल कपचा वापर

9th Month Pregnancy Care Tips In Marathi

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
08 Oct 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT