हल्ली कोणीही विचारतं की बाळाचा जन्म कसा झाला? तेव्हा बहुतांशी उत्तर हे सिझेरियन असंच ऐकू येतं. आताच्या दिवसात नॉर्मल डिलिव्हरी होणं म्हणजे नशीबच असं मानलं जाऊ लागलं आहे. प्रत्येक महिलेला नॉर्मल डिलिव्हरी व्हावी असंच वाटत असते. आपल्याला होणारं बाळ हे तंदुरूस्त आणि त्यातही नॉर्मल डिलिव्हरी (Normal Delivery) घेऊन जन्माला आलं तर प्रत्येक आईला ते हवंच असतं. कारण सिझेरियन नंतर होणारे तोटे हे अत्यंत त्रासदायक असतात याची बऱ्याच जणींना कल्पना असते. पण हल्लीच्या बदलत्या लाईफस्टाईलमध्ये नॉर्मल डिलिव्हरी होणं हे फारच कठीण दिसून यायला लागलं आहे. कमजोर शरीर, वाईट सवयी यामुळे बऱ्याचदा बाळाला जन्म देतानाही अनेकांना गुंतागुंतीला सामोरं जावं लागतं आणि मग पर्याय निवडावा लागतो तो म्हणजे सिझेरियनचा. पण आजच्या धकाधकीच्या आयुष्यातही तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरी हवी असेल तर तुम्ही गरोदर आहात हे समजल्यापासून तुम्ही काही सोपे आणि परिणामकारक उपाय करू शकता. जेणेकरून तुम्ही नॉर्मल डिलिव्हरीसाठी प्रयत्न करू शकता. आम्ही तुम्हाला या लेखातून असेच काही सोपे आणि परिणामकारक उपाय सांगणार आहोत जेणेकरून तुम्ही सिझेरियन डिलिव्हरीपेक्षा नॉर्मल डिलिव्हरीचा पर्याय निवडू शकाल. त्यासाठी तुम्ही गरोदर आहात हे समजल्यापासूनच तुम्ही हे उपाय करायला हवेत. जाणून घेऊया काय आहेत हे परिणामकारक उपाय. पण त्याआधी या दोन्ही डिलिव्हरीमधील फरक समजून घेणंही तितकंच आवश्यक आहे.
नॉर्मल डिलिव्हरीमध्ये बाळाचा जन्म हा नैसर्गिक पद्धतीने होतो. पण यामध्ये आईला अधिक दुःखातून अर्थात लेबर पेनमधून जावं लागतं. पण नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळी एकदाच ते दुःख सहन करावं लागतं आणि त्यानंतर कोणत्याही स्त्री ची प्रकृती ही व्यवस्थित आणि लवकरच बरी होते आणि त्याशिवाय दुसऱ्या बाळासाठीही लवकर विचार करता येतो. बाळाचा जन्म नॉर्मल डिलिव्हरीने झाला तर आईला डिलिव्हरीनंतर त्वरीत खाता पिता येते. नॉर्मल डिलिव्हरीनंतर आईल त्वरीत बाळाला जवळ घेऊ शकते. अगदी त्वरीत बाळाला फिडिंगही करता येते.
मात्र सिझेरियन डिलिव्हरीमध्ये लेबर पेन होत नाही. सिझेरियन पद्धतीत आईचे पोट खालच्या बाजूने कट करून ऑपरेशनद्वारे बाळाला बाहेर काढण्यात येतं. पण यानंतर आईला मात्र अत्यंत काळजी घ्यावी लागते. तसंच सिझेरियनमध्ये दिलेल्या इंजेक्शन आणि कट्समुळे आयुष्यभर त्रास सहन करावा लागतो. कधीतरी स्टिचेसचाही त्रास होतो. त्यामुळे बऱ्याचदा डॉक्टरही महिलांना जास्तीत जास्त नॉर्मल डिलिव्हरी व्हावी यासाठीच प्रयत्न करावा असं सागंतात.
नॉर्मल डिलिव्हरी ही प्रत्येक स्त्री साठी महत्त्वाची बाब आहे. सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात फारच कमी महिलांच्या वाट्याला नॉर्मल डिलिव्हरी येते. पण आम्ही सांगितलेले काही सोपे आणि परिणामकारक उपाय तुम्ही लक्षात ठेवले तर नक्कीच तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी मदत मिळेल.
वयाच्या तिशीनंतर आई व्हायचंय, जाणून घ्या 5 गुंतागुंतीच्या गोष्टी
नॉर्मल डिलिव्हरीसाठी आपण गरोदर आहोत हे कळल्यापासून नियमित स्वरूपात डॉक्टरांचा सल्ला घेत राहायला हवा. आपल्याला असणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर डॉक्टरांकडून आपल्याला मिळते. त्यामुळे मनात कोणतीही शंका असेल तर ती वेळच्या वेळी डॉक्टरांना विचारावी आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे योग्य वेळी व्यायाम, औषध या सगळ्याची काळजी घ्यावी. कधीकधी कसं विचारायचं असा मुद्दा असेल तरीही असं करू नका. मनातील गोष्टी गरोदरपणात मनात ठेऊ नका. कारण मनात त्यामुळे तणाव अधिक वाढतो. तुम्ही नियमित चेकअप करत आपल्या मनातील प्रत्येक बाब डॉक्टरांकडून क्लिअर करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. तसंच डॉक्टरांना विचारल्याशिवाय कोणत्याही गोष्टीचे सेवन करणे अथवा कोणतीही गोष्ट स्वतःच्या मनाने या दिवसात करणे योग्य नाही. त्यामुळे काळजी घ्यावी.
गरोदर असणे म्हणजे सतत झोपून राहणे असा त्याचा अर्थ होत नाही. गरोदरपणा हा एक अप्रतिम काळ असतो. या काळात स्वतःला आणि बाळाला जपायचे असते. मात्र त्याचा अर्थ काहीच काम अथवा व्यायाम करायचा नाही असा होत नाही. नॉर्मल डिलिव्हरी हवी असेल तर सर्वात चांगला पर्याय म्हणजे नियमित चालणे. रोज चालल्याने तुम्हाला ताजी हवा आणि मनाला शांतताही मिळेल. पण चालणे म्हणजे नेहमीप्रमाणे चालणे नाही तर तुम्ही अत्यंत सावकाश गतीने मात्र काही वेळ म्हणजे किमान अर्धा ते पाऊण तास गरोदरपणामध्ये चालणे आवश्यक आहे. यामुळे स्नायू आखडत नाहीत आणि तुमच्या शरीरालाही उत्तेजना मिळते. चालताना घामही येतो आणि सध्याच्या दिवसात स्वतःला रोगांपासून दूर ठेवणं आवश्यक आहे त्यामुळे तुम्ही MyGlamm चे वाईपआऊटही यावेळी वापरू शकता.
बऱ्याचदा आपण पाहतो की, गर्भावस्थेमध्ये महिलांना आराम करण्यासाठी सांगण्यात येतं. पण आरामासह गरोदर महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणंही गरजेचे आहे. वास्तविक गरोदरपणात मांसपेशी निरोगी आणि मजबूत असणं गरेजचे आहे कारण यामुळे प्रसवदरम्यान होणाऱ्या त्रासाशी लढण्यास मदत मिळते. लक्षात ठेवा की, व्यायाम करताना जास्त जड गोष्टी उचलू नका आणि व्यायाम करताना कसा करायाचा याचा योग्य सल्ला विशेषज्ज्ञांकडून घ्या. नॉर्मल डिलिव्हरीसाठी व्यायाम आणि योगा केल्याने त्रासही कमी होतो आणि डिलिव्हरी नॉर्मल होण्यास मदत मिळते. तसंच तुम्ही योग्य व्यायाम करत आहात की नाही याची खात्री करून घ्या अन्यथा त्याचा उलटा परिणाम होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे योगा अथवा व्यायाम करताना देखरेखीखालीच करा.
नियमित आयुष्यातही आपल्याला किमान 8 तासांची झोप आवश्यक असते. गरोदरपणामध्ये नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी योग्य आणि अबाधित अशी चांगल्या झोपेची आवश्यकता असते. त्यामुळे झोपण्यापूर्वी कधीही दोन तास आधी चहा अथवा कॉफीचे सेवन करू नये. या दोन्ही गोष्टींमुळे झोप निघून जाते. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. वेळेवर झोपा. उगीच जागरण करू नका. त्याचाही शरीरावर परिणाम होत असतो. तसंच त्याचा परिणाम बाळावरही होत असतो. त्यामुळे किमान 8-9 तासांची झोप गरोदरपणामध्ये आवश्यक आहे. मात्र सतत झोप काढू नका. नॉर्मल डिलिव्हरी हवी असल्यास, तुम्ही शरीराकडे व्यवस्थित लक्ष देणंही गरजेचे आहे.
मनावर तणाव घेणे अथवा डिप्रेशनमध्ये जाणे हे कोणत्याही चांगल्या कामात बाधा आणते. गरोदरपणात मूड स्विंग्ज होत राहातात. पण त्याचा अर्थ मनावर कोणत्याही गोष्टीचा तणाव घ्यायला हवा असा नाही. तणावामुळे गर्भावस्थेत गुंतागुंत अधिक वाढते. याचा प्रभाव तुमच्यावर आणि तुमच्या बाळावर होतो. गर्भावस्थेत जितके आनंदी राहता येईल आणि जितके अधिक तणावापासून दूर राहता येईल तितके राहा. तुम्हाला या काळात शांत आणि संतुलित राहण्याची अत्यंत गरज आहे. तसंच तणावापासून दूर राहण्यासाठी आवडती पुस्तके वाचा, आवडते चित्रपट पाहा. नकारात्मक गोष्टींकडे लक्ष देऊ नका. याचा परिणाम होऊन तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरी होण्यास मदत मिळेल.
काही जणी गरोदर आहोत हे कळल्यापासून कामच बंद करतात. पण त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी होणं शक्यच नाही. तुमच्या शरीराची हालचाल होत राहणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे स्वयंपाकघरातील लहान मोठी कामं, जेवण बनवणं या सगळ्या गोष्टी तुम्ही नियमित करायला हव्यात. काही जणींना स्वयंपाकघरातील काही वासांचा या काळात त्रास होतो, अशावेळी तुम्ही ते काम न करता इतर कामाकडे लक्ष द्या. पण त्रास होतोय याचा अर्थ काहीच काम करायचं नाही असा होत नाही. तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरी व्हायला हवी असेल तर तुम्ही किमान घरातल्या घरातील तरी कामं करायलाच हवीत. इतकंच नाही तर तुम्ही कचरा काढणं आणि इतरही काही कामं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि त्यांनी सांगितल्यानुसार करायला हवीत.
गरोदर असताना नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी तुम्ही श्वासाचा व्यायाम अर्थात ध्यानधारणा प्राणायम करायला हवा. याचा फायदा असा होतो की तुम्हाला हवा असणारा योग्य ऑक्सिजन मिळत राहतो. केवळ तुम्हालाच नाही तर तुमच्या बाळालाही या ऑक्सिजनचा व्यवस्थित पुरवठा मिळत राहतो. त्यामुळे बाळाचा विकासही अत्यंत चांगल्या तऱ्हेने होतो. त्यामुळे नियमित स्वरूपात ध्यान आणि श्वासाचा व्यायाम अर्थात प्राणायम करत राहा. याचा नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी नक्कीच फायदा होतो.
गरोदर असताना दोन जीव सांभाळत असल्यामुळे अत्यंत भूक लागते. पण त्याचा अर्थ सतत खात राहणे असा होत नाही. तसंच या काळात हवं ते खायला हवे हे जरी खरे असले तरीही डाएटची काळजी घेणंही गरजेचे असते. डॉक्टरही या काळात जास्त तेलकट अथवा जंक फूड न खाण्याचा सल्ला देतात. नॉर्मल डिलिव्हरीसाठी खाण्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. अशा अवस्थेत योग्य वेळी आणि योग्य आहार घेणे गरजेचे आहे. गरोदरपणात आयरन आणि कॅल्शियमची कमतरता होते त्यामुळे असा आहार घ्यावा. तसंच हिरव्या भाज्या आणि ज्युस, अंडे आणि ताज्या फळांचा समावेश करून घ्यावा. यामुळे तुम्हाला आणि तुमच्या पोटातील तुमच्या बाळाला योग्य प्रोटीन आणि विटामिन्स मिळतात. तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डाएट फॉलो करा.
इतर व्यायामाप्रमाणेच हल्ली नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी योगाची मदत घेण्याचे प्रमाणही वाढत चालले आहे. गरोदरपणाच्या काळात तुम्ही अगदी शेवटपर्यंत योगाचे काही प्रकार करत राहिलात तर तुमची डिलिव्हरी खात्रीने नॉर्मल होते. हल्ली बऱ्याच महिला अगदी पहिल्या महिन्यापासून योगासाठी जातात. यामध्ये बाळाच्या वाढीनुसार योगाचे प्रकार बदलण्यात येतात आणि त्याचप्रमाणे बाळाची वाढ जसजशी होत जाते त्याप्रमाणे योगाचे प्रकार बदलत जास्तीत जास्त नॉर्मल पद्धतीने डिलिव्हरी होईल याकडे लक्ष देण्यात येते. तसंच बाळाच्या आणि आईच्या दोघांच्याही आरोग्याची काळजी योग्य प्रकारे घेतली जाते. यामुळे आईचे शरीरही अवाढव्य वाढत नाही आणि पुढच्या त्रासांपासूनही वाचण्यास मदत मिळते.
नियमित आयुष्यातही आपल्याला दिवसातून किमान 8 ग्लास पाणी प्यायला हवे. त्याचप्रमाणे गरोदर असताना तर पाण्याची गरज भासतेच. तुम्ही कधीही गरोदर असताना कमी पाणी पिऊ नका. तुमचे शरीर केवळ हायड्रेट करण्यासाठीच नाही तर तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरीसाठीही याचा उपयोग होतो. गर्भवती महिला रोज दिवसातून 10 ग्लास पाणी पिऊ शकता. पाणी पिणे हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असून शरीरातील हायड्रेशन व्यवस्थित राखण्यासही मदत मिळते.
1. नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा?
नॉर्मल डिलिव्हरीसाठी खाण्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. अशा अवस्थेत योग्य वेळी आणि योग्य आहार घेणे गरजेचे आहे. गरोदरपणात आयरन आणि कॅल्शियमची कमतरता होते त्यामुळे असा आहार घ्यावा. तसंच हिरव्या भाज्या आणि ज्युस, अंडे आणि ताज्या फळांचा समावेश करून घ्यावा. तेलकट खाणे आणि जंक फूड सहसा टाळावे.
2. नॉर्मल डिलिव्हरीची काही लक्षणे आहेत का?
नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळी बाळाचं डोकं हे मूत्राशयाजवळ आल्याने स्त्री लघ्वी रोखू शकत नाही. अत्यंत जास्त वेदना आणि कळा यायला सुरुवात होतात आणि त्याचप्रमाणे काही महिलांच्या बाबतीत रक्तस्रावही सुरू होतो. कमरेतून असह्य वेदना सुरू व्हायला लागतात आणि पायातूनही कळा येतात. तर काही महिलांना स्तनाजवळ खाज येऊ लागते. काही जणींना जुलाब होऊ लागतात. ही नॉर्मल डिलिव्हरीची सर्वसामान्य लक्षणं आहेत.
3. नॉर्मल डिलिव्हरीसाठी चालणे योग्य ठरते का?
नॉर्मल डिलिव्हरी हवी असेल तर सर्वात चांगला पर्याय म्हणजे नियमित चालणे. रोज चालल्याने तुम्हाला ताजी हवा आणि मनाला शांतताही मिळेल. हा एक प्रकारचा व्यायाम होतो ज्यामुळे शरीर तंदुरुस्त राहते आणि नॉर्मल डिलिव्हरीसाठी त्याचा फायदा होतो.
4. नॉर्मल डिलिव्हरी त्रासदायक आहे का?
नॉर्मल डिलिव्हरीमध्ये काही काळ लेबर पेनमध्ये त्रास सहन करावा लागतो आणि बाळ जन्माला येताना होणारा त्रास इतकाच त्याचा त्रास आहे. अन्यथा नंतर नॉर्मल डिलिव्हरीचा काहीही त्रास होत नाही.
5. कोणत्या प्रकारची डिलिव्हरी उत्कृष्ट आहे?
अर्थातच नॉर्मल डिलिव्हरी. कोणत्याही स्त्री ला आपली नॉर्मल डिलिव्हरी व्हावी असेच वाटते. कारण त्याचा त्रास एकदाच होतो. त्यानंतर होत नाही.
6. नॉर्मल डिलिव्हरीसाठी कोणता व्यायाम सर्वात जास्त चांगला आहे?
नॉर्मल डिलिव्हरीसाठी नियमित घरातील कामे करणे. अगदी झाडू काढणे, लादी पुसणे हा व्यायामदेखील उत्तम आहे. मात्र हे तुम्हाला जमत नसेल तर रोजच्या रोज किमान अर्धा तास चालणे आणि ध्यानधारणा करणे हे उत्तम.
घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा
देखील वाचा -
गरोदरपणानंतर काय घ्यावी काळजी, जाणून घ्या (After Pregnancy Tips In Marathi)