ADVERTISEMENT
home / सौंदर्य
best-eyeshadow-palette-in-marathi

सुंदर डोळ्यांसाठी भारतातील उत्तम आयशॅडो पॅलेट्स | Best Eyeshadow Palette In Marathi

सुंदर डोळे कोणाला नको असतात? ज्यांचे डोळे लहान आहेत त्यांना ते मोठे दाखवायचे असतात आणि मोठे डोळे अधिक  आकर्षक आणि लहान दाखवायचे असतात. मग अशावेळी डोळ्यांचे सौंदर्य वाढविण्यासाठी भारतातील उत्तम आयशॅडो पॅलेटचा उपयोग करून घेऊ शकतो. सर्वांनाच आयशॅडो लावण्याची पद्धत अथवा कसे निवडायचे याबाबत माहिती नसते. आम्ही या लेखातून तुमच्यासाठी ही सर्व माहिती घेऊन आलो आहोत. नक्की कोणत्या ब्रँड्सचे आयशॅडो तुम्ही वापरू शकता आणि त्याचे फायदे आणि तोटे नक्की काय आहेत. या सगळ्याची सविस्तर माहिती तुम्हाला या लेखातून नक्कीच मिळेल. आपण बाजारात अनेक कंपनी आणि मेकअप पाहतो. पण यापैकी आपल्या त्वचेसाठी कोणत्या कंपनीची वस्तू चांगली आहे हेदेखील समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्याला मेकअपचे ब्रँड्सही अनेक माहीत असतात, पण त्यापैकी कोणती आयशॅडो उत्तम आहे हे मात्र आपण तज्ज्ञांकडून जाणून घेतलेलंच बरं असतं. कोणत्याही मेकअपच्या गोष्टी घेताना आधी त्याचा रिव्ह्यू आणि त्याची माहिती आपल्याकडे असणं अत्यंत गरजेचं असतं. आपण पाहूया भारतातील उत्तम आयशॅडो पॅलेट्स नक्की कोणते आहेत. 

Manish Malhotra 9-in-1-Eyeshadow Palette – मनिष मल्होत्रा 9-in-1 आयशॅडो पॅलेट रांदेव्ह्यूज

आयशॅडो पॅलेटमध्ये मनिष मल्होत्राच्या या आयशॅडो पॅलेटचे नाव तर घ्यायलाच हवे. तुम्हाला जर ग्लॅमरस अभिनेत्रींसारखा लुक हवा असेल तर तुम्ही याच्या वेगवेगळ्या रेंज नक्की वापरून पाहू शकता. अतिशय सॉफ्ट आणि क्रिमी असणारे हे आयशॅडो पॅलेट फॉईल, मेटालिक आणि मॅट अशा तिन्ही स्वरूपात मिळते. तसंच तुम्हाला पटकन तयार होण्यासाठी याचा वापर करून घेता येतो. 

फायदे (Pros)

  • जास्त काळ टिकते 
  • क्रिमी असून याचा सिंगल स्ट्रोक डोळ्यांसाठी उपयुक्त ठरतो 
  • पटकन ब्लेंड होते 
  • पावडर फ्री आहे
  • वेट आणि ड्राय दोन्ही तऱ्हेने वापरता येते 
  • पॅराबेन, ऑईल, मिनरल्स ऑईल्समुक्त 
  • क्रुरता मुक्त अर्थात कोणत्याही प्राण्यांवर याचा उपयोग करण्यात आलेला नाही 

तोटे (Cons)

ADVERTISEMENT

कोणताही तोटा नाही

POPxo Eyeshadow Kit – POPXO MAKEUP – SQUAD GOALS – पॉपएक्सओ आयशॅडो किट

तुम्हाला वेगवेगळ्या रंगाची आवड असेल तर तुमच्या मेकअप किटमध्ये पॉपएक्स आयशॅडो किटचा (POPxo Eyeshadow Kit) समावेश करून घ्यायला हवा. अतिशय सॉफ्ट आणि वेगळ्या रंगाचे हे आयशॅडो आहेत. विटामिन ई असणारे मिक्स, बोल्ड आणि क्लासिक रंग यामध्ये आहेत. 

फायदे (Pros)

  • 6 मॅट आणि 6 शिमर शॅडोचे हे कॉम्बिनेशन आहे. यामध्ये बोल्ड आणि क्लासिक दोन्ही रंग आहेत
  • विटामिन ई युक्त असल्याने डोळ्यांना त्रास होत नाही 
  • जास्त काळ टिकते आणि त्याशिवाय लवकर ब्लेंड होते 
  • पॅराबेन फ्री आहे
  • क्रुएल्टी मुक्त आणि विगन आहे, तसंच कोणत्याही प्राण्यांवर याचा उपयोग करण्यात आलेला नाही
  • मॅग्नेटिक क्लोजर  

तोटे (Cons) –

ADVERTISEMENT

कोणताही तोटा नाही.

POPXO MAKEUP – EYESHADOW KIT – FLAT PRICE – पॉपएक्सओ मेकअप – आयशॅडो किट – फ्लॅट प्राईस

आयशॅडो किटमध्ये तुम्हाला जर वेगळे रंग हवे असतील आणि लहान पॅलेट कॅरी करायचे असेल तर तुम्ही याचा नक्की वापर करायला हवा. तसंच यामध्ये अनेक ट्रेंडी रंगाच्या शेड्स असल्यामुळे तुम्हाला स्वतःला फ्रेश वाटते.

फायदे (Pros)

  • जास्त काळ टिकते आणि त्याशिवाय लवकर ब्लेंड होते 
  • पॅराबेन फ्री आहे
  • क्रुएल्टी मुक्त आणि विगन आहे, तसंच कोणत्याही प्राण्यांवर याचा उपयोग करण्यात आलेला नाही
  • मॅग्नेटिक क्लोजर आणि चांगले पेपर पॅकेजिंग 
  • याशिवाय ट्रेंडी कलर्स 
  • प्रवासात नेणे अत्यंत सोपे आणि हलके 

तोटे (Cons)

ADVERTISEMENT

कोणताही तोटा नाही

Lakmé 9 to 5 Eye Shadow Palette- Tanjore Rush – लॅक्मे 9 टू 5 आय कलर क्वार्टेट आयशॅडो – तंजोर रश

बाजारामध्ये मेकअप म्हटलं की लॅक्मेचं नाव असलंच पाहिजे. लॅक्मेचे हे पॅलेट वॉर्म, शिमरी ज्वेल टोन्ड शॅडोज सणासुदीला तुम्हाला ग्लॅमरस दिसण्यासाठी उपयोगी पडतात. आपण लहान डोळ्यांसाठी परफेक्ट आय मेकअप वापरू शकता. तसंच तुम्हाला जास्त स्वाईप करण्याची गरज भासत नाही.

फायदे (Pros)

  • जास्त काळ टिकते 
  • पिगमेंटशेनसाठी उपयोगी 
  • पटकन ब्लेंड होते 

तोटे (Cons)

ADVERTISEMENT
  • नियमित वापरासाठी नाही
  • केवळ चार शेड्समध्ये उपलब्ध 
  • यामध्ये मॅट शेड्स उपलब्ध नाहीत

Maybelline Newyork City Mini Palette Eyeshadow – मेबेलिन न्यूयॉर्क सिटी मिनी पॅलेट आयशॅडो

मेबेलिन न्यूयॉर्क ही कंपनी मेकअप उत्पादन कंपन्यांमध्ये पुढे आहे. भारतातील उत्तम आयशॅडो पॅलेटसाठी याचे नाव नक्कीच घ्यायला हवे. तुम्हाला जर डोळ्यांसाठी नक्की कोणते पॅलेट वापरायचे आहे हे कळत नसेल तर तुम्ही याचा वापर नक्की करू शकता. यामध्ये शिमर शेड्स असून तुम्ही संपूर्ण दिवसासाठी आणि अगदी रात्रीच्या कार्यक्रमांसाठीही करू शकता. 

फायदे (Pros)

  • जास्त काळ टिकते 
  • संपूर्ण दिवसासाठी उपयोगी ठरते 
  • सर्व प्रकारच्या स्किन टोनसाठी उपयुक्त
  • कोणत्याही रंगाच्या डोळ्यांसाठी याच्या शेड्स वापरू शकता 

तोटे (Cons)

  • यामध्ये मॅट शेड्स उपलब्ध नाहीत
  • लहान पॅलेट आहे
  • पिगमेंटेशनसाठी उपयुक्त नाही 

MAC Eyeshadow X 9 Palette – मॅक आयशॅडो एक्स 9 पॅलेट

मॅक हा एक उत्कृष्ट भारतीय ब्रँड आहे. मिकी कॉन्ट्रॅक्टरचा हा ब्रँड सहसा ग्लॅमरस आणि ऑफिस लुकसाठी उपयुक्त ठरतो. मॅक आयशॅडो एक्स 9 पॅलेटमध्ये तुम्हाला नऊ वेगवेगळे रंग दिसून येतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हे आयशॅडो अगदी तुमच्या हाताच्या बोटांनीही लाऊ शकता. तुमचे डोळे हेजल अथवा हिरव्या रंगाचे असतील तर त्यासाठी हा उत्कृष्ट आयशॅडो पॅलेट ठरतो. पार्टी लुकसाठी परफेक्ट आहे. 

ADVERTISEMENT

फायदे (Pros)

  • पटकन ब्लेंड होते 
  • यामध्ये 4 शिमर आणि 5 मॅट शेड्स आहेत
  • प्रवास करताना पटकन घेऊन जाता येते
  • हलके आहे 
  • ब्रश नसल्यास, बोटांनीही लावता येते

तोटे (Cons)

  • सर्व स्किनटोन्स साठी उपलब्ध नाही
  • इतर ब्रँड्सच्या तुलनेत खूपच महाग

Faces Canada Ultimate Pro Eyeshadow Palette Nude 01 – फेसेस कॅनडा अल्टिमेट प्रो आयशॅडो पॅलेट

ज्या व्यक्ती आताच आयशॅडो लावायला शिकत आहेत त्यांच्यासाठी फेसेस कॅनडा अल्टिमेट प्रो आयशॅडो पॅलेट न्यूड 01 हे परफेक्ट आहे. सर्व डोळ्यांकरिता हे आयशॅडो असून यामध्ये शिमरी आणि मॅट अशा दोन्ही शेड्स उपलब्ध आहेत. त्यामुळे संपूर्ण दिवसभरात तुम्ही कधीही याचा उपयोग करून घेऊ शकता. आपण आयशॅडोमधून कलर आयलायनर तयार करा शकता तसंच वॉर्म आणि कूल या दोन्ही अंडरटोन्सकरिता याचा उपयोग होतो. जास्त काळ टिकणारे असून वापरायलाही सोपे आहे.

फायदे (Pros)

ADVERTISEMENT
  • पटकन ब्लेंड होते 
  • पिगमेंटेशनसाठी उत्तम 
  • क्रिमी आणि दोन्ही वेळेसाठी वापरता येते 
  • मॅट आणि शिमरी दोन्ही शेड्स समाविष्ट
  • सर्व शेड्सच्या डोळ्यांसाठी उपयुक्त 

तोटे (Cons)

  • सर्व स्किनटोन्स साठी उपलब्ध नाही
  • दर्जा चांगला असूनही सिमित उपलब्धता 

Lakme Absolute Illuminating Eyeshadow Palette – लॅक्मे अॅब्सोल्युट इल्युमिनेटिंग आयशॅडो पॅलेट

लॅक्मे अॅब्सोल्युटचे अजून एक आयशॅडो हे उत्तम आयशॅडोच्या यादीत येते. हे अतिशय सॉफ्ट असून याच्या शॅडोज या अगदी क्रिमी आणि पिगमेंटेशनसाठी उत्तम ठरतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे विस्कटत नाही आणि बराच काळ टिकून राहते. यामध्ये शिमर शेड्स असून स्मोकी लुकसाठी अप्रतिम ठरतात. तुम्हाला स्मोकी लुक हवा असेल तर याच्यासारखा उत्तम पर्याय नाही. या शेड्स वायब्रंट असून रोजच्या वापराप्रमाणेच तुम्हाला सणासुदीसाठीही उपयोगी ठरतात. 

फायदे (Pros)

  • 9 तासापेक्षा अधिक डोळ्यांवर टिकते 
  • अतिशय क्रिमी आणि लावण्यास सोपे
  • पटकन ब्लेंड होते 
  • खराब होत नाही 

तोटे (Cons)

ADVERTISEMENT
  • कमी शेड्स असून थोडे महाग आहे 
  • आकाराच्या तुलनेत पैसे जास्त आहेत 

Wet and Wild Colour Icon Eyeshadow – वेट अँड वाईल्ड कलर आयकॉन आयशॅडो

वेट अँड वाईल्ड हा ब्रँड आता बऱ्याच जणांचा आवडता होत चालला आहे. याचा दर्जा उत्तम असून प्रत्येकाच्या खिशाला परवड्याजोगे उत्पादन बाजारात आणले आहे. त्यामुळेच भारतातील उत्तम आयशॅडो पॅलेटपैकी एक जागा यालाही मिळाली आहे. वेगवेगळे लुक करण्यासाठी या आयशॅडो पॅलेटचा उपयोग करून घेता येतो. वॉर्म आणि कूल या दोन्ही अंडरटोन्ससाठी हे उपयोगी ठरते. कोणत्याही डोळ्यांच्या रंगासाठी यामध्ये रंग उपलब्ध आहेत. 

फायदे (Pros)

  • खिशाला परवडण्याजोगे
  • प्रवासात घेऊन जाणे सोपे
  • मॅट आणि शिमरी दोन्ही शेड्स उपलब्ध 
  • कोणत्याही स्किनटोन्ससाठी उपयोगी 

तोटे (Cons)

  • फॉलआऊट होतो 
  • लाईटर शेड्समध्ये फॉलआऊटची शक्यता जास्त 

Makeup Revolution The Brave Palette – मेकअप रिव्होल्युशन फॉर्च्युन फेव्हर्स दी ब्रेव्ह पॅलेट

अप्रतिम आयशॅडोची रेंज असल्यामुळे भारतातील उत्तम आयशॅडो पॅलेटमध्ये मेकअप रिव्होल्युश फॉर्च्युन फेव्हर्स दी ब्रेव्ह पॅलेटचे नाव घ्यावे लागते. पैसे दिल्यानंतर त्याची किंमत वसूल होणे म्हणजे नक्की काय हे यातून सिद्ध होते. यामध्ये 30 स्किनटोन्ससाठी शेड्स बनविण्यात आल्या असून शिमर आणि मॅट या दोन्ही शेड्स उपलब्ध आहेत. कोणत्याही डोळ्यांना आकर्षक बनविण्यासाठी याचा उपयोग करून घेता येतो. कोणत्याही लुकसाठी तुम्ही याचा वापर करून घेऊ शकता. 

ADVERTISEMENT

फायदे (Pros)

  • दिवस आणि रात्र कधीही वापरता येते 
  • पिगमेंटेशनसाठी उपयुक्त 
  • पटकन ब्लेंड होते आणि बराच काळ टिकते
  • प्रत्येक स्किनटोनसाठी उपयुक्त 
  • अनेक शेड्समध्ये उपलब्ध 

तोटे (Cons)

  • इतरांच्या तुलनेत महाग
  • याच्या शॅडोज पटकन स्मज होतात 
  • काही शेड्समध्ये फॉलआऊट होतो  

Huda Beauty Desert Dusk Eyeshadow Palette – हुडा ब्युटी डेझर्ट डस्क आयशॅडो पॅलेट

सर्वात जास्त प्रसिद्ध असणारे आणि महागडे असे आयशॅडो म्हणजे हुडा ब्युटी डेझर्ट डस्क आयशॅडो पॅलेट. कोणत्याही लुकसाठी याचा वापर करता येतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामध्ये एकदा गुंतवणूक करणे हे फायद्याचे ठरते. याचे फॉर्म्युलेशन उत्तम असून यामध्ये वेगवेगळ्या शेड्स उपलब्ध आहेत. तसंच यामुळे त्वचेवर कोणताही दुष्परिणाम होत नाही. 

फायदे (Pros)

ADVERTISEMENT
  • दिवस आणि रात्र कधीही वापरता येते
  • शिमर आणि मॅट दोन्ही शेड्समध्ये उपयुक्त 
  • पटकन ब्लेंड होते 
  • पिगमेंटेशनसाठी उपयुक्त असून क्रिमी 
  • जास्त काळ टिकते 

तोटे (Cons)

इतरांच्या तुलनेत खूपच महाग

NYX Professional Filter Palette – Rustic Antique – एनवायएक्स प्रोफेशनल मेकअप परफेक्ट फिल्टर पॅलेट

उच्च दर्जाचे उत्पादन असूनही बाजारात सर्व शेड्ससाठी उपलब्ध असणारे हे उत्पादन आहे. वॉर्म आणि कूल या दोन्ही अंडरटोन्ससाठी याचा उपयोग करून घेता येतो. अत्यंत क्रिमी आणि पटकन उपलब्ध होणारे हे आयशॅडो पॅलेट आहे. यामध्ये तुम्ही ऑफिसमध्ये जाण्यासाठी असो अथवा कार्यक्रमांसाठी असो कोणताही लुक करू शकता. 

फायदे (Pros)

ADVERTISEMENT
  • पटकन ब्लेंड होते आणि क्रिमी आहे
  • डोळ्यांना आकर्षक बनवते 
  • साधारण 8-9 तास टिकते 
  • सकाळपासून रात्रीपर्यंतच्या कोणत्याही लुकसाठी वापरता येते 
  • खिशाला परवडण्याजोगे 

तोटे (Cons)

पॅलेटचा आकार इतरांच्या तुलनेत मोठा असल्याने पटकन प्रवासात नेता येत नाही.

How To Choose Eyeshadow Palette In Marathi – आयशॅडो पॅलेट कसे निवडावे

आयशॅडो पॅलेट निवडताना नक्की काय डोक्यात असायला हवे हे महत्त्वाचे आहे. योग्य शेड्स तुम्हा अधिक आकर्षक आणि सुंदर बनवतात. तुम्ही जर काही टिप्स लक्षात ठेवल्यात तर तुम्हाला योग्य पॅलेट निवडणे कठीण होणार नाही. 

  • सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या डोळ्यांच्या रंग नक्की कोणता आहे आणि तुमच्या डोळ्याचा आकार कसा आहे यावरून आयशॅडो पॅलेट्सची निवड करावी 
  • बऱ्याच जणींचे डोळे गडद ब्राऊन असतात. आयशॅडोसाठी ब्राऊन रंगाचे डोळे हे उत्तम ठरतात. या डोळ्यांसाठी तुम्ही फॉरेस्ट ग्रीन, डीप नेव्ही ब्लू आणि ब्रिक रेड अशा स्वरूपातील रंग असणारे आयशॅडो पॅलेट्स निवडावे जे तुमच्या डोळ्यांना  अधिक सुंदर बनवतात
  • निळ्या आणि हिरव्या अर्थात घाऱ्या डोळ्यांसाठी तुम्ही कॉपर अथवा ब्राँझ स्वरूपाचे आयशॅडो पॅलेट निवडावे जेणेकरून तुमच्या डोळ्यांचा रंग अधिक उठून दिसेल
  • जेव्हा तुम्ही आयशॅडो पॅलेटची निवड करत असता तेव्हा तुमच्या त्वचेच्या रंगाला हे शोभून दिसते की नाही ते पाहणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्ही तुमच्या नसांचा रंग कोणता आहे त्यावरून ठरवू शकता. तुमच्या नसा जर हिरव्या दिसत असतील तर तुमची त्वचा ही वॉर्म आहे, जर निळ्याशार असतील तर तुम्ही बऱ्यापैकी कूल त्वचेचे आहे. त्यामुळे वॉर्म त्वचा असणाऱ्यांनी वॉर्म शेड्सचा वापर करावा आणि कूल असणाऱ्यांनी कूलर शेड्स निवडाव्या. 
  • डोळ्याची सावली वापरताना सामान्य चुका टाळा. तुम्हाला ऑफिसला जाण्यासाठी अथवा नेहमीच्य वापरासाठी निवडायचे असल्यास, न्यूट्रल टोन्सच्या आयशॅडो तुम्ही निवडू शकता. ज्या कोणत्याही ड्रेससह तुम्ही वापरू शकता. तुमच्या कोणत्याही स्टाईल्ससह या शेड्स मॅच करू शकतात
  • लग्न समारंभ, पार्टी अथवा सणासुदीला तुम्ही शिमरी अथवा मॅट या दोन्हीपैकी कोणत्याही आयशॅडो पॅलेटची निवड करा. कारण यावेळी तुम्हाला जास्त ग्लॅमरस आणि अधिक आकर्षक दिसायचं असतं. त्यामुळे थोडासा बोल्ड लुक मिळावा यासाठी तुम्ही या आयशॅडो पॅलेट्सची निवड करावी

प्रश्नोत्तरे (FAQ’s)

1. कोणते रिझोल्युशन पॅलेट उत्कृष्ट आहे?

ADVERTISEMENT

मेकअपसाठी रिझोल्युशन पॅलेट उत्कृष्ट आहे. उत्कृष्ट दर्जा आणि किंमतही किफायतशीर असल्याने तुम्ही याचा वापर करू शकता. बाजारामध्ये सर्वात जास्त वेगवेगळ्या ब्रँड्सचे पॅलेट्स आहेत. त्यापैकी मेकअप रिझोल्युशन लंडन सोफेक्स पॅलेट तुम्ही वापरू शकता. 

2. सुरूवात  करणाऱ्यांसाठी कोणते आयशॅडो पॅलेट उत्तम आहे?

ज्यांनी आताच आयशॅडो लावायला सुरूवात केली आहे त्यांच्यासाठी अनास्तिया बेव्हरली हिल्स सॉफ्ट ग्लॅम आयशॅडो पॅलेट हा उत्तम पर्याय आहे. 

3. सर्वात महागडे आयशॅडो पॅलेट कोणते आहे?

ADVERTISEMENT

आयशॅडोच्यादेखील वेगवेगळ्या किमती असतात. त्याच्या दर्जा आणि वापरानुसार त्याच्या किमती ठरवण्यात येतात. सर्वात महागडे आयशॅडो आहे नताशा डेनोना आयशॅडो पॅलेट 28 (Natasha Denona Eyeshadow Palette 28)

4. आयशॅडोचा वापर ब्लश म्हणून करता येऊ शकतो का?

तुम्ही कधीतरी आयशॅडोचा वापर ब्रश म्हणून अथवा अगदी हायलायटर म्हणूनही करू शकता. पण नियमित त्याचा वापर तसा करू नका. 

5. सर्वात उत्तम पिगमेंटेड आयशॅडो पॅलेट कोणते आहे?

ADVERTISEMENT

बाजारात बरेच ब्रँड्स उपलब्ध आहेत. मात्र त्यापैकी हुडा ब्युटी रोझ गोल्ड पॅलेट (HudaBeauty Rose Gold palette) हे उत्तम पिगमेंटेड आयशॅडो पॅलेट समजण्यात येते. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

10 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT