फेस्टिव्ह सीझन जवळ आला की सर्वच महिला फेशिअल अथवा क्लिन अप करणं पसंत करतात. फेशिअल आणि क्लिन अप हे आपल्या स्किन केअर रुटिनचा एक महत्त्वाचा भाग असतात. कारण यामुळे त्वचेतील घाण, धुळ, प्रदूषण, अतिरिक्त तेल, मेकअपचे कण खोलवर जाऊन स्वच्छ केले जातात. शिवाय क्रिम आणि सीरमचा मजास करून त्वचेला पोषण आणि आराम मिळेल याची काळजी घेतली जाते. थोडक्यात यामुळे त्वचेवर इंस्टंट ग्लो येतो आणि त्वचा टवटवीत दिसू लागते. मात्र या ब्युटी ट्रिटमेंट करण्यापूर्वी तुम्हाला फेशिअल आणि क्लिन अपमधील फरक आणि ते कोणत्या त्वचेसाठी गरजेचं आहे हे माहीत असायला हवं. यासाठीच जाणून घ्या याबाबत सविस्तर माहीती.
फेशिअल म्हणजे काय ?
फेशिअल ही त्वचेची निगा राखण्यासाठी केली जाणारी एक ब्युटी ट्रिटमेंट असते. ज्यामध्ये तुमच्या त्वचेला मुळापासून स्वच्छ केलं जातं, स्क्रबने एक्स्फोलिएट केलं जातं, स्टीम देऊन त्वचेतील घाण बाहेर काढली जाते, मसाज आणि सीरमने त्वचेला पोषण दिलं जातं, फेसमास्क आणि फेसपॅकने त्वचेला थंडावा देत पूर्ववत केलं जातं. फेशिअलमध्ये निरनिराळे प्रकार असतात ज्यानुसार क्लिंझिंग,एक्स्फोलिएटेशन,स्टिमिंग,मसाज आणि फेसपॅक या स्टेप्स केल्या जातात. ज्यामुळे तुमची त्वचा पूर्ववत आणि तजेलदार होण्यास मदत होते. पंचविशी आणि तिशीनंतर महिन्यातून एकदा त्वचेला फेशिअल करणं खूप गरजेचं असतं. कारण वाढणाऱ्या वयासोबत निर्माण झालेल्या त्वचेच्या समस्या यामुळे कमी होतात. जर तुमची त्वचा खूप ड्राय असेल तर वापरा हे कोरड्या त्वचेसाठी बेस्ट फेशिअल किट
Shutterstock
क्लिन- अप म्हणजे काय ?
क्लिन – अप ही ब्युटी ट्रिटमेंट अगदी साधी आणि सोपी असून ती तुम्ही दर दोन ते तीन आठवड्यांनी त्वचा क्लिन – अप करू शकता. नावाप्रमाणेच यात त्वचा स्वच्छ करण्यावर अधिक भर दिला जातो. कमी खर्चिक आणि वेळदेखील कमी लागत असल्यामुळे बऱ्याचदा फेशिअलपेक्षा क्लिन- अप करणंच महिला पसंत करतात. मात्र तुम्ही क्लिन अप करावं की नाही हे तुमच्या त्वचेच्या प्रकारावर अवलंबून आहे. क्लिन अप साठी क्लिंझिंग, एक्स्फोलिएटिंग आणि स्टिमिंग या स्टेप्स केल्या जातात. तरूण मुलींनी नियमित क्लिन अप करण्यास काहीच हरकत नाही.
Shutterstock
क्लिन अप चांगले की फेशिअल –
क्लिन अप आणि फेशिअल म्हणजे काय हे एव्हाना तुमच्या लक्षात आलंच असेल. त्यामुळे यापैकी कोणती ब्युटी ट्रिटमेंट करायची ते तुम्ही तुमच्या त्वचेच्या समस्या आणि त्यासाठी खर्चावा लागणारा वेळ, पैसा यावरून ठरवू शकता. मात्र जर तुम्हाला त्वचेच्या अनेक समस्या दूर करायच्या असतील तर योग्य ट्रिटमेंट देणारं फेशिअलच यासाठी निवडा. कारण क्लिन अप मुळे फक्त तुमची त्वचा स्वच्छ होईल पण त्वचेच्या समस्या दूर होतीलच असं नाही. आधीच सांगितल्या प्रमाणे किशोरवयीन मुलींनी क्लिनअपचा पर्याय निवडावा आणि पंचविशी आणि तिशीच्या पुढील महिलांनी फेशिअल करावे. कारण यामुळे वाढत्या वयानुसार त्वचेत बदल झाल्यामुळे होणाऱ्या समस्या नक्कीच कमी व्हायला मदत होईल. पण कोणती ब्युटी ट्रिटमेंट तुमच्यासाठी बेस्ट आहे हे तुम्हाला तुमच्या ब्युटी एक्पर्टचं योग्य पद्धतीने सांगू शकतील. कारण कोणतीही ब्युटी ट्रिटमेंट करण्याआधी ब्युटी एक्पर्ट त्वचेचं परिक्षण करतात आणि त्यानुसारच तुम्हाला ट्रिटमेंट करण्याचा सल्ला देत असतात.
फेस्टिव्ह सीझनसाठी फेशिअल अथवा क्लिन अप करून तयार झाल्यावर मेकअपसाठी वापरा मायग्लॅमचे हे ब्युटी प्रॉडक्ट
फोटोसौजन्य – शटरस्टॉक
अधिक वाचा –
ऑक्सिजन फेशिअलचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का