ADVERTISEMENT
home / त्वचेची काळजी
कोरोनाच्या काळात स्पा अथवा पार्लरमध्ये जाताना अशी घ्या स्वतःची काळजी

कोरोनाच्या काळात स्पा अथवा पार्लरमध्ये जाताना अशी घ्या स्वतःची काळजी

कोरोनामुळे करण्यात आलेला लॉकडाऊन आता हळूहळू कमी करण्यात येत आहे. त्यामुळे जनजीवन पुन्हा एकदा नव्याने सुरू होत आहे. लॉकडाऊन संपला तरी कोरोनाचा धोका आजही कायम आहे. जोपर्यंत कोरोनावर लस निर्माण होत नाही तोपर्यंत प्रत्येकाने कोरोनापासून वाचण्यासाठी योग्य ती काळजी घ्यायलाच हवी. जर तुम्ही या काळात पार्लर अथवा स्पामध्ये जाणार असाल तर नेमकी कशी काळजी घ्यावी हे अवश्य वाचा. लॉकडाऊन हळू हळू कमी करत आता मॉल, पार्लर अशा अनेक गोष्टी सुरळीत सुरू झालेल्या आहेत. लवकरच शाळा, कॉलेज, ऑफिस, बिझनेस, वेकेशन अशा गोष्टींसाठी पूर्वीप्रमाणे प्रवासालाही सुरूवात होईल. इतके दिवस घरातच असल्यामुळे पार्लर आणि स्पामध्ये जाण्याची फार गरज वाटत नव्हती. मात्र आता कामानिमित्त घराबाहेर जायचं म्हणजे पार्लरमध्ये जाणंही ओघाने आलंच. जर तुम्ही या काळात त्वचा, केसांची  काळजी घेण्यासाठी पार्लर, स्पामध्ये जाणार असाल तर काही गोष्टी जरूर लक्षात ठेवा. 

पार्लर अथवा स्पामध्ये अशी घ्या स्वतःची काळजी –

  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरातून बाहेर पडताना तोंडावर मास्क लावा.
  • वेळोवेळी स्वतःचे हात सॅनिटाईझ करा,यासाठी छोटीशी सॅनिटाईझरची बाटली तुमच्याजवळच ठेवा.
  • पार्लर, स्पाची सुविधा देणाऱ्या अनेक अॅपवर ते देत असलेल्या सुरक्षा आणि सेवेची माहिती दिलेली असते ती काळजीपूर्वक वाचा. 
  • घरी येऊन सर्व्हिस देणाऱ्या ब्युटी अॅपवरून सेवा घेणार असाल तर तिथेदेखील ते घरी आल्यावर सुरक्षेची काय काळजी घेणार ते आधी वाचा.
  • पार्लरमध्ये देण्यात येणारे पीपीई किट अवश्य विकत घ्या कारण ते तुमच्या सुरक्षेसाठीच आहे.
  • जर तुमच्या पार्लरमध्ये पीपीई किट देण्याची सोय नसेल तर ट्रिटमेंट सुरू असताना बोलताना तोंडावरचा मास्क काढू नका.
  • पार्लरमधील कोणत्याही वस्तूला हात लावू नका,जर तुम्हाला एखाद्या गोष्टीला हात लावण्याची गरज असेल तर त्यानंतर हात सॅनिटाईझ करा अथवा ग्लोव्हज वापरा.
  • अशाच पार्लर अथवा स्पाची निवड करा जिथे सुरक्षेची काळजी घेतली जाते.
  • पार्लरची सेवा तुम्हाला देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पीपीई किट, फेस शील्ड, ग्लोव्हज वापरले आहे का ते अवश्य तपासा.
  • गर्दी कमी असेल अशा वेळीच पार्लर अथवा स्पामध्ये जा. 
  • अपॉईंटमेंट शिवाय पार्लरमध्ये जाणे टाळा नाहीतर तुम्हाला फार काळ पार्लरमध्ये बसून राहावं लागेल. 
  • हेअर स्पा, हेअर कट करताना पार्लरमध्ये वापरण्यात येणारे टूल्स हाताळू नका.
  • पार्लरमध्ये वापरण्यात येणारे, टॉवेल, वॅक्स स्ट्रिप्स डिस्पोजेबल आहेत का हे आधीच विचारून घ्या.
  • पार्लरमधील इतर लोकांसोबत जास्त मिसळू नका, गप्पा मारू नका. 
  • पार्लरमधून बाहेर पडल्यावर मास्क अथवा  स्कार्फने पूर्ण चेहरा झाका आणि मगच घरी जा. 
  • घरी गेल्यावर गरम पाण्याने अंघोळ करणे, कपडे स्वच्छ धुणे,  गरम पाण्याची वाफ घेणे, कोमट पाणी पिणे हे घरगुती उपचार अवश्य करा.

या टिप्स फॉलो करा आणि स्वतःला सुरक्षित आणि सॅनिटाईझ ठेवण्यासाठी चांगल्या सॅनिटाइझर आणि स्किन प्रॉडक्टचा वापर करा. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

ADVERTISEMENT

प्रतिकार शक्ती कमी आहे हे ओळखण्याची लक्षणे (Signs Of A Weak Immune System In Marathi)

प्रतिकार शक्ती वाढवणारा आयुर्वेदिक काढा रेसिपी (Immunity Boosting Kadha Recipe In Marathi)

टॅन व्हायचं नसेल तर असं लावा सनस्क्रिन, जाणून घ्या योग्य पद्धत

13 Oct 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT