बाहेरचं वातावरण पाहता सध्या 10 पैकी 8 जणांना तरी सर्दी अगदी हमखास झालेली दिसते. काहींचा सर्दीचा त्रास हा कायमचा असतो. पण काहींना मात्र वातावरण बदलले की हमखास हा त्रास होऊ लागतो. वाहतं नाक, चाेंदलेलं नाक या सगळ्यामुळेच रात्री अंग टेकवलं की खूप त्रास होऊ लागतो. एकदा सर्दी झाली की ती किमान चार दिवस आणि जास्तीत जास्त आठवडा आणि काहींना त्याहून अधिक काळासाठी छळते. सर्दी झाल्यानंतर काही हमखास घरगुती इलाज करायचे असतील तर काही गृहिणींकडून आम्ही हमखास उपयोगी पडतील असे घरगुती उपाय जाणून घेतले आहेत. चला जाणून घेऊया हे घरगुती उपाय.
गुलाबी थंडीत तुमचेही पाय पडतात का थंड
वाफ घेणे
अनेकांना सर्दी ही वरच्या वर होते. नाक चोंदलं की, नाकपुड्या बंद होतात. हा त्रास होऊ नये म्हणून वाफ घेणे हा उत्तम पर्याय आहे. पाण्यामध्ये बाम किंवा कापूर घालावा. टॉवेल अंगावर घेऊन त्याची वाफ नाक, छाती, घशाजवळ घ्यावी. वाफेमुळे चोंदलेले नाक उघडण्यास मदत मिळते. रात्री झोपताना तुम्ही वाफ घेतली तर त्याचा अधिक फायदा तुम्हाला होऊ शकतो.
मीठाचा शेक
मीठाचा शेक हा देखील सर्दीसाठी फारच उपयुक्त आहे असे अनेकांचे म्हणणे आहे. तव्यावर मीठ गरम करुन गरम झालेल्यां मीठावर रुमालाची पुरचुंडी ठेवावी. गरम रुमालाचा शेक नाक, घसा, छातीला द्यावा. यामुळे तुमची सर्दी नियंत्रणात येते. सर्दीमुळे होणारे इतर त्रास कमी होण्यास मदत मिळते. असे दिवसातून किमान दोनदा तरी करा.तुम्हाला नक्की फरक जाणवेल.
वातावरण बदलामुळे आलेल्या थंडीत होणाऱ्या त्रासावर असा करा इटपट इलाज
निलगिरीचा वास
सर्दी झाल्यानंतर बाम किंवा एखाद्या ऑईनमेंटचा वास घेतल्यानंतर फार बरे वाटते. पण हा आराम तकाही काळासाठीच असतो. जर तुम्हाला दीर्घकाळासाठी उपाय हवा असेल तर तुम्ही निलगिरीचा उपयोग करु शकता. एका कपड्यात निलगिरी तेल घ्या . त्याचा वास जेव्हा जेव्हा नाक चोंदलेले वाटेल त्यावेळी घेत राहा. सर्दी पातळ होत असेल तर ती योग्य वेळी शिंकरुन काढायला विसरु नका. त्यामुळेही तुम्हाला आराम मिळतो.
नाकात तूप टाकणे
नाकात तूप टाकणे किंवा नस्य तेलाचा वापर हा आयुर्वेदिक उपचारांमध्ये केला जातो. नाकात तेल किंवा तूप टाकल्यामुळे नाकामध्ये धूळ किंवा माती जात नाही. ज्यांना धुळीच्या अॅलर्जीमुळेही सर्दी होते. तुम्हालाही असे होत असेल तर तुमच्यासाठी नस्य तेल किंवा तूप वरदान आहे. कारण त्यामुळे तुमच्या नाकात धूळ आणि माती चिकटत नाही. साहजिकच सर्दीचा त्रास होत नाही.
पावसाळ्यात हे घरगुती उपाय करून आजारपण ठेवा दूर
ओव्याची धुरी घेणे
ओव्याची धुरी ही आतापर्यंत लहान बाळांना किंवा पोटदुखीसाठी फायदेशीर असल्याचे तुम्ही वाचले असेल पण ओव्याची धुरीही सर्दीसाठीही फारच फायदेशीर आहे. तव्यावर ओवा गरम करुन त्याची वाफ घ्या. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. ओव्याची धुरी घेताना ती तोंडावाटून आत घ्या म्हणजे घसा दुखी किंवा इतर काही त्रासही कमी होण्यास मदत मिळेल.
आता सर्दी झाली तर हे काही घरगुती इलाज नक्की ट्राय करा. तुम्हाला आराम मिळेल.