चमचमीत, चटपटीत आणि मसालेदार असे जेवण अनेकांना खायला आवडते. रोज डब्यात किंवा दोन वेळच्या जेवणात जर असे पदार्थ मिळाले तर अनेकांना दिवस सुफळ संपूर्ण झाल्यासारखे वाटते. जेवणाचा स्वाद अधिक वाढवणारे मसाले.. अख्ख्या खड्या मसाल्यांपासून तयार होतात. पण अख्खा खडा मसाला घातला की, त्याची चव अधिक जास्त वाढते असे अनेकांना वाटते. म्हणूनच अनेक जण आहारात अख्खा खडा मसाला अगदी आवर्जून वापरतात. तमालपत्र, मिरी, लवंग,मोठी वेलची, हिरवी वेलची, दालचिनी, बडिशेप असे अनेक पदार्थ घातले जातात. पण अति खड मसाला किेंवा गरम मसाला खाणे आरोग्यासाठी चांगले आहे का? त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो का? हे जाणून घेऊया.
वर्षभराचा मसाला करण्याआधी लक्षात घ्या महत्त्वपूर्ण गोष्टी
गरम मसाल्याचे सेवन
भारतीय जेवण हे जगातील जेवणाच्या तुलनेत फारच वेगळे आहे. वेगवेगळ्या चवीचे आणि वेगवेगळ्या पद्धतीचे भारतीय जेवण बनवले जाते. या जेवणामध्ये चव वाढवण्यासाठी वेगवेगळे मसाले वापरले जातात. हे मसाले आरोग्यासाठी चांगले असले तरी देखील त्याचा अतिरेक हा आरोग्यासाठी काही बाबतीत हानिकारक असतो.
फोड येणे
प्रत्येकाची शरीर प्रकृती ही वेगळी असते. गरम मसाल्याचे अति सेवन हे शरीरासाठी अशापद्धतीने हानिकारक ठरते. गरम मसाल्याचे पदार्थ शरीरामध्ये उष्णता निर्माण करते. शरीराला एका ठराविक क्षमतेपर्यंत उष्णता सहन करण्यासारखी असते. पण त्यानंतर मात्र त्याचा त्रास होऊ लागतो. शरीरावर मोठे फोड येऊ लागतात. असे फोड तुम्हाला सतत येत असतील तर तुमच्या आहारात गरम मसाल्याचा वापर वाढला असे समजावे.
अॅसिडीटी
अॅसिडीटी होण्याची अनेक कारणं असतील. पण जड आणि पचण्यास कठीण अशा पदार्थांचे सेवन केल्यामुळेही अपचनाचा त्रास येऊ होऊ शकतो. गरम मसाल्याचे पदार्थ अर्थात बिर्याणी,पुलाव, छोले मसाला, पनीरची ग्रेव्ही अशा भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खडा मसाला असतो. हे पदार्थ पचायला फार जड असतात. हे पदार्थ खाल्ल्यानंतर तुम्हाला जर सतत अपचनाचा त्रास होत असेल तर मात्र तुम्हाला हा त्रास सतत जाणवत राहतो.
तुम्हाला चहा आवडतो का, मग मसाला चहाचे हे आरोग्यदायी फायदे जरूर वाचा
लघवीला जळजळणे
शरीरातील उष्णता वाढली की होणारा आणखी एक त्रास म्हणजे लघवीला जाताना जळजळणे. लघवीला गेल्यानंतर तुम्हाला हा त्रास सतत होत असेल तर तुम्ही गरम मसाल्याचे सेवन कमी करा. वयोमानानुसार जर तुम्हाला लघवीचा त्रास होत असेल तर तुम्हाला काही पथ्य पाळणे गरजेचे असते. जर तुम्हाला वयपरत्वे असा त्रास सुरु झाला असेल तर तुमच्या आहारात काळीमिरी, लवंग किंवा दालचिनी अशा पदार्थांचे सेवन खूप जास्त केले जात आहे हे समजून जावे.
ह्रदयरोगासाठी कारणीभूत
गरम मसाल्यामध्ये मोठ्या प्रहमाणात सोडियम असते. आहारात जर जास्त प्रमाणात सोडियम असेल तर तुम्हाला रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता असते.जर तुम्हाला ह्रदयरोगासंदर्भात काही त्रास असेल तर तुम्ही गरम मसाल्याचे सेवन टाळायला हवे.
गरम मसाला आहारात असण्याचे अनेक फायदे असले तरी देखील त्याचा अति वापर शरीरासाठी घातक ठरु शकतो. त्यामुळे गरम मसाल्याचे नुकसानही विचारात घ्यायला हवेत.
अशा पद्धतीने तयारी केलीत तर तुमची बिर्याणी नेहमीच होईल बेस्ट