सोन्यासारखी सतेज कांती आपल्या सगळ्यांना हवी असते. सोनं जसं चमकतं तसा चेहरा चमकावा असे कोणाला वाटणार नाही. फार पूर्वीच्या काळी सोन्याचा उपयोग हा कांती उजळवण्यासाठी केला जाई.राणी- महाराणी त्यांच्या ब्युटी रेजिममध्ये याचा समावेश करत असतं. असे अनेक दाखल्यादाखळ सिद्धही झाले आहे की, सोन्याचा वापर त्याचे पाणी करुन आणि त्यामध्ये आणखी काही घटक घालून केल्यामुळेच पूर्वीच्या राणी- महाराणी सुंदर आणि उठून दिसत. पण आता सोन्याचा भाव हा कायम इतका चढा असतो की, त्याचा प्रत्यक्ष उपयोग त्वचेसाठी करणे आता कोणत्याही श्रीमंत व्यक्तीलाही शक्य नाही. पण आता सोन्याचा प्रत्यक्ष वापर करता येत नाही. मग सोन्यासारखा उजळपणा कसा मिळवायचा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर जाणून घ्या सोन्याचा वापर आणि त्याचे फायदे.
ऑक्सिजन फेशिअलचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का
24 कॅरेट सोन्याचा असा करा उपयोग
24 कॅरेट सोन्याचे घटक असलेले अनेक प्रोडक्ट हल्ली बाजारात अगदी सहज मिळतात. त्याचा उपयोग करणेही फार सोपे असते. फेस पॅक, फेस मास्क, टोनर, क्रिम अशा अनेक ब्युटी प्रोडक्टमध्ये सोन्याचे घटक असतात. तुम्ही कोणते प्रोडक्ट निवडता त्यानुसार त्याचा वापर अवलंबून असतो.
- जर तुम्ही गोल्ड फेशिअलचा उपयोग करायचे ठरवले असेल तर तुम्हाला यामध्ये सगळे काही गोल्डचे मिळते. यामध्ये मिळणारा गोल्डचे स्क्रब आणि पॅक चेहऱ्याला तजेला आणण्याचे काम करते.
- गोल्ड फेशिअल व्यतिरिक्त तुम्हाला गोल्ड क्रिम असाही प्रकार मिळतो. ज्याच्या वापरामुळे तुमची त्वचा अधिक चांगली होण्यास मदत मिळते.
- जर तुम्ही टोनरचा प्रयोग करणार असाल तर त्याचा वापर करणे फारच सोपे आहे. तुम्हाला दिवसातून दोनवेळा चेहऱ्याला हे टोनर लावायचे आहे. याच्या प्रयोगामुळे तुमचा चेहरा अधिक चांगला आणि तरुण दिसेल.
- गोल्ड फेस पॅकही चेहऱ्यासाठी फारच उत्तम असतो. गोल्ड मास्कच्या प्रयोगाने तुमच्या त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते. त्यामुळे तुम्ही याचा वापर करायलाच हवा.
फेशिअलपेक्षाही जास्त ग्लो आणतील या बजेट ‘Skin treatments’
सोन्याचे त्वचेसाठी असलेले सोनेरी फायदे
- त्वचेची इलास्टिसिटी वाढवते त्वचेवरील डाग कमी करण्यास मदत करते
- त्वचेचा कोरडेपणा दूर करुन त्वचेला मॉईश्चर पुरवण्याचे काम गोल्ड म्हणजेच सोन्याचे घटक करतात.
- त्वचेवर एक सुरक्षा कवच तयार करुन त्वचेचे उन्हापासून संरक्षण करतात.
- त्वचेवर येणाऱ्या पुळ्या, पिंपल्स आणि इतर त्रासांपासून मुक्त करत त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करते.
- त्वचा अधिक आकर्षक करत तिचे तारुण्य टिकवण्यास मदत करते. त्यामुळे त्वचा अधिक हेल्दी दिसते.
- त्वचेखाली असलेले कोलॅजन वाढवण्याचे काम सोन्याचे घटक करतात. त्यामुळे त्वचा अधिक चांगली दिसते.
आता सोन्याचा अशा पद्धतीने उपयोग करुन त्वचा करा अधिक सुंदर
हायड्रेटिंग फेशिअल करेल तुमची त्वचा परफेक्ट (Hydrating Facial For Skin In Marathi)