रात्री झोपताना आपण बऱ्याचदा विचार करतो की सकाळी उठल्यावर काय खायचं आहे. कारण सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी (What to eat Empty stomach) काहीही खाऊन चालत नाही. सकाळी उठल्यानंतर साधारण आठ तासापेक्षा अधिक वेळ आपण उपाशी असतो. तसंच सकाळची वेळ अशी असते जेव्हा शरीराला पूर्ण पोषण मिळणे आवश्यक असते. बऱ्याचदा सकाळच्या घाईगडबडीत नाश्ताही नीट करायला मिळत नाही. पण याचा परिणाम शरीरावर अधिक वाईट होतो. सकाळी उठल्यानंतर काय खाणं योग्य आहे असा प्रश्न तुम्हालाही सतत पडत असेल तर आम्ही तुमची ही समस्या दूर करतो. उपाशीपोटी हे पदार्थ खाल्ल्यानंतर तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही आणि तुम्हाला योग्य पोषणही मिळेल.
आयुर्वेदानुसार, दात न घासता तुम्ही सकाळी उठल्या उठल्या गूळ खाल्ला तर त्याचा फायदा होतो. गुळासह कोमट पाणी असेल तर अतिउत्तम. .यामुळे तुमच्या शरीराला योग्य पोषण मिळते आणि तुमच्या शरीरातील ऊर्जा दिवसभर टिकून राहाते. यामुळे रक्तप्रवाह चांगला होतो. तसेच अनेक आजारांपासून दूर ठेवते. तुम्हाला अॅसिडिटीचा त्रास असेल तर तुम्ही रोज सकाळी हा प्रयोग करून नक्की पाहा.
भिजवलेले चणे हे बदामाच्या तुलनेत अधिक पोषक तत्व असते. तसंच महिलांसाठी प्रोटीन, फायबर, खनिज आणि विटामिनचा सर्वात चांगला स्रोत आहे. दिवासाची सुरूवात तुम्ही भिजवलेले चणे खाऊन केली तर दिवसभर थकवा येत नाही. एका शोधानुसार, जर तुम्ही रोज एक मूठ भिजलेले चणे मध अथवा गुळासह खाल्ले तर तुमची प्रजनन क्षमता वाढविण्यासही हे उत्तम ठरते. मीठाचा वापर न करत तुम्ही चणे खाल्ले तर तुमच्या त्वचेसााठीही हे फायदेशीर आहे. तुमची त्वचा अधिक चमकदार होण्यास मदत होते.
सकाळी उठून उपाशीपोटी बेदाणे खाल्ल्याने जास्त फायदा होतो. त्यातही रात्रभर भिजवून ठेवलेले बेदाणे असतील तर तुम्हाला दिवसभर चांगली ऊर्जा मिळते. तसंच यामध्ये असणारे पोषक तत्व तुमच्या शरीराला आवश्यक असतात. बेदाण्यांमुळे तुमची त्वचाही चमकदार होते.
दुधामध्ये प्रोटीन असते आणि रोज दूध प्यायल्याने तुमची स्मरणशक्ती चांगली राहण्यास मदत मिळते. दूध एक एनर्जी बुस्टर असून आपली त्वचा, केस आणि हाडांसाठी अतिशय फायदेशीर ठरते. सकाळी उठून उपाशीपोटी तुम्ही एक ग्लास दूध प्यायल्यास, तुम्ही कमी आजारी पडता. विशेषतः गरोदर असणाऱ्या महिलांसाठी आणि आई झालेल्या महिलांसाठी हे अधिक उपयुक्त ठरते.
सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होते. पचनक्रियेवर हा रामबाण इलाज आहे. तुमचे पोट फुगत असेल तर त्यासाठी तुम्हाला फायदा मिळतो. सकाळी रिकाम्या पोटी तुम्ही कच्ची लसूण खा आणि शरीराला त्याचा फायदा होऊन हार्टअटॅकचा धोका कमी होतो. पुरूषांना कच्ची लसूण खाऊन सेक्स करण्याची शक्ती वाढते. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी तुम्ही लसूण खाण्याचा फायदा होतो.
सकाळी उठून भिजवलेले बदाम खा. यामध्ये प्रोटीन, ओमेगा 3 फॅटी अॅसिड, विटामिन ई, कॅल्शियम इत्यादीप्रमाणे पोषक तत्व असते. जेव्हा बदाम खाल्ले जातात तेव्हा ते सोलून खायला हवेत. सकाळी डाएटमध्ये बदामाचा समावेश करून घेतला तर दिवसभर अंगात ऊर्जा राहते. तसंच अनेक आजारांपासून वाचवते.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक