आपले केस घनदाट आणि बाऊंसी असावेत असं प्रत्येकीला वाटत असतं. बऱ्याचदा लहाणपणी अथवा तरूणपणापर्यंत अनेकींचे केस असे सुंदर असतातही. मात्र जस जसं वय वाढत जातं तस तशी केसांची दुर्दशा होऊ लागते.केसांच्या समस्या, केस गळणे यामागे अनेक कारणे असू शकतात. मात्र योग्य काळजी घेतली तर आयुष्यभर केस सुंदर दिसू शकतात. मात्र अभिनेत्री डिंपल कपाडियाची वयाची साठी उलटूनही तिचे केस आजही तरूणपणीसारखेच सुंदर आणि घनदाट आहेत.डिंपल कपाडियासारखे घनदाट केस हवे असतील तर त्या आधी जाणून घ्या काय आहे या सुंदर केसांमागचं रहस्य
केसांच्या आरोग्यासाठी आहार महत्त्वाचा आहे हे तर तुम्ही नक्कीच ऐकलं असेल पण डिंपलच्या केसांकडे पाहून या गोष्टीवर शिक्कामोर्तब होतं. कारण डिंपल तिच्या आहाराबाबत खूपच जागरूक आहे. ती यासाठी आहारात जास्तीत जास्त लोह आणि व्हिटॅमिन ई असेल याची काळजी घेते. ज्यामुळे तिचे केस या वयातही इतके सुंदर आणि बाऊन्सी आहेत.
केसांच्या आरोग्यासाठी हेअर मसाज एक वरदानच आहे. नियमित केसांना हेअर ऑईलने मसाज केल्यामुळे केसांची मुळं मजबूत होतात. ज्याचा परिणाम तुमच्या केसांच्या घनतेवरही दिसून येतो. डिंपल कपाडिया तिच्या केसांना आठवड्यातून दोनदा हेअर मसाज करते. जर तुमचे केस खूप गळत असतील तर नारळाचे तेल कोमट करा आणि त्या तेलाने केसांच्या मुळांना हलक्या हाताने मसाज करा. काही दिवसांमध्येच तुमच्या केसांचे गळणे कमी झाल्याचे तुमच्या लक्षात येईल. मात्र त्यासाठी आठवड्यातून दोनदा हा उपाय करायला हवा ज्यामुळे तुमचे केसही असेच घनदाट होऊ शकतील.
केसांना चमकदार आणि मजबूत करण्यासाठी केसांवर सतत महागड्या ट्रिटमेंटच करायला हव्या असं मुळीच नाही. तुम्ही तुमच्या केसांवर घरगुती हेअर मास्कनेही उपचार करू शकता. अंडी, दही, कोरफड, मेथी अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा वापर करून डिंपल तिच्या केसांना सुंदर आणि चमकदार ठेवते. यापैकी ती वापरत असलेला दही आणि तुरटीचा मास्क तिच्या स्काल्पसाठी चांगला असल्याचं तिचं म्हणणं आहे.
केसांना निरोगी ठेवण्यासाठी हा एक उपाय बेस्ट आहे. डिंपल तिचे केस दिवसभरात दोन ते तीन वेळा विंचरते. ज्यामुळे केसांच्या मुळांचे ब्लड सर्क्युलेशन सुधारते आणि केसांवर नैसर्गिक ग्लो येतो. मात्र यासाठी ती कडूलिंबाच्या लाकडापासून बनवलेला कंगवा वापरते.
केस आणि त्वचा हायड्रेट राहण्यासाठी नियमित पाणी पिणं खूप आवश्यक आहे. कारण शरीरात पाण्याची कमतरता झाली तर त्याचा परिणाम तुमच्या त्वचा आणि केसांवर दिसू लागतो. यासाठी दिवसभरात कमीत कमी आठ ते दहा ग्लास पाणी पिण्यावर डिंपल लक्ष देते. त्याचप्रमाणे वेळच्या वेळी जेवणे, पुरेशी झोप, जंकफूड आणि मसालेदार पदार्थ न खाणे अशा अनेक आहाराबाबत गोष्टी ती पाळते.
डिंपल कपाडियाप्रमाणे घनदाट केस हवे तर ट्राय करा हे हेअर केअर
फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम
अधिक वाचा -
हिटचा वापर करुन केस कुरळे करत असाल तर अशी घ्या काळजी