ADVERTISEMENT
home / Natural Care
…तर तुम्हाला नाही फेशिअलची गरज

…तर तुम्हाला नाही फेशिअलची गरज

चेहऱ्यासाठी फेशिअल हे फारच महत्वाचे आहे. हे आपण जाणतोच. एका ठराविक वयानंतर फेशिअल करणे हे अगदी अनिवार्य असते. फेशिअल हे कितीही फायदेशीर असले तरी देखील तुमच्या त्वचेला फेशिअलची खरंच गरज आहे का? हा प्रश्न तुम्ही तुमच्या त्वचेला विचारला आहे का? नसेल विचारला तर तुम्ही आताच तुमच्या त्वचेला हा प्रश्न विचारा. तुम्हाला फेशिअलची गरज नाही हे तुम्ही कसे ओळखाल? चला जाणून घेऊया ही महत्वाची माहिती

फेशिअल आणि क्लिन अपमध्ये नेमका काय आहे फरक

फेशिअल का केले जाते ?

Instagram

ADVERTISEMENT

त्वचेवरील मृत त्वचा काढून त्वचेला तजेला देण्यासाठी फेशिअल केले जाते. वयाच्या तिशीनंतर किंवा काहींचा त्या आधी तजेला कमी होऊ लागते. त्वचा सुरकुतु लागते. त्वचेवर वार्धक्याच्या खुणा वाढू लागतात. त्यावेळी त्यांना थोडा लगाम घालण्यासाठी फेशिअल करतात. फेशिअल केल्यामुळे त्वचेच्या पोअर्समध्ये अडकलेली घाण स्वच्छ करुन पोअर्स कमी करण्यास मदत होते. शिवाय यामध्ये असलेला मसाज हा त्वचेवरील सुरकुत्यांन कमी करण्याचे काम करतो.  अर्थात फेशिअल हे वार्धक्याच्या खुणा कमी करण्यासाठी आणि त्वचेचा ग्लो वाढवण्यासाठी केले जाते. 

फेशिअलपेक्षाही जास्त ग्लो आणतील या बजेट ‘Skin treatments’

तुम्हाला आहे का फेशिअलची गरज

फेशिअलची गरज

Instagram

ADVERTISEMENT
  • तुमची त्वचा सुरकुतलेली किंवा डल दिसत असेल तर तुम्हाला फेशिअलची आहे गरज. कारण फेशिअल करताना केला जाणारा मसाज आणि स्क्रब यामुळे त्वचा आतून स्वच्छ होते. त्वचेवरील थकवा देखील दूर होतो. त्यामुळे त्वचेची ही समस्या असणाऱ्यांनी फेशिअल करावे. 
  • त्वचा रिलॅक्स करायची असेल आणि रोजच्या धकाधकीपासून तुम्हाला थोडासा आराम हवा असेल त्याकरता तुम्ही मसाज म्हणून फेशिअल करण्याचा विचार करत असाल तरी काही हरकत नाही. फक्त फेशिअल निवडताना मसाज किंवा रिलॅक्सिंग कशामध्ये अधिक केले जाईल हे जाणून घेत तुमचे फेशिअल निवडा. त्यामुळे तुम्हाला त्याचा अधिक फायदा मिळेल.
  • अनेकांना पिंपल्सचा त्रास असतो हा त्रास बहुतेकवेळा अस्वच्छतेमुळेही होतो. जर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने जर पिंपल्ससाठी काही फेशिअल करत असाल तर तुम्हाला असे फेशिअल करण्यास काहीच हरकत नाही. 
  • काही जण फक्त सणांच्याप्रसंगी फेशिअल करतात. सणांच्या दिवसात किंवा काही खास खासगी कार्यक्रमांना असा ग्लो अपेक्षित असतो. अशांनी फक्त त्या कालावधीसाठी फेशिअल केले तर चालू शकते. 
  • तुम्ही तिशी पार करुनही तुमची त्वचा जर चांगली असेल. तुम्हाला पोअर्स किंवा सुरकुत्या नसतील तर तुम्हाला फेशिअल करण्याची फारशी गरज नाही. कारण तुमचा उत्तम आहार, अनुवंशिकता तुमच्या चेहऱ्याला टिकवून ठेवण्यास मदत करते. त्यामुळे अशांनी फेशिअल टाळावे. त्याऐवजी योग्य सल्ल्याने त्वचेची काळजी घ्यावी. 
  • जर तुमची त्वचा नाजूक असेल. अगदी कोणत्याही क्रिम किंवा मसाजमुळे तुमच्या चेहऱ्यावर पुरळ येत असतील तर तुम्ही मुळीच फेशिअल करु नका.
  •  महिन्यातून एकदा फेशिअल करा हे जरी खरे असले तरी देखील जर तुम्हाला त्याची आवश्यकता वाटत नसेल. तुमची त्वचा तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही मुळीच फेशिअल करण्याचा घाट घालू नका. 

आता फेशिअल करण्यापूर्वी या गोष्टी नेहमी लक्षात घ्या आणि मगच फेशिअल करायचे की नाही ते ठरवा.

हायड्रेटिंग फेशिअल करेल तुमची त्वचा परफेक्ट (Hydrating Facial For Skin In Marathi)

 

08 Dec 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT