ADVERTISEMENT
home / Care
मऊ आणि मुलायम केस मिळविण्यासाठी अशी भिजवावी मेंदी

मऊ आणि मुलायम केस मिळविण्यासाठी अशी भिजवावी मेंदी

मऊ आणि मुलायम केस कोणाला आवडत नाहीत? असे केस तर सर्वांनाच हवे असतात. त्यासाठी अनेकदा पार्लरमध्ये जाऊन केसांना स्पा करणे अथवा कलरिंग करणे, स्ट्रेटनिंग करणे असे अनेक प्रकार करण्यात येतात. पण तुम्ही घरच्या घरी मेंदी लाऊनही केस अधिक मऊ आणि मुलायम करू शकता. पण काही जणांना मेंदी नक्की कशी भिजवायची हेच माहीत नसतं. मेंदी कशीही भिजवली गेली तर त्याचा हवा तसा योग्य परिणाम केसांना मिळत नाही आणि मग केस खराब होतात अथवा मेंदीने केस लाल होतात असं सर्वांना वाटतं. पण मेंदी भिजवण्याचे एक टेक्निक असते आणि त्याचप्रमाणे तुम्ही मेंदी भिजवून केसांना लावली तर तुम्हाला नक्की मऊ आणि मुलायम केस मिळतील. केवळ पांढरे केस काळे करण्यासाठीच मेंदी लावली जाते असं नाही तर केसांची काळजी घेण्यासाठीही मेंदीचा वापर केला जातो. मेंदीचा उपयोग कोंडा आणि केसगळती थांबविण्यासाठीही होतो. त्यामुळे मेंदी कशी भिजवायची आणि त्याचा कसा उपयोग करायचे ते आपण या लेखातून जाणून घेऊया. 

मेंदीपूर्वी गरम तेलाचा केसांना मसाज

Freepik.com

मेंदी लावण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा केसांना गरम तेलाचा मसाज करणे अत्यंत आवश्यक आहे. हेअर मसाज करण्यासाठी तुम्ही कॅस्टर ऑईल अर्थात एरंडाचे तेल, नारळाचे तेल आणि टी ट्री ऑईल मिक्स करून घ्या आणि तेल गरम करून झाल्यावर ते कोमट होऊ द्या. त्यानंतर हलक्या हाताने केसांचा मसाज करा. मसाज केल्याने केस अधिक मजबूत राहतात. तेलाने मसाज करून साधारण एक तासानंतर केस व्यवस्थित माईल्ड शँपूने धुवा. 

ADVERTISEMENT

केस आयुष्यभर दाट आणि काळे राहण्यासाठी मेंदीमध्ये करा हे तेल मिक्स

मेंदी भिजवताना वापरा या गोष्टी

Shutterstock

केसांसाठी जेव्हा मेंदी भिजवता तेव्हा त्यामध्ये रिठा पावडर, आवळा पावडर, शिकेकाई पावडर, 3 अंड्यांंचा पिवळा भाग, थोडीशी कॉफी पावडर अथवा चहाची पावडर या पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे. केसांना मऊपणा आणि मुलायमपणा देण्याचे काम अंडे आणि रिठा, आवळा आणि शिकेकाई पावडर करते. तर कॉफी अथवा चहा पावडरचा यामधील समावेश केसांना उत्तम नैसर्गिक ब्राऊन रंग देण्याचे काम करतो. मेंदीमुळे केस लालसर व्हायला नको असतील तर तुम्ही कॉफी अथवा चहा पावडर घाला. तसंच यामुळे केस अधिक मऊ आणि मुलायम होऊन केसांना चांगले पोषणही मिळते. 

ADVERTISEMENT

हर्बल मेंदी बनवून केसांवर कसा करायचा वापर, काय होतात फायदे जाणून घ्या

अशी भिजवा मेंदी

  • एका बाऊलमध्ये मेंदी पावडर घ्या
  • त्यामध्ये वर सांगितलेले सर्व साहित्य मिक्स करा आणि एक पूर्ण दिवस भिजवून ठेवा
  • दुसऱ्या दिवशी मेंदी थोडी सुकी वाटली तर त्यात चहाचे उकळलेले पाणी घालून थोडीशी पातळ करा 
  • त्यानंतर केसांना लावा 

केसांना हवा तसा रंग द्यायचा असेल तर मेंदी अशी तयार करा

मेंदी लावण्याची योग्य पद्धत

Shutterstock

ADVERTISEMENT

मेंदी लावण्याची योग्य पद्धतही अनेकांना माहीत नसते. केसांना मेंदी कशी लावायची तेही जाणून घ्या. 

  • मेंदी लावण्यापूर्वी हातांना ग्लोव्ह्ज घाला. अन्यथा हात लालसर होतात 
  • केसांचे दोन भाग करा. अर्थात मध्ये भांग पाडा आणि दोन भाग करून घ्या 
  • लहान लहान बटांना पहिले मेंदी लावायला सुरूवात करा. मेंदी लावली की त्याचा जुडा करून वर बांधा
  • केसांना सर्व ठिकाणी मेंदी लाऊन झाली की, त्यावर प्लास्टिक कव्हर अथवा शॉवर कॅप लवा 
  • साधारण 2 – 3 तास तसंच राहू द्या 
  • मेंदी सुकल्यावर स्वच्छ पाण्याने आधी केस धुवा. केस धुताना शँपूचा वापर करू नका 
  • केस सुकल्यावर पुन्हा त्यावर तेलाचा मसाज करा 
  • दुसऱ्या दिवशी केस शँपूने धुवा. त्यामुळे मेंदीचा रंग अधिक चांगला येतो आणि केसही मऊ आणि मुलायम राहतात

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

21 Dec 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT