ADVERTISEMENT
home / Recipes
थंडीत खा डिंकाचे लाडू, आरोग्यासाठी आहेत उत्तम

थंडीत खा डिंकाचे लाडू, आरोग्यासाठी आहेत उत्तम

हिवाळा सुरू झाला की घरोघरी डिंकाचे लाडू बनवण्याची तयारी सुरू होते. कारण हे लाडू दोन ते तीन महिने टिकतात आणि थंडीपासून शरीराचं संरक्षण करतात. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत घरातील सर्वांनात डिंकाचे लाडू आवडतात. हिवाळ्या शरीरार उष्णता निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने दिवसभरात एक डिंकाचा लाडू खाणं खूप गरजेचं आहे. सकाळी नाश्त्यासोबत डिंकाचे लाडू खाण्यामुळे दिवसभर उत्साही वाटते.डिंक हा झाडाच्या खोडावर तयार होणारा एक नैसर्गिक पदार्थ आहे. त्यामुळे यामुळे शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. शिवाय हे लाडू नारळाचा किस, साजूक तूप, सुकामेवा यासोंबत तयार केले  जातात. हे  सर्व पदार्थ हिवाळ्यात शरीराला ऊर्जा पूरवण्यासाठी गरजेचे असतात. यासाठीच जाणून घ्या हिवाळ्यात डिंकाचे लाडू खाण्याचे फायदे आणि बनवण्याची सोपी पद्धत 

डिंकाच्या लाडवाचे शरीरावर होणारे अफलातून फायदे –

डिंक खाण्याचे आरोग्यावर अनेक चांगले फायदे होतात.यासाठीच जाणून घ्या थंडीत डिंकाचे  लाडू का खावेत.

  • डिंकाचे लाडू खाण्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. हिवाळ्यात इनफेक्शन टाळण्यासाठी डिंकाचे लाडू खाण्याचा सल्ला दिला जातो
  • डिंकाच्या लाडवामुळे अशक्तपणा कमी होतो. बाळंतपणानंतर शरीराची झीज भरून काढण्यासाठी अखवा आजारपणातून लवकर बरं होण्यासाठी डिंकाचे लाडू खायला दिले जातात. शिवाय यामुळे शरीरात पुरेसं रक्त निर्माण होण्यास चालना मिळते
  • डिंक हाडांसाठी चांगला असतो. ठिसूळ झालेल्या हाडांची झीज भरून काढण्यासाठी डिंक खाणं फायदेशीर ठरतं. चाळीशीनंतर हळू हळू हाडांची झीज होऊ लागते. यासाठी अशा लोकांनी हिवाळ्यात अंगदुखी, सांधेदुखी टाळण्यासाठी डिंकाचे लाडू खावे
  • डिंकामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होते. ज्यांना अपचन, बद्धकोष्ठता असे त्रास असतील त्यांनी दिवसभरात एक डिंकाचा लाडू खाण्याने चांगला फायदा होऊ शकतो
  • डिंकामुळे स्तनपान करणाऱ्या महिलांच्या शरीरात  दूधाची निर्मिती होण्यास प्रोत्साहन मिळते. यासाठी बाळंतपणानंतर डिंकाचे लाडू खाणं फायदेशीर ठरू शकतं.

Instagram

ADVERTISEMENT

डिंकाचे लाडू तयार करण्याची सोपी पद्धत –

डिंकाचे लाडू निरनिराळ्या पद्धतीने बनवले जातात. आम्ही तुमच्यासोबत एक अतिशय सोपी पद्धत शेअर करत आहोत. जी वापरून तुम्ही अगदी झटपट डिंकाचे लाडू तयार करू शकता

साहित्य –

  • अर्धा वाटी डिंक
  • पाव वाटी खसखस
  • दोन वाटी किसलेलं सुकं खोबरं
  • एक वाटी सर्व आवडीनुसार सुकामेवा ( बदाम, काजू, पिस्ता इ.)
  • अर्धी वाटी खारीक पावडर
  • एक वाटी साजूक तूप
  • अर्धी वाटी किसलेला सेंद्रिय गूळ

डिंकाचे लाडू बनवण्याची कृती –

तूपात डिंक तळून घ्यावा आणि नंतर कु्स्करून त्याची पूड तयार करावी

ADVERTISEMENT

सुकामेवा तूपात तळून मिक्सरवर भरडून घ्यावा

कढईत खसखस, सुकं खोबरं आणि खारीक पावडर टप्प्याटप्याने भाजून घ्यावी

सर्व साहित्य एका मोठ्या भांड्यात एकत्र करावे थंड झाल्यावर गरजेनुसार तुपाचा वापर करत लाडू वळावे

 

ADVERTISEMENT

 

Instagram

महत्त्वाची सूचना –

डिंक हा उष्ण पदार्थ असल्यामुळे अती प्रमाणात डिंकाचे लाडू खाऊ नयेत. दिवसभरात एक पेक्षा जास्त डिंकाचे लाडू खाण्यामुळे शरीरातील उष्णता अती प्रमाणात वाढू शकते. ज्यामुळे अपचन, पोटात दुखणे, पित्त उठणे, तोंड येणे असे त्रास जाणवतात. कोणताही पदार्थ शरीरासाठी तेव्हाच फायदेशीर ठरतो. जेव्हा तो प्रमाणात सेवन केला जातो. यासाठीच डिंकाचे लाडू पोषक असले तरी प्रमाणातच खावे.

ADVERTISEMENT

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

प्रतिकार शक्ती वाढवणारा आयुर्वेदिक काढा रेसिपी (Immunity Boosting Kadha Recipe In Marathi)

पौष्टिक रेसिपी मराठीतून, चविष्ट आणि करायलाही सोप्या (Paushtik Recipes In Marathi)

ADVERTISEMENT

मैद्याचे पदार्थ रेसिपी मराठीत, बनवा विविध प्रकारच्या ‘या’ डिश (Maida Recipes In Marathi)

30 Dec 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT