ADVERTISEMENT
home / Fitness
हे घरगुती उपाय करतील भूक वाढविण्यास मदत

हे घरगुती उपाय करतील भूक वाढविण्यास मदत

 

आजकाल भूकच लागत नाही अशा आशयाची वाक्य खूप ऐकू येत असतात. खाण्यापिण्याची इच्छा नसणे अथवा समोर अन्न बघितल्यावर इच्छाच नाहीशी होणं असंही बऱ्याच जणांच्या बाबतीत तुम्हाला ऐकू येत असेल आणि कधी  कधी स्वतःच्या बाबतीतही जाणवत असेल. पण त्यासाठी तुम्ही घाबरून जायची गरज नाही. हे अत्यंत सामाईक आहे. यासाठी तुम्हाला काही घरगुती उपाय उपयोगी ठरतील जे तुमची भूक वाढविण्यास मदत नक्कीच करतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या शरीराला योग्य वेळेत खाण्याची सवय लाऊन घ्यायला हवी. त्यामुळे बरेच प्रश्न सुटतात. आता जर तुम्हाला भूक लागत नसेल तर तुम्ही नक्की कोणकोणते घरगुती उपाय करू शकता ते आपण जाणून घेऊया. घरात उपलब्ध असणाऱ्या वस्तूंमध्येच तुम्हाला हे उपाय सापडतात. 

त्रिफळा चूर्ण

 

त्रिफळा चूर्ण हे नाव प्रत्येक घराघरात माहीत असतं. अनेक घरगुती उपायापैकी हा एक उपाय आहे. जास्त व्यक्ती याचा उपयोग हा बद्धकोष्ठतेच्या समस्येसाठी करतात. पण जर तुम्हाला भूक लागत नसेल तरीही तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता. त्रिफळा चूर्ण भूक लागण्यासाठी उपयुक्त उपाय आहहे. त्यासाठी तुम्ही कोमट दूध घ्या आणि त्यामध्ये एक चमचा त्रिफळा चूर्ण मिक्स करून याचे नियमित सेवन करा. तुमची भुकेची समस्या दूर करण्यासाठी याचा फायदा होतो. 

ग्रीन टी चे करा सेवन

Shutterstock

 

ग्रीन टी तुमची भूक वाढण्यासाठी चांगला घरगुती उपाय मानला जातो. याच्या नियमित सेवनाने केवळ भूकच वाढत नाही तर अनेक आजारांपासून तुम्हाला दूर ठेवण्यासाठीही याचा उपयोग होतो. तुम्हाला जर सकाळ आणि संध्याकाळ चहा अथवा कॉफी लागत असेल तर त्याऐवजी तुम्ही तुमच्या रोजच्या सवयीमध्ये ग्रीन टी चा समावेश करून घ्या.  थंडीच्या दिवसात ग्रीन टी पिण्याचे अधिक फायदे मिळतात.  तसंच तुमचं वजन नियंत्रणात राखण्यासाठीही याचा उपयोग होतो. 

ADVERTISEMENT

Green Tea : मनाला शांत आणि शरीराला निरोगी ठेवणाऱ्या ‘ग्रीन टी’चे फायदे (Green Tea Benefits In Marathi)

लिंबू पाणी

Shutterstock

 

थंडीच्या दिवसात नेहमीपेक्षा कमी पाणी शरीरामध्ये जाते. बरेचदा तहान लागत नाही त्यामुळे पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते. मात्र असं करणं योग्य नाही. पाण्याची तितकीच गरज शरीराला असते. पाण्याचं प्रमाण कमी झालं तरीही भूक कमी होते. त्यामुळे अशा वेळी तुम्हाला नुसतं पाणी जात नसेल आणि भूक लागत नसेल तर रोज सकाळी रिकाम्या पोटी अथवा दिवसभरात कधीही लिंबू पाणी साखरेशिवाय  तुम्ही एक ग्लास प्या.  यामुळे तुम्हाला दिवसभर उत्साहदेखील राहतो आणि व्यवस्थित भूकही लागते. 

वजन वाढवायचं आहे, करा खिशाला परवडणारे ‘हे’ घरगुती उपाय

ADVERTISEMENT

जिरे

Shutterstock

 

जिऱ्याचे सेवन हादेखील भूक लागण्यासाठी सोपा घरगुती उपाय आहे. अपचन अथवा भूक न लागण्याची समस्या असल्यास तुम्ही याचा वापर करू शकता. जिरे खाल्ल्यामुळे पोटही साफ राहते. बऱ्याच घरांमध्ये जिरे हलकेसे भाजून त्याचे सेवन करण्यात येते. तुम्हाला जर भूक लागत नसेल तर दिवसातून एक अथवा दोन वेळा अगदी चिमूटभर जिऱ्याचे सेवन करावे.

वाढते वजन, भूक आणि मेटाबॉलिजम नियंत्रणात आणण्यासाठी उपयुक्त आहे गोलो डाएट

फळांच्या रसाचे सेवन

Shutterstock

ADVERTISEMENT

 

भूक लागत नसेल अथवा काहीही खावंसं वाटत नसेल तर तुम्ही तुमच्या आवडत्या फळाचे सेवन करावे. यामध्ये अगदी थोडेस मीठ अथवा काळे मीठ घातल्यास तुम्हाला अधिक फायदा मिळतो. तुमचे पोट स्वच्छ राहते आणि अपचनाचाही त्रास होत नाही. तसंच तुम्हाला भूकही लागते. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

30 Dec 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT