यासाठी बाळाला सतत जवळ घेणं असतं गरजेचं, आईवडीलांचा स्पर्श आहे वरदान

यासाठी बाळाला सतत जवळ घेणं असतं गरजेचं, आईवडीलांचा स्पर्श आहे वरदान

लहान असो वा मोठी व्यक्ती आपल्या व्यक्तीने प्रेमाने मिठी मारल्यामुळे कुणालाही सुरक्षित नक्कीच वाटतं. प्रेम दर्शवण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. मात्र जेव्हा तुम्ही तुमच्या तान्हुल्याला अशी सतत प्रेमाने मिठी मारता अथवा त्याला जवळ घेता तेव्हा त्याचा शारिरीक आणि मानसिक विकास होत असतो. बाळाच्या शरीराला योग्य प्रमाणात ऊब मिळण्यासाठी आणि त्याला सुरक्षित वाटण्यासाठी  सतत जवळ घेणं आवश्यक असतं. यासाठीच जाणून घ्या बाळाला सतत असं जवळ घेतल्यामुळे नेमकं काय होतं. 

Instagram

बाळासोबत आईवडीलाचं बॉडिंग वाढतं -

बाळाला सर्वात पहिला स्पर्श होतो तो त्याच्या आईचा. म्हणूनच बाळासाठी हा स्पर्श खूप महत्त्वाचा आणि आयुष्यभर लक्षात राहणारा असतो. आईप्रमाणेच वडिलांचा स्पर्शही मुलांना हवाहवासा वाटत असतो. त्यामुळे आईवडिलांनी लहान मुलांना सतत प्रेमाने जवळ घेणं खूप गरजेचं असतं. मुलं मोठी झाल्यावरही त्याचं तुमच्याशी असलेलं नातं दृढ असावं असं तु्म्हाला वाटत असेल तर त्यांना सतत प्रेमाने जवळ घ्या. ज्यामुळे तुमच्या मुलांना  तुमच्यासोबत सुरक्षित वाटेल, मोठी झाल्यावर ती फक्त तुमचं म्हणणं प्रमाण मानतील. कारण तुमचं त्यांच्यासोबत असलेलं भावनिक नातं ती तान्हुली असल्यापासून तुमच्यासोबत तयार होत असतं.

मुलं स्मार्ट होतात -

मुलांना स्मार्ट आणि हुशार व्हावं असं प्रत्येक पालकाला वाटत असतं. शिवाय आईवडील हे मुलांचे सर्वात पहिले आदर्श असतात. मुलांना लहान पणी मोठं झाल्यावर आईवडिलांसारखं व्हावं अशी उपजत प्रेरणा असते. यासाठीच तुमच्या मुलांना लहानपणापासून प्रेमाने जवळ घेऊन त्याना प्रेरणा द्या. त्यांच्या मानसिक, बौद्धिक विकासासाठी असं त्यांना सतत जवळ घेणं गरजेचं असतं. मुलांना स्मार्ट करण्याची ही पहिली स्टेप आहे.

Instagram

मुलांचे आरोग्य सुधारते -

जेव्हा एखाद्याला प्रेमाने मिठी मारतो तेव्हा आपल्या शरीरात हॉर्मोनल बदल होतात. मिठी मारल्यावर शरीरात ऑस्किटॉसिन नावाच्या संप्रेरकाची निर्मिती होत असते. ज्याचा संबध भावनांशी, प्रेमाशी असतो. मुलांमध्ये विश्वास, प्रेम, आपुलकी निर्माण करण्यासाठी असा बदल शरीरात होणं गरजेचं असतं. ज्यातून त्यांचा मानसिक विकास होतो. मानसिक विकास चांगला झाला तर त्याचा परिणाम मुलांच्या शरीरावर होतो आणि त्यांची शारीरिक वाढ चांगली होते. बुद्धीचा विकास होण्यास मदत होते. एकूणच मुलांचे आरोग्य सुधारण्याची ही एक चांगली स्टेप असू शकते.

मुलं शांत स्वभावाची होतात -

चिडचिड करणारी, हट्टी मुलं कुणालाही आवडत नाहीत. जर तुम्हाला तुमची मुलं  शांत आणि सदगुणी व्हावी असं वाटत असेल तर मुलांना भरपूर प्रेम द्या. मुलांना प्रेमाने जवळ घेतल्यामुळे त्यांचे मन मजबूत  आणि निवांत होते. ज्याचा परिणाम त्यांच्या स्वभावावर होतो आणि ती जास्त चिडचिड अथवा हट्ट करत नाहीत. मुलांना मजबूत आणि सहनशील करण्यासाठी असं नियमित करा ज्याचा परिणाम तुम्हाला ती मोठी झाल्यावर दिसेल. 

मुलं नेहमी आनंदी राहतात -

मुलं जेव्हा आईवडीलांपासून दूर होतात. त्यांना असुरक्षित वाटतं आणि  ती रडू लागतात. मात्र मुलांना  सतत प्रेमाने मिठी मारण्याची सवय लावली तर त्यांच्या मनात असुरक्षितेची भावना कमी निर्माण होते. ज्याचा परिणाम ती सदैव हसतखेळत आणि आनंदी राहतात. मुलांच्या योग्य वाढ आणि विकासासाठी त्यांनी असं सतत आनंदी असणं गरजेचं असतं. यासाठीच जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मुलांना प्रेमाने जवळ घ्या. त्यांना मिठी मारा आणि त्यांच्यासोबत गप्पा मारा. 

Beauty

WIPEOUT Baby Safety Wipes

INR 299 AT MyGlamm