थंडीत मुळीच करु नका या स्किन ट्रिटमेंट

थंडीत मुळीच करु नका या स्किन ट्रिटमेंट

वातावरणानुसार त्वचेत अनेक बदल होत असतात. पण थंडीत त्वचेमध्ये होणारे बदल फारच लगेच जाणवतात. त्वचा रुक्ष होणे, नाजूक होणे, त्वचेची जळजळ होणे असे काही त्रास कायम होत राहतात. अशा काळात त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही जर काही स्किन ट्रिटमेंट घेत असाल तर त्याचे उलट परिणाम होण्याची शक्यता ही अधिक असते. आता परिणामांचा विचार करता स्किन ट्रिटमेंट करायच्याच नाही का असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर असे मुळीच नाही. पण काही ठराविक स्किन ट्रिटमेंट या तुम्ही या कालावधीमध्ये टाळणेच फार सोयीस्कर असते. जाणून घेऊया अशा काही स्किन ट्रिटमेंट ज्या तुम्ही मुळीच करायला नको.

चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासोबतच त्वचा खुलवतील हे फेसऑईल

स्किन पीलिंग

Instagram

केमिकल्सचा वापर करुन केले जाणारे स्किन पीलिंग हे त्वचेसाठी फारच उत्तम आहे. पण थंडीत अशा पद्धतीचे  स्किन पीलिंग त्रासदायक ठरु शकते. पीलिंग केल्यामुळे त्वचा क्षमतेपेक्षा जास्त कोरडी होणे, त्वचा फुटणे असे त्रास होऊ शकतात. केमिकल पील केल्यानंतर काही काळासाठी त्वचा ही काळवंडलेली देखील दिसते. त्यामुळे शक्यतो स्किन पीलिंग करण्याचा घाट थंडीत मुळीच घालू नका. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊन मगच स्किन पीलिंग करा. 

फेस वॅक्स

जर तुम्ही त्वचेवरील अतिरिक्त लव काढण्यासाठी जर फेस वॅक्स  करत असाल तर थंडीच्या काळात चेहऱ्यावर वॅक्स करायला जाऊ नका. थंडीच्या दिवसात त्वचा आधीच नाजूक झालेली असते. जर तुम्ही फेस वॅक्स केले तर तुमची त्वचा ओढली जाते. त्वचा ओढली गेल्यामुळे त्यावर रॅशेश येणे, त्वचा लाल होणे, त्वचेवर बारीक बारीक जखमा होणे असे काही त्रास होऊ लागतात. त्यामुळे फेस वॅक्स करणे या दिवसात टाळा. 

फळांचा असा वापर करुन मिळवा तजेलदार त्वचा

फेशिअल

Instagram

महिन्यातून एकदा फेशिअल करणे हे चांगले असले तरी थंडीच्या दिवसात फेशिअल करताना विशेष काळजी घ्यावी लागते. इतर दिवसांमध्ये चेहऱ्याला मसाज केल्यास आराम मिळत असेल. पण फेशिअल दरम्यान केलेल जाणारे स्क्रब जर त्वचेवर जास्त प्रमाणात केले आणि त्यानंतर मसाज केला तर तुमची त्वचा डॅमेज होण्याची शक्यता असते. शिवाय जर त्वचेवरील ब्लॅक हेड्स काढण्याचा प्रयत्न तुमच्या त्वचेसाठी अधिक त्रासदायक ठरु शकतो. त्यामुळे साधारण दोन महिने फेशिअल करण्यापेक्षा त्वचा स्वच्छ करणारे क्लिनअप करा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. 

ब्लिचिंग

त्वचेवर इन्स्टंट ग्लो हवा असेल तर ब्लीच केले जाते. पण ब्लीच हे देखील त्वचा नाजूक करु शकते. इतर हवामानाचे ठीक आहे पण जर हिवाळ्यात ब्लीच करताना जर अॅक्टीव्हेटर जास्त झाले तर तुमच्या त्वचेवर पॅचेस येण्याची शक्यता असते. त्वचेवर असे पॅचेस नको असतील तर तुम्ही ब्लिचिंग करणे टाळा. इन्स्टंट ग्लो हवा असेल तर तुम्ही काही नैसर्गिक उपाय करा किंवा आहारात बदल करा. पण ब्लिचिंग हा प्रकार शक्यतो टाळा. 


आता थंडीत वरील ट्रिटमेंट टाळून त्वचेची काळजी घेतली तर त्वचा संपूर्ण हिवाळ्यात चांगली दिसेल यात काही शंका नाही. 

झोपताना लावा हा अप्रतिम फेसमास्क, मिळेल तजेलदार त्वचा

Beauty

GLOW Iridescent Brightening Moisturising Cream

INR 1,595 AT MyGlamm